LIVE Coromandel Express Accident Updates 
देश

Updates Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

देशासह राज्यातील लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधींनी ट्विट करून काँग्रेस नेत्यांना मदत करण्यास सांगितले

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे मला खूप दु:ख झाले आहे. ज्यांनी त्यांचे कुटुंब गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो." यासोबतच राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना बचाव कार्यात सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री घटनास्थळी जाणार

ओडिशा रेल्वे अपघात : ही घटना खरोखर दुःखद आहे. रेल्वे अपघाताबाबत मी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मी उद्या सकाळी घटनास्थळी भेट देईन: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक

ओडिशातील रेल्वे अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशातील रेल्वे अपघातामुळे व्यथित असल्याचे म्हटले आहे. जखमी लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. मोदी म्हणाले, रेल्वेमंत्र्यांशी (अश्विनी वैष्णव) बोललो आणि परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.

179 जण जखमी, अनेक प्रवासी मृत झाल्याची भीती

पश्चिम बंगालमधील शालिमार स्थानकावरून तामिळनाडूच्या चेन्नईकडे जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसची शुक्रवारी ओडिशातील बालासोर जिल्ह्यात मालगाडीला धडक बसल्याने 179 जण जखमी झाले. बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ ही टक्कर झाली आणि सुपरफास्ट ट्रेनच्या उलटलेल्या डब्यांमध्ये 50 प्रवासी अडकल्याने एक्स्प्रेस ट्रेनमधील अनेक प्रवासी मृत झाल्याची भीती आहे.

50 रुग्णवाहिका दाखल मात्र जखमींची संख्या खूप जास्त

जवळपास 50 रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत पण जखमींची संख्या खूप जास्त आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी मोठ्या संख्येने बसेस जमा केल्या जात आहेत: ओडिशाचे मुख्य सचिव

ओडिशा रेल्वे अपघातावर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ट्वीट

आमच्या लोकांच्या हितासाठी ओडिशा सरकार आणि दक्षिण पूर्व रेल्वेशी समन्वय साधत आहे. आमचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष 033- 22143526/ 22535185 या क्रमांकांसह त्वरित सक्रिय केले गेले आहे: ओडिशा रेल्वे अपघातावर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

ओडिशामध्ये कोरोमंडळ एक्सप्रेस घसरली, अनेक प्रवासी जखमी

बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेस ट्रेनला अपघात झाला. शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. जिल्हाधिकारी, बालासोर यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

दिल्लीतील इमारतीचे छत कोसळले, चार मजूर जखमी

दिल्लीतील किरारी सुलेमान नगर येथील इंदर एन्क्लेव्ह फेज २ येथे एका बांधकादरम्यान इमारतीचे छत कोसळल्याने चार मजूर जखमी झाले. तीन जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून एका जखमीवर उपचार सुरू आहेत. कायद्यानुसार कायदेशीर कारवाई सुरू : पोलीस

नितीन गडकरींनी दिल्ली-वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या वडोदरा-मुंबई विभागाची केली पाहणी

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्ली-वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या वडोदरा-मुंबई विभागाची पाहणी केली.

पावसाळ्यातील पूर व्यवस्थापनाच्या संपूर्ण तयारीचा आढावा अमित शहांनी घेतला आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत पावसाळ्यातील पूर व्यवस्थापनाच्या संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली.

सत्ता गेल्यामुळे संजय राऊत हतबल झाले - नरेश म्हस्के

सत्ता गेल्यामुळे संजय राऊत हतबल झाले आहेत . आज ते थुंकले आहेत. थोड्या दिवसात स्वतःचे कपडे फाडून दगड मारीत रस्त्यावर फिरणार आहेत. त्यांना बरोबर घेऊन फिरणाऱ्या शरद पवार साहेब आणि उध्दव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका जाहीर करावी - नरेश म्हस्के

रायगडावरील कार्यक्रमाला शासनाने राजकीय स्वरूप दिले - सुप्रिया सुळे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रायगड लोकसभेचे खासदार सुनिलजी तटकरे यांना बोलू दिले नाही. या भागाचे खासदार म्हणून त्यांना यथोचित प्रोटोकॉल आणि सन्मान देणे ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु शासनाने या कार्यक्रमाला राजकीय कार्यक्रमाचे स्वरूप दिले हे अतिशय खेदजनक आहे. झाल्या प्रकाराचा निषेध, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नाराज तटकरेंना उदयनराजेंचा खोचक सवाल

कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी न दिल्याने राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे नाराज होऊन होऊन तडकाफडकी रायगडावरून निघून गेले. त्यावर उदयन राजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

या लोकांचे कुणी हात पकडले होते का? कुणी थांबवलं होतं का? छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता, पण असे कार्यक्रम तुम्ही घेत नाही. तुमचा नाकर्तेपणा किंवा आळशीपणा लपवण्यासाठी एखादा मनापासून असा कार्यक्रम नियोजित करत असेल, तर नाव ठेवण्याचं काय कारण? तुम्ही करा ना? तुम्हाला कुणी थांबवलं होतं का?

