ndrf 
देश

Marathi News Update : शिवसेनेचे जाहिरात राजकारण ते भाजपमध्ये नाराजी? दिवसभर काय घडलं?

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात

मदत आणि बचाव कार्यासाठी केंद्राने पुरेशा प्रमाणात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. यासोबतच लष्कर, नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या तुकड्या आणि मालमत्ता आवश्यकतेनुसार मदतीसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. एमएचए आणि राज्य सरकारचे नियंत्रण कक्ष चोवीस तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व एजन्सी भारत सरकार तयार आहेत.

रायगडच्या पायथ्याशी दरळ कोसळली

रायगडच्या पायथ्याशी दरळ कोसळली आहे. यामध्ये एक कार आणि एका दुकानाचे नुकसान झाले आगे

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ५ तासानंतर वाहतूक सुरळीत सुरू

कुपवाडा जिल्ह्यातील लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी ठार

कुपवाडा जिल्ह्यातील डोबनार मच्छल या सीमावर्ती भागात लष्कर आणि कुपवाडा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. शोध मोहीम अजूनही सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

जुहू बीचवर काल समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या पाच जणांपैकी तिघांचा मृत्यू

मुंबईतील जुहू बीचवर काल समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या पाच जणांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. एक जण बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक पुन्हा थांबवली, आग आटोक्यात न आल्याने महामार्ग पोलीसांचा निर्णय

आग लागल्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक हळूहळू सोडण्यास सुरुवात झाली. पुन्हा आग भडकू लागल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक पुन्हा थांबवली आहे.

दोन आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका

गुजरातमधील बेस्ट बेकरी प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर टँकरला भीषण आग, दोघांचा मृत्यू

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर वाहतूक थांबवण्यात आली आहे. एक्स्प्रेसवर वे वर एका ऑईल टँकरला आग लागली आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी दुर्घटना! ऑईल टँकरला भीषण आग

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी दुर्घटना घडली आहे. ऑईल टँकरला भीषण आग लागली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत काहींचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

जाहीरामध्ये फडणवीसांचा फोटो नाही ही शिंदेंची मोठी झेप – छगन भुजबळ

खराडी चंदननगर परिसरात मोहरीच्या तेलाचा टँकर बीआरटी मार्गात पलटी

नगर रस्त्यावर खराडी चंदननगर येथे एक मोहरीच्या तेलाचा टँकर बीआरटी मार्गात पलटी झाला आहे. टँकरचा चालक पळून गेला असून टँकरमधील निम्मे तेलनगर रस्त्यावर वाहून आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली असून अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे या तेलावर माती टाकण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. तेल दूरपर्यंत वाहून जात असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे.

राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे! शिवसेनेच्या जाहिरातीमुळे फडणवीसांचं टेन्शन वाढवलं

राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशा आशयाची पानभरुन जाहिरात आज सर्वच वृत्तपत्रांमध्ये दिसून येत आहे. एका सर्वेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्रितपणे केलेल्या कामाला राज्यातील जनतेने पसंती दिल्याचं समोर आलं आहे. याच सर्वेचा आधार घेत शिवसेनेने सर्वच वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जनतेची देंवेद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचाही उल्लेख या जाहितीत करण्यात आलाय.

पुण्यात धावत्या रिक्षावर कोसळलं झाड; महिलेचा जागीच मृत्यू

सहकारनगर परिसरातील मुक्तांगण शाळेजवळ धावत्या रिक्षावर अचानक झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, रिक्षाचालक जखमी झाला आहे. सुदैवाने या घटनेत रिक्षातील ३ वर्षीय बालकासह अन्य ३ महिला बचावल्या आहेत.

सातपुडा भवनला लागलेल्या आगीवर नियंत्रण; चौकशीसाठी समिती गठित

मध्य प्रदेशातील सातपुडा भवन येथे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सर्व यंत्रणा सीआयएसएफ आणि लष्कराने एकत्र येऊन या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. मध्य प्रदेश भोपाळचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील हॉटेलला भीषण आग; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू

पुण्यात मध्यराञी एक वाजण्याच्या आसपास मार्केटयार्ड, गेट नंबर एक हॉटेल रेवळ सिद्धि येथे भीषण आगीची घटना घडली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण मिळवण्यात आलं. आतमध्ये पोटमाळ्यावर झोपलेल्या 3 कामगारांना जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. या घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला तर एकावर उपचार सुरू आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन,आषाढी वारी, मान्सून, चक्रीवादळ या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT