IMD ने पश्चिम बंगालच्या विविध जिल्ह्यांसाठी ७ जूनपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली.
पुण्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
आज सकाळी केपटाऊनमध्ये BRICS FMM च्या बाजूला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांना भेटून आनंद झाला. आमच्या चर्चेत द्विपक्षीय बाबी, BRICS, G20 आणि SCO यांचा समावेश होता - परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर
शिवसेना नेते, आमदार संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत घेतली. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केले आहेत. “मला कुठलीच माहिती न देता, विचारपूस न करता हे प्रकरण निकाली काढलं आहे. देवेंद्र फडणवीस संवेदनशील व्यक्ती आहेत. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून त्यांना ह्या सर्व गोष्टी कळत असतील. त्यांनी वकील म्हणून माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावी”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
इयत्ता 10 वीचा निकाल उद्या 1 वाजता जाहीर होणार असल्याची माहीती समोर आली आहे.
जे जे रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांचा संप पुकारला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरला अहिल्यादेवींचं नाव देण्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समर्थन दिलं आहे. हा निर्णय चांगलाच असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
दिल्लीतील 16 वर्षीय मुलीची चाकूने वार करून खून केल्या प्रकरणात दोषी असणाऱ्या साहिलला दिल्ली पोलिसांनी आज कोर्टात हजर केले. कोर्टाने आरोपी, साहिलच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत 150 बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत. तर 350 आरोग्य कर्मचारी, दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.
1 जून 2023 म्हणजेच आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलेंडरचे दर 83 रुपयांनी कमी झाले आहेत.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.