पुण्यात सिंहगड रस्ता परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच कोथरूड परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे.
ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात पावसाने हजेरी लावली. गेट वे ऑफ इंडिया परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्री श्री रवीशंकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस या कार्यक्रमाला हजर आहेत. यावेळी नेत्यांनी भर पावसात भाषणे केली.
मुंबईच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. IMD ने आज महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस, गडगडाट आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे.
आंबेगावच्या पुर्व भागात आज गारांसह झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात गारांचा खच साचला आहे. लोणी काळभोरमध्ये देखील ढगांच्या गडगडटासह मुसळधार पाऊस झाला.
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह जोरदार गारपीट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सायंकाळी वसईत देखील वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी येथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी तज्ञांकडून ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे.
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह जोरदार गारपीट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड तर नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसासह गारपीट झाली.
पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांशी संयोग होऊन कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २६ तारखेला उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे.
लोकसेवा आयोगातील नियुक्त्यांमध्ये ८५ टक्के नियुक्त्या मराठा समाजाने मिळवल्या आहेत. मराठा समाजाला ओबीसींपेक्षा जास्त सुविधा मिळतात, असं प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केलं.
ओबीसी समाजाने राजकारणात येऊन सत्ता काबिज केली पाहिजे. मी भुजबळांसोबत युती करायला तयार आहे. समाजाने डिमांडिंग होण्यापेक्षा कमांडिंग व्हायला पाहिजे, असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं.
आमची लायकी नाही तर मग आमच्यात का येता, असा सवाल बबनराव तायवाडे यांनी हिंगोलीमध्ये केला आहे.
हिंगोलीतील ओबीसी मेळाव्याला सुरुवात झाली असून सुरुवातीला '२६/११' घटनेतील शहिदांना अभिवादन करण्यात आलं.
छगन भुजबळ हे हिंगोली येथे सभास्थळी दाखल झाले आहेत. हिंगोलीतल्या रामलिला मैदानावर सभा होत आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे यांची सभेसाठी उपस्थिती आहे.
ठाण्यामध्ये मराठी पाट्यांसाठी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ज्या दुकानांना पाट्या नाहीत तिथे काळं फासलं जात आहे. शिवाय अमराठी पाट्यांवरही काळं फासलं जातंय.
नांदेडमध्ये छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
लंकेंकडून जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलीय. नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्योजकांना दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
दळवी नगर भागात एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
शेवगावात सरपंचाच्या ताब्यात दिलेली वाळू चोरीला गेली असून भाजप पदाधिकारी आणि त्यांच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाजपच्या माजी प्रदेश सरचिटणीसावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला असून शेवगावात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.
महायुतीचा लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती येत आहे. यामध्ये भाजप 26 जागा लढवणार तर शिंदे- अजित पवार गट मिळून 22 जागांवर लढणार आहेत. एका दैनिकाच्या मुलाखतीत फडणवीसांनी याबाबत माहिती दिलीय.
नामांतराचा विषय आता पुण्यात सुद्धा पेटत आहे. पुण्यातील महंमदवाडीचं नाव महादेववाडी करा, अशी मागणी शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केलीय.
हडपसर भागातील महंमदवाडी गावचे नाव बदलण्याची भरत गोगावले यांची मागणी असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गोगावले यांच्या मागणीची दखल घेण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत कागदपत्रांची तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याचे महापालिकेला आदेश देण्यात आलेले आहेत.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला पंधरा वर्षे पूर्ण झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी शहिदांना मानवंदना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.