तु्म्ही बघताय, चाललंय व्यवस्थित. काहीतरी बोललं पाहिजे ना. नाहीतर आज जे लोक त्यांच्याबरोबर आहेत, हळूहळू त्याला गळती लागेल. मग त्यांना थांबवण्यासाठी काहीतरी बोलणं गरजेचं आहे. मी त्यांच्या जागी असतो, तर मीही हेच केलं असतं.

“सुनील तटकरे आत्ता कुठल्या पक्षातले आहेत? हा कार्यक्रम शासकीय नसता, राजकीय असता तर त्यांना कार्यक्रमाला बोलवलं असतं का?” असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

अदानी- पवार भेटीवर नाना पटोलेंचे वक्तव्य चर्चेत

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठीचे सत्र सुरु आहे. दरम्यान, काल एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. यांच्या भेटीवर नाना पटोले यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आली आहे. अदानी आणि पवार यांच्या भेटीशी आम्हाला काही घेणं-देणं नाही. अदानी पवार यांच्या घरी राहायला गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. असं स्पष्ट विधान नाना पटोले यांनी केलं आहे.

उदयनराजे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. शिवरायांच्या कल्पनेतील स्वराज्य आणायचं आहे. प्रतापगड प्राधिकरण कराव आणि त्यांचे अध्यक्ष खासदार उदयन राजे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सरकार नेहमी सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेतय.

राज्याभिषेक सोहळ्यावर नरेंद्र मोदी म्हणाले...

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक अद्भुत अध्याय आहे. यासंदर्भातल्या महान गाथा आपल्याला आजही प्रेरणा देतात. राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण या शासनव्यवस्थेची मूल तत्व होती. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करतो. आज स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ल्याच्या प्रांगणात सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जात आहे. यासाठी मी महाराष्ट्र सरकारलाही शुभेच्छा देतो 

मोदीसाहेबांकडे जाऊ आणि शिवरायांचं दिल्लीतील स्मारक मार्गी लावू

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मोदीसाहेबांकडे जाऊ आणि शिवरायांचं दिल्लीतील स्मारक मार्गी लावू असं फडणवीस म्हणाले आहेत.

शिवस्मारक बांधण्याच्या कामासाठी पंतप्रधानांकडे आम्ही पाठपुरावा करू. शिवाय, रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: प्रयत्न करतील. शिवसृष्टी उभारण्याच्या मागणीसाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाठपुरावा करेन असही फडणवीस यावेळी म्हणाले.

जे जे रुग्णालयात ९ डॉक्टरांनी राजीनामा दिला

जे जे रुग्णलयात ९ डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. अशा घटना राज्य सरकारनं तात्काळ थांबवायला हव्यात. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याची माहिती दिली. डॉक्टरांनी राजीनामा दिल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

राज्य सरकारनं यासंदर्भात तातडीनं पावलं उचलायला हवीत. चर्चा घेण. बैठक घेणं. मार्ग काढणं. यामध्ये सरकार कुठंतरी कमी पडत आहे. यामध्ये मला राजकारण आणायचं नाही. असदेखील पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पवार-शिंदे भेटीवर राऊत म्हणाले...

राज्याच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पवार यांची भेट झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. आज त्यांच्या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी दोघांची भेट झाली. मविआचं जागावाटप सुरळित पार पडेल. मुंबई शिवसेनेचे महाअधिवेशन आहे. जागावाटपावरुन मतभेद होणार नाहीत. वज्रमूठ कायम राहिलं. बेकायदेशीर जनतेला लाथ मारणं हा आमचा अजेंडा आहे.

तुम्ही राज्याभिषेक सोहळा साजरा करता, मग उपकार करताय का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही राज्य चालवतो. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या विश्वाचं दैवत आहेत. जगभरात शिवाजी महाराजांची वाहवा केली जाते. त्यामुळे छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा उत्तम प्रकारे करणं हे महाराष्ट्रातील प्रत्येक राज्यकर्त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही त्या सोहळ्याला अभिवादनच करतो. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित

रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह उदयनराजे भोसले, दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे आदी सत्ताधारी पक्षांमधील दिग्गज नेत्यांची उपस्थिती आहे.

मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री रायगडावर दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं रायगडावर आगमन झालं आहे. शिवराज्याभिषेकाचं हे ३५०वं वर्षं असून यानिमित्ताने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पातच ३५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

युती सरकारमध्ये 350 वा शिवराज्याभिषेक, आम्ही भाग्यवंत: भरत गोगावले

असा असेल कार्यक्रम

सकाळी 7 वाजता ध्वजारोहन सोहळा

सकाळी 9 वाजता शिवराज्याभिषेक सोहळा

सकाळी 10.30 वाजता श्री शिवसन्मान सोहळा

सकाळी 11 वाजता शिवपालखी सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच, राज्यातील राजकारणात भेटीगाठी सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT