Latest Marathi News Live Update Esakal
देश

Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Marathi News Live Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेचा वाहतूक कोंडीवर परिणाम कायम

घाटकोपर पूर्वेकडील रेल्वे पोलीस वसाहत लगतच्या पेट्रोल पंपावर बाजूचे अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज कोसळून अनेकांचे बळी बळी गेले. अद्याप येथील लोखंडी ढिगारा उपसण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका तसेच पोलीस गाड्या, विद्युत जनरेटर वाहने उभी आहेत. या वाहनांमुळे आजूबाजूचा परिसर व्यापला आहे. तर दुसरीकडे बाजूच्या पुलावर पोलीस वाहनचालकांना शिस्तीचे धडे देत आहेत. त्यामुळे अद्याप पूर्व द्रुतगती महामार्गावर आणि घाटकोपर परिसरात सर्वत्र वाहतूक कोंडी झाली आहे.

Marathwada: मराठवाड्यातील पाणीपातळीमध्ये मोठी घट

उन्हाळा संपण्यास अवकाश असला तरी मराठवाड्यातील पाणी पातळी धोकादायकरित्या खाली गेली आहे. लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. मराठवाड्यातील धरणांची पाणीपातळी तळाला गेली आहे.

Navi Mumbai: नवी मुंबईतील खारघरमधील चतुर्भूज सोसायटीच्या इमारतीला आग

नवी मुंबईतील खारघरमधील चतुर्भूज सोसायटीच्या इमारतीला आग लागली आहे. चौदाव्या मजल्याला आग लागली असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Marathi Ghatkopar: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळाची शरद पवारांकडून पाहणी

मुंबई घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळाची शरद पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांंचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतल्या 'अटल सेतू'चं अभिनेत्री रश्मिकाकडून तोंडभरुन कौतुक

रल्वेच्या हद्दीतील तीन अनधिकृत होर्डिंग काढायला सुरुवात

मुंबईत घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. त्यामुळं आता मनपानं रेल्वेच्या हद्दीतील तीन अनधिकृत होर्डिंग्ज काढायला सुरुवात केली आहे.

खेड, आंबेगाव, शिरुरमध्ये तुफान पाऊस

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरुरमध्ये तुफान पावसाला सुरुवात झाली आहे.

महायुतीच्या प्रचारासाठी PM मोदींचा उद्या मुंबईत मोठा रोड शो

महायुतीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबई दौरा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी मुंबईत नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी LBS मार्गावरील गांधी जंक्शन ते नौपाडा जंक्शनपर्यंत मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. माहुल-घाटकोपर रोड मेघराज जंक्शन ते आरबी कदम जंक्शन उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मार्गावरील वाहतूकही बंद असणार आहे. मोदींच्या या रोड शोसाठी वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे.

Jairam Ramesh: "केंद्र सरकार लोकतंत्र नव्हे 'धनतंत्र' चालवत आहे" 

"केंद्र सरकार लोकतंत्र नव्हे 'धनतंत्र' चालवत आहे", अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

Modi-Shah: मोदी-शहांना दिलासा, सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या द्वेषपूर्ण भाषणांविरोधी याचिक

द्वेषपूर्ण भाषणे केल्याप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

Nashik Accident: बस-कारच्या अपघातात तिघांचा मृत्यू

नाशिकच्या नांदगावमध्ये बस आणि कारचा अपघात झाला आहे. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Rain: छत्रपती संभाजीनगर परिसरात जोरदार पावसाला सुरूवात

छत्रपती संभाजीनगर परिसरात नुकतीच जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळणार आहे.

PMC: 1500 अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश

घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर पुण्यात महापालिका प्रशासनाने 1500 अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Pune Water Supply : पुण्यात तूर्तास पाणीकपात नाही; महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचं स्पष्टीकरण..

पुणे शहरात सध्या पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचं स्पष्टीकरण महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिलं आहे. शहरात सध्या चौदाशे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

Delhi Bomb Threat : दिल्लीतील कित्येक रुग्णालयांना बॉम्बच्या धमकीचा मेल; तपास सुरू

दिल्लीतील कित्येक रुग्णालयांना बॉम्बच्या धमकीचा मेल आला आहे. दीपचंद बंधू रुग्णालय, GTB रुग्णालय, दादा देव रुग्णालय, हेडगेवार रुग्णालय आणि अशाच इतर रुग्णालयांना असा मेल आला आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.

Eknath Shinde : मोदींनी निवडणुकीचा अर्ज भरला म्हणून आजचा दिवस ऐतिहासिक - एकनाथ शिंदे

पंतप्रधान मोदींनी आज वाराणसीतून निवडणुकीचा अर्ज भरला. याप्रसंगी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आलं होतं. मुख्यमंत्री शिंदे देखील याठिकाणी उपस्थित होते. आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे, जनता मोदींना मत देण्यासाठी उत्साही आहे. यावर्षी 2014 आणि 2019 चे रेकॉर्ड मोडले जातील असं ते यावेळी म्हणाले.

