indias approach to g20 presidency domestic focus on progress and development pm modi leadership esakal
देश

Marathi News Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

जी-२० परिषदेत सामीर होणारे नेते राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे घेणार दर्शन

जी-२० शिखर परिषदेत सामील होणारे जगभरातील नेते राजघाटवरील महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत 'खेला'होणार, ममता बॅनर्जींचा इशारा

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी सध्या मुंबईत आलेल्या आहेत. यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकांबाबच प्रश्न करण्यात आला. यावर त्यांनी "खेला होगा" अशी प्रतिक्रिया दिली.

भारतीय सेनेकडून पोखरणमध्ये फायरिंग टेस्ट

भारतीय सेनेची राजस्थानच्या पोखरण भागात फायरिंग टेस्ट पार पडली आहे. या टेस्टमध्ये रणगाड्यांचा वापर करण्यात आला. याबाबत एएनआयने व्हिडीओ शेअर केला आहे.

ममता बॅनर्जींकडून अमित बच्चन यांचा 'भारतरत्न'म्हणून उल्लेख

ममता बॅनर्जी यांनी नुकतीच अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आनंद व्यक्त केला. ममता बॅनर्जींनी यावेळी बोलताना अमिताभ बच्चन यांना भारतरत्न म्हणून संबोधित केले.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी मुंबईत दाखल

मुबंईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सामील होण्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्या आहेत. यावेळी आदित्य ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी ममता बॅनर्जींचं स्वागत केलं.

'आम्हाला भारताच्या विकासाचा भाग व्हायचंय', न्यूझिलंड शिष्टमंडळाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली इच्छा

न्यूझिलंडच्या व्यापारी शिष्टमंडळाचे अध्यक्ष मायकल फॉक्स म्हणाले की, "आम्हाला भारताच्या विकासाचं भाग व्हायचय."

'जसे इंडिया आघाडी पुढे जाईल तसे केंद्र सरकार सिलेंडर फ्री देऊन टाकेल'-उद्धव ठाकरे

'गॅस सिलेंडर किंमत कमी झाली. जसे इंडिया आघाडी पुढे जाईल तसे केंद्र सरकार सिलेंडर फ्री देऊन टाकेल. सरकार सध्या गॅस वर आहे.नऊ वर्ष बहिणीची आठवण आली नाही, नऊ वर्ष रक्षाबंधन झाले नव्हते भाऊबीज नव्हती झाली का? आता का?' असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय.

महिला कुस्तीपटूंना सुरक्षित वाटावे म्हणून आम्ही एकत्र आलो- उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की महिला कुस्तीपटूंना सुरक्षित वाटावं म्हणून आम्ही एकत्र आलो.

आघाडीत २८ पक्ष एकत्र आले आहेत- अशोक चव्हाण

आघाडीत आधी २६ पक्ष होते, आता २८ पक्ष आहेत अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरु

मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यावेळी शरद पवार देखील या बैठकीला उपस्थित आहेत.

मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना बांधली राखी

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु.आदीतीताई तटकरे यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

मुंडे व तटकरे या दोनही कुटुंबात कायम स्नेह व ऋणानुबंध पाहायला मिळाले आहेत. ताई, तुझा हा भाऊ कायम पाठीशी आहे व पुढेही राहील, असा शब्द यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी आदीतीताई यांना दिला आहे.

पंतप्रधान मोदींनी लहानग्यांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लहान मुलींनी राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला.

आंबिवलीमध्ये पोलिसांवर दगडफेक

कल्याणच्या आंबिवली भागातील इराणी वस्तीत मुंबई पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. एका गुन्हेगाराला अटक करण्यासाठी DN नगर पोलीस याठिकाणी गेले होते. यावेळी त्यांना विरोध करण्यासाठी त्यांच्यावर दगडफेक झाली. मात्र या सर्व गदारोळात देखील पोलिसांनी गुन्हेगाराला धाडसाने ताब्यात घेतले. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

कुर्ला परिसरात पूर्व वैमनस्यातून गोळीबार; आरोपी फरार

कुर्ला परिसरात पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष पवार नावाच्या इसमाने गणेश पवार वर गोळीबार केला आहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. कुर्ल्याच्या मासरानी लेन येथे ही घटना घडली.

गोळीबारानंतर आरोपी आशिष पवार हा फरार असून आशिष पवार आहे अभिलेखावरील गुन्हेगार आहे. दरम्यान वि बी नगर पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

विरोधी पक्षनेते वडट्टेवार मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला

विरोधी पक्षनेते विजय वडट्टेवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहचले आहेत. सह्यार्थी अतिथीगृह येते ही बैठक होत असून मंत्री मंगलप्रसाद लोढा हे देखील यावेळी उपस्थित आहेत. दरम्यान ही बैठकीमागील कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत.

मुस्लिम महिलांनी देवेंद्र फडणवीसांना राखी बांधत साजरं केलं रक्षाबंधन

मुस्लिम महिलांनी देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरा केले .

पंकजा मुंडे पुन्हा सक्रीय; 11 दिवसांच्या ‘शिवशक्ती’ दौऱ्याला आजपासून सुरुवात

पंकजा मुंडे यांनी गेल्या दोन महिन्यापासून राजकीय जीवनातून ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे अॅक्टिव्ह झाल्या आहेत. पंकजा मुंडे आता जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. शिवशक्ती दर्शन हा 11 दिवसांचा दौरा पंकजा मुंडे करतील. आज नांदेडमधून त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली आहे.

उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला मेघदुत बंगल्यावर दाखल

उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला मेघदुत बंगल्यावर दाखल झाले आहेत.

विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने तिघांचा मृत्यू

विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. मंदिरात झेंडा चढवत असतांना ही घटना घडली आहे. वर्धेच्या पिपरी मेघे येथील तुळजाभवानी मंदिरातील घटना आहे. सकाळी आठ वाजता ही घटना घडली आहे. तिघे मंदिराचा झेंडा लावत असतांना झेंड्याचा लोखंडी खांब विद्युत ताराला लागला त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; चार जणांचा मृत्यू

पिंपरी चिंचवडच्या चिखलीमधील सचिन हार्डवेअरच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.

लग्न मोडल्याने ३२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

लग्न मोडल्याने ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या संगमनेर येथील वडगावपान येथील ही घटना आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT