आज मध्यरात्री पासून राज्यातील वीज जाण्याची शक्यता आहे. कारण वीज कर्मचारी हे संपावर जाणार आहे. वीज कंपन्यांचे खाजगीकरण होऊ नये या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. पुण्यातल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड होती. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन घेतले पार्थिवाचे दर्शन घेतले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्याच्या कार्यक्रमानंतर पुण्यातील केसरी वाड्या येथे येऊन मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली. मुक्ता टिळक यांच मागील काही दिवसांपुर्वी निधन झालं आहे.
पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, या ५ जणांपैकी काही आरोपी हे रेकॉर्ड वरचे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जानेवारी रोजी काही तरुणांची आपापसात किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणाचा मनात राग ठेऊन या आरोपींनी नवा वाडा य ठिकाणी जाऊन हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
गिरीश महाजन यांच्याकडून निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये तोडगा निघाला तर ठीक नाहीतर उद्यापासून अतिदक्षता विभागही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. केसरी वाड्यात आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी टिळक कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
संजय राऊत आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. परंतु त्यांच्यामुळे कोणताही फरक पडणार नाही. आगामी लोकसभा निवडणुका आम्ही म्हणजेच शिंदे गट आणि भाजपा युतीत लढणार असल्याचंही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.
बीडमध्ये लाईव्ह व्हिडिओ करत शेतकऱ्याचा आत्महतेचा प्रयत्न केला आहे. सध्या या शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. शेताची लाइट तोडल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्यांच्यामुळे आम्ही लिहू, वाचू शकतो आहे, ज्यांच्यामुळे व्यवस्थेला आम्ही ठामपणे प्रश्न विचारू शकतो अशा माऊलीचा जन्मदिवस आहे. म्हणून आम्ही माहेरी येऊन अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. महिलांचे प्रश्न अजूनही अनुत्तरीत का आहेत? राजकीय विधिमंडळ महिलांसाठी एक टक्का का असू नये. पुरुष सत्तेचे वाहक प्रबळ आहेत का की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. महिला आयोग फारसा सक्रिय दिसत नाही तसेच महिला व बालकल्याण मंत्रालय सक्रिय झालेल्या दिसत नाही असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
दादरमध्ये अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपकडून आंदोलन करण्यात आलं होतं.
नागपूरमध्ये सीबीआयची छापेमारी करण्यात आली आहे. नागपूर वेस्टर्न कोल्ड फील्डच्या अधिकाऱ्यावर सीबीआयचा छापा टाकण्यात आला आहे. आधिकारी MP नवले यांच्या कार्यालयात छापा टाकण्यात आला आहे
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दु. 3 ते 6 या वेळेत पार्थिव त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्या 7 वाजता अंत्यविधी पिंपरी गुरव येथे होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लक्ष्मण जगताप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एक निष्ठावंत आपल्याला कायमचा सोडून गेला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
भारत स्टार्टअपच्या बाबतीत जगात पहिल्या तीन देशांमध्ये आहे. ज्ञानातून जगाचा विकास करणं हेच संशोधकांच कर्तव्य आहे. आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान विकसित होत आहे. तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ हे एकमेकांना पूरक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने एका तरुणीचा मृत्यू झालाय, ते पाहून देश हादरुन गेला. याप्रकरणी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घातलेलं असून यंत्रणेला आदेश दिले आहेत. यामध्ये नवनवे खुलासे समोर येत आहेत. स्कूटीवर पीडितेसोबत तिची आणखी एक मैत्रीण तिच्यासोबत प्रवास करत होती, असं दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.
गेल्या काही दिवसांत थंडी वाढत चालली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून गेल्या दोन दिवसांपासून सात पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद जिल्ह्यात होत आहे. महाराष्ट्रात थंडीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.