Breaking News  Sakal
देश

दिवसभरात देश अन् राज्यात काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रपतींकडून देशांच्या जवानांचे विशेष कौतुक, म्हणाल्या...

मी त्या साहसी जवानांचे विशेष कौतुक करु इच्छिते जे देशाच्या सीमांचे रक्षण करतात आणि कोणताही त्याग तसेच बलिदान करण्यासाठी तत्पर असतात. देशवासियांना आंतरिक सुरक्षा पुरवणाऱ्या अर्ध सैनिक दल तसेच पोलिस दलाच्या धाडसी जवानांचे देखील मी कौतुक करते - द्रोपदी मुर्मू

राष्ट्रपतींकडून शेतकरी, कामगार वैज्ञानिक अन् अभियंत्यांचं कौतुक

मी शेतकरी, कामगार, वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या भूमिकेचं कौतुक करते ज्यांची सामुहिक शक्ती आपल्या देशाला जय जवान जय किसान, जय विज्ञान आणि जय तंत्रज्ञान या विचारांशी अनुरूप प्रगती करण्यासाठी सक्षम बनवते - राष्ट्रपती मुर्मू

मागच्या वर्षी भारत जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला - राष्ट्रपती

मागच्या वर्षी भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. जगभर आर्थिक संकट सुरु असताना सक्षम आणि प्रभावी संघर्षशीलतेच्या जोरावर आपण लवकरच मंदीतून बाहेर पडलो आणि विकासाकडे प्रवास सुरू ठेवला - राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

यंदा भारत G20 देशांची अध्यक्षता करत आहे. विश्व बंधुत्व आदर्शा मानणारे आपण सगळ्यांसाठी शांती आणि समृद्धीच्या बाजूने आहोत.चांगल्या जगाच्या निर्मितीत योगदानासाठी G20 ची अध्यक्षता ही महत्वाची बाब आहे असेही द्रोपदी मुर्मू म्हणाल्या.

  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे देशाला उद्देशून संबोधन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करत आहेत. यावेळी त्यांचे हे पहिलेच भाषण आहे. देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली.

भिवंडीत चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, ४ दिवसात दुसरी घटना

भावंडांसोबत खेळणारी तीन वर्षाची चिमुरडी अचानक गायब झाली होती,सगळीकडे शोध घेतल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिचा मृतदेह एक इमारतीत आढळून आला.

चारच दिवसांपूर्वी २६ वर्षाच्या युवकाने एका तीन वर्षांच्या चिमुरडीची अत्याचार करुन हत्या केली होती.

चिंचवड विधानसभा निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न- चंद्रकांत पाटील

चिंचवड विधानसभा निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोअर कमिटी उमेदवार ठरवणार आहे. मात्र, गाफिल न राहता प्रचाराची पुर्व तयारी सुरु आहे. आजची बैठक उमेदवार निश्चितीसाठी नाही. उमेदवार दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या घरातीलच असावा. अशी इच्छाही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

भीमा नदी पात्रातील मृतदेहांबाबत पोलिस म्हणाले...

मुलाच्या मृत्यूच्या रागातून संपूर्ण कुटूंब संपण्याचा कट आरोपीने रचला होता.  या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीने कबुली दिली आहे. पोलिसांकडून हत्येचा अधिक तपास सुरु आहे. 

खराब हवामानामुळं श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

नवी दिल्ली : अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे तामिळनाडूमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. खराब हवामानामुळे रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रविशंकर येथे कोणत्या तरी कार्यक्रमाला जाणार होते.

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला विरोध कायम

आज पुण्यात विविध चित्रपट गृहाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या चित्रपटातून बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यातील सातारा रोड येथील सिटी प्राईड चित्रपटगृहात जाऊन बजरंग दलाने निवेदन दिले आहे. शाहरुख खाननी साकारलेल्या भूमिकेचा निषेध करत हा चित्रपट प्रदर्शित करू नये यासाठी बजरंग दलाकडून निवेदन देण्यात आले आहे.