Ghatkopar Hoarding Accident : भावेश भिंडेला फरार घोषित करा; मुंबई होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी किरीट सोमय्यांची मागणी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडे हाच जबाबदार आहे. तो सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत फरार झाला आहे. मी पोलिसांना अशी मागणी केली आहे, की त्याला फरार घोषित करावं. भिंडेच्या कंपनीने दोन डझनहून अधिक अनधिकृत होर्डिंग्स उभारले आहेत; अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

Nashik Accident : नाशिकमध्ये गंगाधरी गावाजवळ एसटी-अल्टोचा अपघात; अडीच वर्षांचं बाळ गंभीर जखमी

नाशिकमध्ये गंगाधरी गावाजवळ एसटी-अल्टोचा अपघात झाला. यामध्ये अल्टोतील महिला आणि पुरूष जखमी झाले. सोबतच असलेलं अडीच वर्षांचं बाळ गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना उपचारासाठी मालेगावला नेण्यात आलं आहे.

चाळीसगाव-मनमाड या मनमाड आगाराच्या बसला अपघात झाला आहे. यामध्ये बस चालकाची चूक असल्याचं म्हटलं जातंय.

नाशिकमध्ये गंगाधरी गावाजवळ अपघात

Ghatkopar Hoarding Accident : होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेला जाग; जवळच्या इतर अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. या घटनास्थळावरून उर्वरित तीनही अनधिकृत होर्डिंगवर काही वेळातच कारवाई होणार आहे. सर्वेक्षण करून ही सर्व होर्डिंग्स पाडली जातील. मुंबईत एकूण १,०२५ अधिकृत होर्डिंग आहेत. पालिका सगळ्या होर्डिंग मालकांना नोटीस पाठवणार आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून १० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देणार. यातील १७९ होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत असल्याची माहिती आहे. या होर्डिंग मालकांना देखील पालिका नोटीस देईल.

Kangana Ranaut : कंगणा रणौत आज मंडीमधून भरणार उमेदवारी अर्ज

पंतप्रधान मोदी आज वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून कंगणा रणौत देखील उमेदवारी भरणार आहे.

PM Modi in Varanasi : पंतप्रधान मोदी वाराणसीमध्ये दाखल; थोड्याच वेळात भरणार उमेदवारी अर्ज..

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाराणसीमध्ये दाखल झाले आहेत. यापूर्वी त्यांनी सकाळी गंगा नदीची पूजा केली. सलग तिसऱ्यांदा ते या ठिकाणाहून लोकसभेच्या मैदानात उतरत आहेत.

Mumbai Hoarding Accident : मुंबई होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मोठी अपडेट; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी कंपनीने नियमांचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं आहे. तसंच याप्रकरणी भावेश भिंडेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.

Nanded Income Tax Department Raid: नांदेडमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई; 170 कोटींची बेहिशोभी मालामत्ता जप्त

नांदेडमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. संजय भंडारी फायनान्स कंपीवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. या कारवाईत 170 कोटींची बेहिशोभी मालामत्ता जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने 8 किलो दागिनेसुद्धा जप्त केले आहे.

Mumbai hoarding collapse: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांना रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची केली विनंती

घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्याच्या घटनेवर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, "या दुर्घटनेला जबाबदार भावेश भिंडे (इगो मीडिया) फरार झाला आहे, मी पोलिसांना रेड कॉर्नर नोटीस जारी करून फरार घोषित करण्याची विनंती केली आहे. प्रसारमाध्यमांनी ठिकठिकाणी 24 हून अधिक बेकायदेशीर होर्डिंग्ज लावले आहेत. ठाकरे सरकारच्या पोलीस विभागाने 7 डिसेंबर 2021 रोजी या होर्डिंग्सना परवानगी दिली होती. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, या 2020-2021 मध्ये लावलेल्या बेकायदेशीर होर्डिंग्सची तपासणी करून काढून टाकण्यात यावी."

PM Modi Nomination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नामांकनावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नामांकनावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज जगभरात लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या व्यक्तीचे नामांकन आहे, आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

Eastern Express Highway: ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी 

  • ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी

  • होल्डिंग पडल्यामुळे ईस्टन एक्सप्रेस हायवेची एक रांग बंद करण्यात आलेली आहे

  • त्यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतुक संत गतीने सुरू आहे

PM Modi Nomination: उमेदवारी अर्ज करण्यापूर्वी पीएम मोदी दशाश्वमेध घाटावर पूजा करण्यासाठी पोहोचले 

नामांकनापूर्वी पंतप्रधान मोदी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर पोहोचले. येथे पंतप्रधान मोदींनी गंगापूजन केले. यानंतर पीएम मोदी काल भैरव मंदिरात पूजा करण्यासाठीही जाणार आहेत. तेथून ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जातील.

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. हरियाणाच्या फतेहाबादवरून गुन्हे शाखेने ही अटक केली आहे.या आरोपीला मोक्का कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी एकूण अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहा वर गेली आहे.

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेतील मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. एकूण 88 जण या घटनेत जखमी झाले आहेत. त्यापैकी 74 जखमींना वाचवण्यात आले, अशी माहिती NDRF ने दिली आहे.

एनडीआरएफचे निरीक्षक गौरव चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळलेल्या होर्डिंगखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी ढिगाऱ्यातून खोदकाम करणाऱ्यांनी आठ मृतदेह आधीच बाहेर काढले आहेत. अजून चार मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज करणार दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी मोदी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी 11.30 नंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी NDA च्या मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, यांच्यासह भाजप राज्याचे मुख्यमंत्री उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी काल मोदींनी मोठा रोड शो करत मंदिरात पुजा केली होती.

मुंबईत अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. प्रचंड वेगाने वारे वाहत होते. वेगवान वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग कोसळलं आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतच्या अपडेट येत आहेत. निवडणुकीची तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलं आहे. देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT