पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) चे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंग बादल यांचे आज मोहालीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनीच या प्रकल्पासाठी केंद्राला पत्र पाठवले आहे. त्यामुळे ते आता का विरोध करतात हा संशोधनाचा विषय आहे. ही त्यांची कुठली भूमिका आहे. मला कळत नाही. जनता याचा विचार करेल. लोकांवर अन्याय करुन हा प्रकल्प होणार नाही, स्थानिकांच्या समंतीने हा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगार निर्मीती होणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यामध्ये मागच्या २४ तासात कोरोनाचे ७२२ नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत. तर ९४६ जणांना कोरोनावर मात केली. तब्बल तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. सध्या राज्यात कोरोनाचे ५हजार ५४९ सक्रीय रुग्ण आहेत.
वाघोलीत वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला आहे. वाघोलीत ऊनपावसाचा खेळही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. भर उन्हाळ्यात पाऊस सुरु झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
पनवेलमध्ये एका बसला अपघात झाला असून १५ ते १६ जण यामध्ये जखमी झाले आहे. जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आसलं.
नागपूरच्या सिव्हिल लाईन्समध्ये गारांसह पावसाला सुरुवात झालेली आहे.तास विदर्भातील
हवामान विभागाने आज चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा अलर्ट दिलेला आहे. तसेच यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पावासाचा इशारा दिलाय.
CBI ने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि हैदराबादस्थित गोरंटला यांच्याविरुद्ध दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात दिल्ली दारू धोरण कथित घोटाळ्याच्या संदर्भात आरोपपत्र दाखल केले.
बेळगावात जावून महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करा, यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, कोण संजय राऊत? ते काही राष्ट्रीय नेते नाहीत. असं म्हणून त्यांनी राऊतांना चिमटे काढले. काही दिवसांपूर्वी नारायण राणे आणि अजित पवार यांनीही 'कोण संजय राऊत?' असं म्हणून चर्चेला तोंड फोडलं होतं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले
ज्या कोणी लावले त्यांनी काढून टाकावेत, मुर्खपणा करु नये
अतिउत्साही लोकं असतात, तेच असं करतात
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, २०२४ मध्ये तेच मुख्यमंत्री असतील
त्यांच्याच नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणूक लढवू
कर्नाटकमध्ये भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल
मोदीजींचा प्रभाव संपूर्ण देशात आहे
आपले मुख्यमंत्री मोदीजींसोबत काम करतायत, हे लोकांना माहिती आहे
डबल इंजिनचं सरकार येथे पुन्हा चांगलं काम करेल
भाजपने वेळोवेळी एक्झिट पोलचे आकडे खोटे ठरवलेले आहेत
विजयामुळं कोल्हापूरच्या राजकारणाला नवं वळणं मिळालं. विजयानंतर महादेव महाडिकांनी व्यक्त केली प्रतिक्रिया. या विजयाता महत्त्वाचा वाटा अमल महाडिक आणि धनंजय महाडिक यांचा आहे. ज्यांना शड्डू ठोकता ते रिंगणात उतरले. आजचा विजय सर्व प्रामाणिक सदस्यांचा.
संस्था गटातून महादेवराव महाडिक 39 मतानं विजयी झाले आहेत, तर विरोधी गटाचे सचिन पाटील यांना केवळ 44 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत 5 फेरी अखेर महाडिकांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. याचबरोबर संस्था कडातून महादेवराव महाडिक यांनी 84 मतं मिळवत आपला विजय निश्चित केला.
राजाराम कारखाना निवडणूकीत महादेव महाडिक यांचा ८३ मतं घेऊन विजय झाला असून, ९ पैकी सहा गटांमध्ये महाडिक यांचा गट आघाडीवर आहे.
उत्पादक गट क्रमांक 3 चा पहिल्या फेरीतील निकाल
उत्पादक गट क्रमांक 3 मध्ये सुद्धा महाडिक पॅनेलची आघाडी कायम आहे. जवळपास 800 ते 900 मतांची आघाडी आहे.
सतेज पाटील पॅनेल
• गायकवाड बळवंत रामचंद्र (आळवे, ता पन्हाळा) 2158 - पाटील विलास शंकर ( भुये, ता करवीर) 2068
- माने विठ्ठल हिंदुराव ( वडणगे, ता करवीर) 2361
महाडिक पॅनेल
- डॉ. किडगावकर मारुती भाऊसो 3129
• जाधव विलास यशवंत 2934 • पाटील सर्जेराव कृष्णा 3051
मुंबईत मुलुंडमध्ये अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. मुलुंड स्टेशन परिसरातील असलेल्या सहा मजली इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. यामध्ये किती लोक अडकले आहेत? याची माहिती अद्याप मिळाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर आहेत. दुसऱ्या गटातील दोन उमेदवार 900 च्या मतांनी आघाडीवर. तर माजी आमदार अमल महाडिक हे 1 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
मीडियाला कुणही आडवलं नाही. प्रसारमाध्यमे तिथं आहेत. रिफायनहीबाबात गैरसमज पसरवले जात आहेत. हा क्रांतीकारी प्रकल्प आहे. तिथल्या शेतकऱ्यांच्या भावना समजू शकतो. खालच्या पातळीवरचं राजकारण सुरु आहे. रिफायनरी व्हावी असं पत्र ठाकरेंनी लिहिलं होतं. स्थानिकांच्या मदतीसाठी आमचे प्रयत्न. आंदोलकांशी चर्चा करुन गैरसमज दुर करु. २५ महिलांना अटक केली आहे. अशी माहिती उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यामध्ये तब्बल 700 मतांची सत्ताधारी महाडिक गटाने घेतली आहे. ज्या भागातील मतमोजणी झाली आहे. तो महाडिक यांचा बालेकिल्ला समजला जातो.
पहिल्या फेरीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकारी पॅनेलने आघाडी घेतली आहे. उत्पादक गट क्रं 1 मध्ये गट क्रमांक 1 पहिल्या फेरी अखेर मतदान आमदार बंटी पाटील गटाच्या पॅनलमधील बेनाडे शालन बाबुराव यांना 2441 मते तर भोसले किरण बाबासो- 2413 मते मिळाली.
संजय राऊत उद्या भीमा पाटस कारखान्यासमोरी सभा घेणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली. भीमा पाटस कारखान्यात शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. राहुल कुल यांच्याकडून शेकडो कोटीचा घोटाळा.
भुसेंच्या सहकारी गिरणी कारखान्यातही भ्रष्टाचार.
कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज (मंगळवार) लागणार आहे. या निवडणुकी निमित्त गेले महिनाभर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले हाेते. या निवडणुकीच्या मतमाेजणीसाठीची जय्यत तयारी पुर्ण झालेली आहे.
माजी मंत्री सतेज पाटील विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटात मुख्य लढत आहे. या निवडणुकीत 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी अंत्यत चुरशीने 12 हजार 336 (91.12 टक्के) इतके मतदान झालं आहे.
रिफायनरीला स्थानिकांनी तीव्र विरोध करताना रस्ता रोखला आहे. रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली आहे. रत्नागिरीतील रिफायनरी सर्वेक्षणाचा आज दुसरा दिवस आहे. ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सड्यावर उपस्थित आहेत. दरम्यान, पोलिसांनी माध्यमांना कॅमेरा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, कोकणातील रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
तसेच, जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राजाराम कारखाना कोणाचा? आज फैसला होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे काही भागात शेतीच नुकसान झालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.