वसईत कंपनीला भीषण आग ; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

वसईत कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

अहमदनगरमधील 7 जणांच्या हत्येप्रकरणी 7 जणांना अटक 

अहमदनगरमधील 7 जणांच्या हत्येप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून हत्या केल्याचं समोर आलं आहे.

७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील ३७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी साकारली महापुरुषांची मानवी प्रतिकृती

पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीने साकारला अनोखा विक्रम केला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना दिली. हा उपक्रम आज सकाळी संस्थेच्या प्रांगणात साकारला गेला. या उपक्रमामध्ये ३७००हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी गेल्या एक महिन्यापासून हा उपक्रम तयारी सुरू होती. या कार्यक्रमाद्वारे "एकता आणि शांतता " हा संदेश आपल्या देशाच्या युवा पिढी पर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.

या उपक्रमामध्ये राष्ट्रध्वज, नेताजी सुभाष चंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांची मानवी प्रतिकृती साकारून मानवंदना देण्यात आली आहे.

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर शरद पवार यांच्या भेटीला

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर शरद पवार यांच्या भेटीला जाणार आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आत्महत्या नाही तर घातपात ! तीन चिमूरड्यांसह ७ जणांच्या मृत्यूमागे करणी ?

महाराष्ट्रातील पुण्यात (Pune) एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम माहितीनुसार आत्महत्या असल्याचे बोलले जात होते. मात्र, आत्महत्या नव्हे तर घातपात असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.

कसबा पेठ, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक मतदानाच्या तारखा बदलल्या

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक मतदानाच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.

27 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने बदलली. आता २६ फेब्रुवारी रोजी होणार या दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक साठी मतदान

बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा निर्णय

पुणे जिल्हा निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांच्याबद्दल एक अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता

या दोन्ही पोटनिवडणुकी दरम्यान बारावीच्या परीक्षा आहेत असे आहवलात नमूद केले होते

या गोष्टीची दखल घेतल्यानंतर आयोगाने चिंचवड आणि कसबा पेठ निवडणुकीच्या साठी होणाऱ्या मतदानाच्या तारखा बदलल्या

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सह इतर राज्यात देखील होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या तारखा काही दिवसांपूर्वी जाहीर केल्या होत्या

निकालांच्या तारखांमध्ये कुठल्याही बदल नाही

पठाणच्या रिलीजसाठी कोथरूड सिटी प्राईड जवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त

तब्बल चार वर्षानंतर शाहरुख खानचा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. पठाण चित्रपटावरून बराच वादंग निर्माण झाल्यानंतर आज चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. त्यामुळे आज पुण्यात विविध थिएटरच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यातील शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोथरूड येथील सिटी प्राईड थियटर जवळ शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते जमले. खबरदारी म्हणून सिटी प्राईड थिएटर बाहेर पठाण चित्रपटाचे पोस्टर्स लावण्यात आले नाही. तर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

आज शहारूख खानचा पठाण चित्रपट रिलीज होणार

आज शहारूख खानचा पठाण चित्रपट रिलीज होणार असून पुणे आणि नाशिकमध्ये पठाण सिनेमा हाऊसफुल्ल आहे. तसेच सांगलीतील शाहरुख खान फॅन क्लबच्या ग्रुपने अख्ख थेटर बुक केले आहे. सकाळी 8.30 वाजता सेलिब्रेशन करून थेटरमध्ये चित्रपट पाहण्यास जाणार आहेत. दुसरीकडे बजरंग दलाने पठाण चित्रपटाला विरोध दर्शवत पठाण चित्रपट प्रदर्शित करू नका, असे निवेदन दिले.

संतोष बांगर यांची पॉलिटेक्निक कॉलेज मधील प्राचार्याला मारहाण

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचे दमदाटीचे व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. अशातच पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर यांचा मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आहे.

नागपुरात दहावीत शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

इयत्ता दहावीत शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना नागपूर जिल्हातील पाटनसावंगी या ठिकाणी घडली आहे. पीडित तरुणी सावनेर येथील विद्यालयात शिकत असून शाळा सुटल्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपी अखिल भोंग आणि भासकवरे यांनी तिला आपल्या कारमध्ये बसवले. आरोपींनी तिला पाटनसावंगी शिवारात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT