शिंदे सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणुक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राज ठाकरेनी केली आहे. ते आज कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. यावेळा त्यांनी पत्रकार परिषद घेवून ही घोषणा केली.
उद्या पासून राज ठाकरे कोकण दौऱ्याला जाणार आहेत. आज ते कोल्हापुरच्या दौऱ्यावर होते आजची त्यांचा दौरा पुर्ण झाला आहे.
आदित्य ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका
महिलांना शिवीगाळ करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई होत नाही.
गोळीबार करणाऱ्या आमदारावर देखील कारवाई नाही.
शिंदे सरकारमुळे राज्यातील लाखो रोजगार राज्याबाहेर गेला आहे.
कोल्हापुरात राज ठाकरेंच जंगी स्वागत करण्यात आलं आहे राज ठाकरे आज कोल्हापुरच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे कोल्हापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत.
मोठी बातमी, राज्यात ठाकरे गट आणि वंचित आघाडीची युती होणार आहे. वंचित बहुजन प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी याची माहिती दिली आहे. आगामी काळीतील निवडणुका शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार आहे.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली.
उद्धव ठाकरे अडीच वर्षात आडीच तास खुर्चीवर बसले.
श्रद्धा वालियार हत्या प्रकरणी आफताबची नार्को टेस्ट होणार आहे. आरोपी आफताबची 1 डिसेंबर ला नार्को टेस्ट होणार आहे. नार्को चाचणी पूर्वीच्या सर्व तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. दिल्ली पोलीस आफताब ची नार्को टेस्ट करणार आहेत.
उद्या सकाळी 11 वाजता विरोधी पक्षांची बैठक, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. अजित पवार यांच्या दालनात ही बैठक होणार असुन काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गटाचे नेते सहभागी होणार आहेत.
१०० कोटींची खंडणी प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाने आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी २ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज एएसजी अनिल सिंग न्यायालयात हजर नसल्यामुळे सीबीआयने न्यायालयाकडे वेळ मागितला.
निपाणी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी (ता. ३०) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २९) सकाळी येथील शासकीय विश्रामधामात आंतरराज्य पोलिसांची (Police) बैठक झाली. त्यामध्ये सुनावणीनंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी या बैठकीत आंतरराज्य पोलिसांची चर्चा झाली. शिवाय, बुधवारी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. तरीही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी स्पष्ट केले. सकाळी नऊ वाजता या आंतरराज बैठकीला सुरुवात झाली. कर्नाटक-महाराष्ट्रातील सीमावर्ती जिल्ह्यांमधील पोलिस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
मनसेने फक्त स्वप्न पहावी, अस्तित्व नाही. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात असं ठाकरे गटाचे खासदार राऊत म्हणाले आहेत. ते रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनेच्या चिन्हाची पहिली सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर रिक्षा संघटनेचा वाद चव्हाट्यावर आला आहे. बेकायदा बाईक टॅक्सी मुळे होणाऱ्या त्रासाबद्दल रिक्षा संघटनांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडली आहे. राज ठाकरे यांनी रिक्षा संघटनांना मदतीचे आश्वासन दिलं आहे. तर या संदर्भात राज ठाकरे आणि रिक्षा संघटनांमध्ये चर्चा झाली आहे. यावेळी सर्व रिक्षा चालकांना यासंदर्भात सांगितलं नसल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.
शेतकरी दींडिच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारदेखील उपस्थित राहणार आहे.
भारत बायोटेकने असा दावा केला आहे की, iNCOVACC ही जगातील पहिली Nasal COVID vaccine आहे. ज्याला प्रायमरी सीरीज आणि हेट्रोलगस बूस्टर डोसच्या रूपात मान्यता देण्यात आली आहे.
पुण्यातील रिक्षा चालकांना चक्का जाम आंदोलन भोवलं आहे. पुण्यातील २५०० रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रिक्षा आंदोलन प्रकरणी विविध रिक्षा संघटनाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतुकीस अडथळा, नियमभंग करून आंदोलन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. काल पुण्यात आर टी ओ कार्यालयासमोर हजारो रिक्षा चालकांनी बेकायदा टॅक्सी विरोधात आंदोलन केले होते. कलम ३४१ अन्वये बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सांगली-जतचे आमदार विक्रमसिंह सांवतांनी मुख्यंमत्र्यांची भेट घेतली आहे. यावेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर सुरु असणारे प्रश्न, पाणी प्रश्न यावर चर्चा झाल्याचे सांवता यांनी सांगितले आहे.
गुजरातमधील गोध्रा हत्याकांडात पीडित असलेल्या बिल्किस बानो यांच्या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. गुजरात सरकारने आरोपींची शिक्षा माफ केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली होती. यावर गुजरात सरकारने गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाला आपलं उत्तर सादर केलं आहे.
जातीनिहाय जनगणना व्हावी अशी अमोल कोल्हेंनी मागणी केली आहे. पुण्यातील तळेगाव ढमढेरे येथील कार्यक्रमात अमोल कोल्हेंनी वक्तव्य केलं आहे.
बेकायदा बाईक टॅक्सी मुळे होणाऱ्या त्रासाबद्दल रिक्षा संघटनांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडली आहे. राज ठाकरे यांनी रिक्षा संघटनांना मदतीचे आश्वासन दिलं आहे. तर या संदर्भात राज ठाकरे आणि रिक्षा संघटनांमध्ये चर्चा झाली आहे.
पुण्यातील राज महाल या राज ठाकरे यांच्या निवासस्थनाथून ११ वाजता दौऱ्याला होणार सुरुवात झाली आहे. साताऱ्यातील पक्षाच्या काही पदाधिकाऱ्याना भेटून राज ठाकरे संध्याकाळी कोल्हापुरात पोहचणार आहेत. उद्या सकाळी राज ठाकरे घेणार महालक्ष्मी देवी चे दर्शन आणि कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. तर उद्या रात्री राज ठाकरे संध्याकाळी सावंतवाडी मध्ये पोहचणार असुन पुढील ८ दिवस राज ठाकरे देणार कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांना भेटी देणार असुन ते ९ डिसेंबर रोजी मुंबईत परतणार आहेत.
ठाणे अंबरनाथमध्ये मंदिराशेजारी कब्रस्तानला विरोध करण्यात आला आहे.
सांगलीतल्या जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकमधील मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. दरम्य़ान या प्रकरणावरील प्रलंबित सुनावणी उद्या सुप्रीम कोर्टात होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज दिल्लीत दाखल होणार आहेत.
नेमकी शिवसेना कोणाची? या प्रश्नावरती गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हं गोठवलं. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वेगळी नावे आणि चिन्हे दिली. त्यानंतर ठाकरे गटकडून शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्रत ठरवण्यासंबधी याचिका दाखल केली होती. याच 16 आमदारांना अपात्रतेच्या संदर्भात आज न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. तब्बल पाच वर्षानंतर राज ठाकरे कोल्हापुरात येत असल्यानं त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.