Breaking News  Sakal
देश

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली टिळक कुटुंबीयांची भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यात होते. कोथरूड या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमानंतर फडणवीस थेट केसरी वाड्यावर पोहचले. त्यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेवून चर्चा केली.

सुषमा अंधारेंचं चंद्रकांत पाटलांवर टीकास्र

बोललेले शब्द मागे घ्यायला मी काही चंद्रकांत पाटील नाही, अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर शरसंधान साधलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली.

बँकांच्या स्थितीबाबत आरबीआयचं स्पष्टीकरण

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. तसेच अनेक बँकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. यापार्श्वभूमीवर सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं भारतातील बँकांची स्थिती नेमकी कशी आहे? याबाबत पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. आरबीआयनं म्हटलं की, काही बातम्यांमधून देशातील बँकिंग सेक्टरबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पण आरबीआय या सर्व बँकांवर नियंत्रण आणि आर्थिक स्थिरतेसाठी त्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचं काम करत आहे.

मुख्यमंत्र्यांचे भाषण संपताच विदर्भवादी महिलांचा गोंधळ

वर्धा इथं आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज पहिला दिवस होता. मात्र हा पहिलाच दिवस विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळे चर्चेत आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी हा गोंधळ झाला. यावेळी विदर्भवादी महिलांनी मोठा गोंधळ घातला.

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी सुरुच 

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक : उमेदवार डॉ. प्रवीण चौधरी बाद झाले आहेत. धीरज लिंगाडे - ४४ हजार ८७७, डॉ. रणजीत पाटील - ४२ हजार ३१७ यांना मत मिळाली आहेत. अजूनही कोटा (४७ हजार १०१ मते ) पूर्ण नसल्यामुळं सद्य:स्थितीत उर्वरित उमेदवारांत सर्वात कमी मते असलेल्या उमेदवाराची (अनिल अमलकर, ४ हजार ३३८ मते ) दुसऱ्या पसंतीची मत गणना सुरू आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावेळी गोंधळ

एकनाथ शिंदे म्हणाले, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगळे व्यासपीठ आहे. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे २४ तास उघडे आहे. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, कृपया तुम्ही गोंधळ घालू नये.

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या घरात फूट? पत्नी आणि भावाचा सोशल मीडियावर प्रचार

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या घरात फूट पडली की काय अशी चर्चा चिंचवडमध्ये रंगू लागली आहे. कारण भाजपने कोणताही उमेदवार जाहीर केला नाही मात्र. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि भावाचा सोशल मीडियावर जोरदार प्रचार चालू झाला आहे. त्यामुळे आता भाजप केणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कसबा पोटनिवडणूकीसाठी भाजप-शिंदे गटात महत्त्वाची बैठक सुरू

कसबा विधानसभा पोटनिवडणूकी संदर्भात पुण्यात आज महत्त्वाची बैठक चालू आहे. ही बैठक भाजप आणि शिंदे गट यांच्यात बैठक सुरू आहे. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहर अध्यक्ष योगेश मुळीक, गणेश बिडकर, धीरज घाटे, शैलेश टिळक यांच्यासह शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे उपस्थितीत आहेत.

सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारी वरून अजित पवारांनी केला गैप्यस्फोट

सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारी वरून अजित पवारांनी केला गौप्यस्फोट केला आहे. सत्यजीतला उमेदवारी दया असं स्वत: पवार साहेबांनी मल्लिकार्जून खर्गेंना फोन करून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली आणि तिथंच गडबड झाली. असो आताही काँग्रेसनं फार ताणून धरू नये, आणि सत्यजीतला पुन्हा सोबत घ्यावं असं मला वाटतं पण अंतिम निर्णय हा सत्यजीतनेच घ्यायचा आहे.

पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर

बावनकुळेंच्या दौऱ्यात कसबा आणि चिंचवडचा उमेदवार ठरण्याची दाट शक्यता आहे.

दुपारी एक वाजता बावनकुळे पुण्यात येणार.

तसेच दुपारी तीन वाजता भाजप महिला मोर्चा कार्यकारणीच्या बैठकीला लावणार उपस्थिती राहणार आहेत.

मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची धमकी

मुंबईला पुन्हा दहशदवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा ई-मेल आला आहे. एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुसऱ्या दिवसशी ही अमरावती पदवीधरचा निकाल नाही?

अमरावती पदवीधरचा निकालचा आज दुसरा दिवस उजाडला असला तरी देखील निकाल लागला नाही. त्यामुळे उमेदवाराचं टेन्शन वाढलं असून कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे.

"मी कुणालाच घाबरत नाही" पंकजा मुंडेंचा रोष कोणाकडे

मी या जगात कोणालाही घाबरत नाही. त्यामुळे वाद घालण्यात अर्थच नाही. असं पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनात हे विधान केलं आहे.

रामदेवबाबांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; नमाज पडा अन्...

बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते राजस्थानच्या बाडमेरमध्ये म्हणाले की, मुस्लिम दहशतवादी असला तरी तो नमाज अदा करतो. तुम्ही हिंदूंच्या मुली उचला, किंवा जिहादच्या नावाखाली दहशतवादी व्हा, असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT