Breaking News  Sakal
देश

दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

 दिल्लीहून पुण्याला निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याच्या फोनने खळबळ

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात बॉम्ब असल्याबाबतचा फोन टेकऑफपूर्वी आला होता. CISF आणि दिल्ली पोलीस सतर्क आहेत. दिल्ली विमानतळावर फ्लाइटची तपासणी केली जात आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.


देशाला जगातील टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये नेण्याचे ध्येय - PM मोदी

आज आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. देशाला जगातील टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये नेण्याचे आपले ध्येय आहे. देशाची ही आर्थिक वाढ आपल्या तरुणांसाठी मोठ्या संधी निर्माण करेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील हुब्बाली येथे राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 मध्ये व्यक्त केले.

माजी वित्त सचिवांच्या घरावर सीबीआयचे छापे

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माजी वित्त सचिव अरविंद मायाराम यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले असून घराची झडती घेतली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे धडाक्यात उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील हुब्बाली येथे 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 चे उद्घाटन केले.

मेट्रो-२ ७ ची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी 

मेट्रो-२ ७ ची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहाणी केली. यावेळू त्यांनी गुंदवली मेट्रो स्टेशनची पाहाणी केली. १९ जानेवारीला होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सत्यजीत तांबेंनी भरला अपक्ष उमेदवार अर्ज

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी नाशिक शिक्षण मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे.

हसन मुश्रीफ ईडीला कायदेशीर मार्गानं उत्तर देतील - बाळासाहेब पाटील

कऱ्हाड : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर, ऑफिसवर ईडीनं छापा टाकला. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वीही इन्कम टॅक्सनं छापा टाकला होता. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यावरही ईडीनं कारवाई केली. मात्र, ते बाहेर आले. मुश्रीफ त्याला कायदेशीर मार्गानं उत्तर देतील, असा विश्वास व्यक्त करत माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी मुश्रीफांची पाठराखण केली.

बच्चू कडू यांचा अपघात की सत्ताधाऱ्यांकडून घात?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या विधानाने खळबळ

प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा रस्ता ओलांडताना अपघात झाला. बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला आहे. मात्र, बच्चू कडू यांच्या या अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी वेगळाच संशय व्यक्त केलाय. बच्चू कडू यांचा अपघात होता की घातपात याची चौकशी झाली पाहिजे. सत्ताधाऱ्यांकडून हा घातपात करण्याचा प्रयत्न होता का? असा संशय अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

पुणे पोलिसांकडून चाळीसहून अधिक कोयते जप्त

पुणे पोलिसांकडून चाळीसहून अधिक कोयते जप्त केले आहेत. पुणे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी याबबत माहिती दिली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या आदेशानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. पुणे पोलिसांची कोयता गॅंगच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून काल रात्री ठीक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. पुण्यातील विविध भागातून पोलिसांनी कोयते जप्त केले आहेत.

नाशिक पदवीधर जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर 

नाशिक पदवीधर जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे. सुधीर तांबे यांना काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यात G20 निमित्त लागले पडदे पण "इस पडदे के पीछे क्या है?"

जी २० परिषदेनिमित्त पुण्यात प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. या परिषदेसाठी दिसून अधिक देशांमधून येणाऱ्या पाहुण्यांसाठी पुण्यात ठिकठिकाणी सुशोभीकरण केले जात आहे. शहरातील रस्त्यांवरच्या भिंतीचे रंग काम असो किंवा रस्त्याचे डांबरीकरण, स्थानिक प्रशासनाने पाहुण्यांच्या स्वागतासाठी कंबर कसली आहे. विदेशी पाहुण्यांना पुण्याचे कौतुक वाटावे यासाठी कोटी रुपये खर्च करून महापालिकेने ठिकठिकाणी सुशोभीकरण केले खरे मात्र ज्या ठिकाणी हे पाहुणे राहायला आहेत त्याच हॉटेल जवळ पालिकेने कचरा झाकण्यासाठी चक्क पडदा टाकला आहे. याच घटनेचा निषेध म्हणून आम आदमी पक्षाकडून या पडद्यावर "इस पडदे के पीछे क्या है?" "कचरा"? असा फ्लेक्स लावला आहे

भाजपसोबत असणाऱ्या पक्षांना कधीही पाठिंबा देणार नाही- प्रकाश आंबेडकर

विरोधातला विरोध हा आपला मित्र हे राजकीय समीकरण आहे. निवडणुका ठाकरेंसोबतच लढवणार. भाजपला आमचा विरोध कायम आहे. भाजसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.

CM शिंदे यांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण म्हणाले...

इंदू मिलमधील स्मारकाबाबत भेट घेतली. भेट देऊन प्रतिकृती बरोबर आहे की नाही ते पाहावे. यावरी चर्चा झाली. माझ्या निर्णयात ठाकरेंसोबतच्या युतीत कोणताही बदल झालेला नाही. आणि हे मुख्यमंत्री शिंदेंनाही माहिती आहे. विरोधातला विरोध हा आपला मित्र हे राजकीय समीकरण आहे. निवडणुका ठाकरेंसोबतच लढवणार. भाजपला आमचा विरोध कायम आहे. भाजसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही. एकत्र लढण्याबाबत ठाकरेंनी जाहीर कराव अशी मागणी केली आहे.

"प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंसोबत युती करू नये" - CM शिंदे 

गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चा झाल्या. अशातच काल प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये बंददाराआड चर्चा झाली असल्याचे समजते. या माहितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ठाकरेंसोबतच्या आघाडीवर मन वळिवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश आंबेडरकर यांनी ठाकरे गटासोबत युती करु नये, असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मात्र, आंबेडकर आपल्या मतावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.

अमृता फडणवीस यांच्या 'मूड बना लिया' गाण्याला 30 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याचा छंद आहे. ते सातत्याने नवी गाणी गात असतात. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचे 'मूड बना लिया' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अमृता फडणवीस यांचे हे गाणं रिलीज होऊन काही दिवस झाले आहेत, तरी देखील हे गाणे युट्यूबवर ट्रेंड होत आहे. या गाण्याला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.अमृता फडणीस यांच्या या गाण्याला 30 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT