देश

Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

अंकिता खाणे (Ankita Khane)

समुद्रात कचरा फेकणाऱ्या इसमाविरोधात गुन्हा

मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये समुद्रात एक इसम कचरा फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

'एजेल'ची ७५१ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त

ईडीने एजेएलची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्याचा आदेश जारी केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ज्या अंतर्गत 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

पुण्याचे सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची बदली

पुण्याचे सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची बदली झाली आहे. कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त असतील. तर नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचीही बदली झाली आहे. अंकुश शिंदे यांना विशेष पोलिस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा या पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे.

विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांकडून बेदम मारहाण

यवतमाळमध्ये विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. पीक विम्याची तोकडी रक्कम मिळाल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. सदरील घटना जिल्हा कृषी अधिकारी यांचे समोर झाली आहे.

मराठवाड्याचा पाणी प्रश्न उद्याच्या कॅबिनेट बैठकीत वादळी ठरणार

मराठवाड्याचा पाणी प्रश्न उद्याच्या कॅबिनेट बैठकीत वादळी ठरणार आहे. राजेश टोपे यांना आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. तर, दुसरीकडे नाशिक आणि नगरचे नेते पाणी न सोडण्यासाठी आग्रही करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाणी सोडण्याबाबत निर्णय घेणार का याकडे मराठवाडा आणि नाशिक नगरच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. उद्याच्या बैठकीत नगर नाशिक मराठवाड्याचे नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे परिवारासह अंबाबाईच्या दर्शनाला जाणार आहेत.

जालन्यात धनगर आंदोलनाला हिंसक वळण

जालन्यातील धनगर आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं असून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली आहे.

नामदेव जाधव शाईफेक प्रकरणातील दोषींना जामीन

नामदेव जाधव शाईफेक प्रकरणातील दोषींना जामीन मंजूर झालेला आहे. शाईफेक प्रकरणानंतर काल पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शाईफेक प्रकरणातील पाचही आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे.

हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात कायम; जायकवाडी धरणात पाणी सोडलं जाणार

हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात कायम ठेवला आहे. आता जायकवाडी धरणात ८.६ टीमसी पाणी सोडलं जाणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवारासह अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साडेतीन वाजता कोल्हापुरात दाखल होणार आहेत.

मुंबईत यायचं का नाही हे अजून ठरलं नाही- मनोज जरांगे

पुरावे आहेत मग विरोध का केला जात आहे. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही विरोध केलेला नाही. २३ तारखेला आंतरवली सराटी येथे जाणार आहे. मुंबईत जायचं का नाही याबाबत अजून ठरवलेलं नाही, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

ललित पाटीलला येरवडा कारागृहाची साथ; ससूनच्या व्यवस्थापनाचीही चौकशी होणार

ललित पाटीलला येरवडा कारागृहाची साथ असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आता ससूनच्या व्यवस्थापनाचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ललित पाटीलला १५ दिवस ससून रूग्णालयात ठेऊन घेण्यासाठी दिलेलं कारागृह अधीक्षकांचं पत्र समोर आलं आहे. जून महिन्यात हे पत्र दिलं होतं. बंदोबस्त नसल्याचे कारण देत थेट १५ दिवस ठेऊन घेण्याचं पत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पत्रावर ललित पाटीलच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे.

कायदा सुव्यवस्था राखतोय, तरी गुन्हे दाखल केले जातायेत- मनोज जरांगे

रात्री उशारापर्यंत सभा सुरु ठेवल्यामुळे धाराशिव आणि सातारा जिल्ह्यात मनोज जरांगे पाटलांच्या सभेचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आज सभेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, कायदा सुव्यवस्था राखतोय, तरी गुन्हे दाखल केले जातायेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाकडून कागदपत्रं सादर; मात्र, शिंदेंनी मागितला वेळ

शिवसेना आमदार अपात्रतेवरील सुनावणीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरूवात झाली आहे. कागदपत्रं सादर करण्यासाठी वेळ दिला होता. त्यानुसार ठाकरे गटाकडून कागदपत्रं सादर करण्यात आली आहेत. तर शिंदेंनी मात्र वेळ मागितला होता. त्यानंतर आता २४ तारखेपर्यंत शिंदे गटाला वेळ देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाची शुक्रवारी सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाची शुक्रवारी सुनावणी पार पडणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाचे वकील चार तास युक्तिवाद करणार आहेत. पुढील सुनावणी दरम्यान शरद पवार यांच्या पक्षाकडून पक्ष संघटना आणि पक्षाच्या रचनेवर युक्तीवाद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी होणाऱ्या सुनावणी वेळीही शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत; बाईक रॅलीचंही आयोजन

ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मनोज जरांगे यांची सभा पार पडणार आहे. यावेळी बाईक रॅलीचंही आयोजन करण्यात आलं आहे.

आमदार अपात्रतेवर आज सुनावणी; शिंदे-ठाकरे गटाचे वकील विधानभवनात दाखल

शिवसेना आमदार अपात्रतेवरील सुनावणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर विधिमंडळात आज (मंगळवार)पासून सुरू होणार आहे. ‘व्हिप’संबंधीचे पुरावे सादर करण्याची परवानगी अध्यक्ष देण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाचे वकील विधानभवनमध्ये दाखल झाले आहेत.

पुणे कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला

आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा कारागृहात होता. जाधवला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळुन गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काल दुपारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली. त्या वेळेस अशीष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. येरवाडा करागृहातून कैदी पळाल्याने खळबळं उडाली आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरोधात सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. 2021 साली सीबीआयचा अंतर्गत अहवाल लीक झाल्या प्रकरणी आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान हा अहवाल मिळवण्यासाठी सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनी कथित लाच दिली होती. यासंबधी मुलगी पुजा हिच्यावर वकिल आनंद डागा यांना मदत केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.

आज मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मुंबईवरून पुण्याच्या दिशेने असणारी वाहतूक पूर्ण बंद राहणार आहे. द्रुतगती मार्गावरील पुण्याच्या दिशेने गंट्री बसवण्यात येणार असल्यामुळे ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई वरून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तास जुन्या मुंबई - पुणे मार्गावरून वळण्यात येणार आहे.

मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरा आणि सभा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपायोजनाची पाहणी, कार्तिकी महापूजेचा पेच आज सुटण्याची शक्यता, शिवसेना आमदार अपात्रतेवरील सुनावणी, सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांचे बचावकार्य यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT