Marathi News Live Update  
देश

Marathi News Update : बिपरजॉय चक्रीवादळाच्या अपडेट ते शिंदे-फडणवीस एकत्र, दिवसभरातील बातम्या वाचा...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईत दिसून येत आहे परिणाम

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. भरतीच्या लाटा आणि जोरदार वाऱ्यांचा किनारी भागांवर परिणाम होत आहे.

कोथरूड येथे पुनर्विकास चालू असलेली इमारत कोसळली

शिवतीर्थ नगर कोथरूड येथे पुनर्विकास चालू असलेली प्रथमेश इमारत कोसळली. ही इमारत पाडण्याचे काम सुरू होते. चुकीच्या पध्दतीने पाडण्यात आल्याने रस्त्यावर राडारोडा आला. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.

बिपरजॉय चक्रीवादळ ताशी 110 किमी वेगाने जात आहे पुढे

बिपरजॉय चक्रीवादळ सध्या जाखाऊ बंदरावरून ताशी 110 किमी वेगाने पुढे जात आहे. ईशान्येकडे जाताना कच्छ, सौराष्ट्र ओलांडणार आहे. त्याचा वेग 115-125 किमी प्रतितास असणार आहे. संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत लँडफॉल सुरू राहील: मनोरमा मोहंती, शास्त्रज्ञ, IMD, गुजरात

वादळ नेमकं कुठं?, लाईव्ह पाहा 'सकाळ'वर

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडली

पालघरमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव

बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव पालघरमध्ये दिसत आहे. आज समुद्रात उंच लाटा उसळत आहेत.

एका जाहीरातीमुळे आमच्यात दुरावा निर्माण होणार नाही- देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. हे सरकार तुमच्या दारी आणणारे आहे. घरी बसणारे नाही. तर जाहीरातीवर बोलताना फडणवीस म्हणाले कि, एका जाहीरातीमुळे आमच्यात दुरावा निर्माण होणार नाही. माझा आणि शिंदे यांचा प्रवास २५ वर्षांचा असल्याचे फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

पालघरमध्ये 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात शिंदे-फडणवीस उपस्थित

पालघरमध्ये 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात शिंदे-फडणवीस उपस्थित आहेत. जाहिरात वादानंतर आता शिंदे आणि फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरमध्ये दाखल 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरमध्ये दाखल झाले आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी ठाण्यातून पालघरमध्ये दाखल झालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरच्या दिशेने रवाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी ठाण्यातून पालघरच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवसेनेच्या जाहिरातीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले होते. तर फडणवीस यांनी कानाचा त्रास होत असल्याचे सांगितले होते. आज जाहिरातीच्या वादानंतर पालघरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र उपस्थित राहणार आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळला! मुंबईतील चोपाट्यांवर जाण्यास निर्बंध

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतही जाणवत आहे. मुंबईचा समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, एक्सा आणि गोराई चौपाटी बंद करण्यात आली आहे.

आषाढी वारीचा सासवडमध्ये मुक्काम, वारीमध्ये सुप्रिया सुळे यांचा सहभाग

आषाढी वारीचा सासवडमध्ये मुक्काम आहे. तर या वारीमध्ये सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. वारीत सुप्रिया सुळेंनी फुगडीचा फेर धरला. तर राज्यात चांगला पाऊस पडदे, बळीराजाचं राज्य येऊ दे असं साकड पांडुरंगाला सुप्रिया सुळे यांनी घातलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून तीन नव्या न्यायमूर्तींनी शपथ घेतली

मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून तीन नवीन न्यायमूर्तींनी शपथ घेतली आहे.

1. शैलेश प्रमोद ब्रह्मे

2. फिरदोश फिरोज पूनीवाला

3. जितेंद्र शांतीलाल जैन

तुकोबारायांची पालखी यवतकडे मार्गस्थ

तुकोबारायांची पालखी यवतकडे मार्गस्थ झाली आहे. परिसरात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळला, पहा गेटवे ऑफ इंडिया येथील दृश्य

मुंबईत सकाळी 10.29 वाजताच्या सुमारास भरतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळाचा प्रभाव 18 जूनपर्यंत राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार, आतापर्यंत 74 हजार नागरिकांचं स्थलांतर

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता 74 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. तर NDRF ची 33 पथकंही तैनात करण्यात आली आहेत. गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील मंगरोळमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागले आहे.

काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब

काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहीती समोर येत आहे. आशिष देशमुख 18 जून रोजी भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची माहीती आहे. नागपूर जवळच्या कोराळी येथील नैवेद्यम सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहीती आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन,आषाढी वारी, मान्सून, चक्रीवादळ या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Candidates List: विधानसभेसाठी NCP अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर, 'इतक्या' उमेदवारांना संधी, जाणून घ्या नावं

Winter Baby Care: आयुर्वेदानुसार हिवाळ्यात लहान मुलांची कशी काळजी घ्यावी अन् त्यांचा आहार कसा असावा? वाचा डॉक्टर काय सांगतात

Chhota Rajan Gets Bail : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई हायकोर्टाचा दिलासा! जामीन मंजूर, जन्मठेपेलाही दिली स्थगिती

Solapur Vidhansabha 2024 : अक्कलकोटमध्ये यंदा बहुरंगी लढत, कल्याणशेट्टी यांच्या ‘प्रतिष्ठेची’ तर म्हेत्रे यांच्या ‘अस्तित्वाची’ निवडणूक

Pohardevi Mahant Left Shivsena UBT : विदर्भात ठाकरेंना फटका बसणार? पोहरादेवीच्या महंतांनी 'हे' गंभीर आक्षेप घेत सोडला पक्ष

SCROLL FOR NEXT