ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यातील अंबाडोलाजवळ मालगाडीचे चार डबे घसरल्याची घटना घडली आहे. रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली.
मराठवाड्याच्या हक्काचं पाणी बारामतीने पळवण्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याला अजित पवारांनी उत्तर देत उजनी बोगद्याचं काम होत नसल्याने मराठवाड्याला पाणी मिळत नसल्याचं म्हटलं आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिली आहे. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झालीय.
राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढत चालेत- अजित पवार
नेते म्हणतात फेव्हिकॉलचा जोड मात्र कार्यकर्ते संभ्रमात
उणीधुणी काढण्यापेक्षा राज्यकारभार नीट करा
मुख्यमंत्री शिंदेंसोबत ५मंत्री भ्रष्ट
मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार
मुख्यमंत्री शिंदेंनी निधीच्या रूपात खोके दिले- श्रींकात शिंदे
मविआतील गोष्टी पटल्या नाहीत म्हणुन बंड केलं.
मोठी बातमी समोर येत आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. संसदेचं कामकाज आणि भारतीय लोकशाहीचं सौंदर्य यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
चाकण परिसरात शिवशाही बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बसमधुन प्रवाश्यांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. नाशिकवरुन पुण्याला जाताना चाकणमध्ये घटना घडली आहे. यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार चालु आहे. केंद्रीय मंत्र्यांचे घर जाळले जात आहे. मणिपूरमध्ये १०० पेक्षा जास्त अतिरेकी घुसलेत. त्यांना चीनचा पाठिंबा आहे. परंतु केंद्र सरकार चीनवर कारवाई करत नाही. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केली जाते, तशी सर्जिकल स्ट्राईक चीनवर करण्याची केंद्र सरकारची हिंमत आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संत एकनाथ महाराजांची पालखी मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. तर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण सोहळा आज घुमरे पारगाव या ठिकाणी पार पडणार आहे.
अभिनेता प्रभास आणि कृती सेननचा 'आदिपुरुष' चित्रपट काल प्रेक्षकांच्या भेटीला आला. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. नेटकऱ्यांनी सिनेमावर टीका केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात सिनेमाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या वर्धापन 19 तारखेला असल्यामुळे मातोश्री परिसरात दोन्ही गटांमध्ये बॅनरबाजी पाहायला मिळत आहेत. सोमवारी १९ जूनला दोन्ही गटांचा मुंबईत वर्धापन दिन होणार आहे. शिंदे गटाने आणि ठाकरे गटाने आजूबाजूला बॅनर लावले आहेत. राजकीय वर्तुळात बॅनरची चर्चा सुरु आहे.
तर "निष्ठावंतांचा कुटुंब सोहळा, शिवसेना परिवार जगावेगळा" असा ठाकरेंच्या बॅनरवर आशय आहे. "३६५ दिवस २४ तास शिवसेनेचा ध्यास, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असेल आमची कायम साथ" असा शिंदेंच्या शिवसेनेच्या बॅनरवर आशय आहे.
मागील दीड महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. यामध्ये अनेक अनेकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही. याच हिंसाचारावर ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही सवाल देखील उपस्थित करण्यात आलेत. हिंसाचारात जळणाऱ्या मणिपूरची जनता दीड महिन्यापासून जीव मुठीत धरून जगते आहे आणि देशाचे पंतप्रधान या गंभीर संकटाविषयी चकार शब्दही बोलत नाहीत. मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांच्या हल्ल्यात हिंदू मरत आहेत आणि नकली हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे तथाकथित महाशक्तीचे सरकार डोळे मिटून हा रक्तपात पाहत आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन,आषाढी वारी, मान्सून, चक्रीवादळ या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.