sakal breaking notifiction esakal
देश

दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे Live Update

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतल्या सायनमध्ये रुग्णालयाला आग

मुंबईतल्या सायनमधील सोमय्या हॉस्पिटलच्या निर्माणाधिन इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

कोकणासाठी उद्धव ठाकरेंनी काहीही केलं नाही- फडणवीस

पुढचा आमदार आणि खासदार आपलाच होईल. त्याचबरोबर चिपी विमानतळाच श्रेय नारायण राणे यांना दिलं पाहिजे. भराडीदेवीने आम्हाला कौल दिल्याने आम्ही सत्तेत आलो आहोत. उद्धव ठाकरेंनी कोकणासाठी काहीही केलं नाही. कोकणासाठी राणेंनी काय केलं ते सर्वांनी पहिलं. आपण रस्ते, वाहतूक, मूलभूत सुविधा आपल्या काळात आणल्या. त्यांनी काही केलं नाही. त्यांचं प्रेम बेगडी आहे. त्यांनी रिफायनरीला विरोध केला.

तांबेंना दिलेले एबी फॉर्म योग्यच; काँग्रेसचं स्पष्टीकरण

सत्यजीत तांबे यांच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी तांबे यांना दिलेले कोरे एबी फॉर्म त्यांनी दाखवले. लोंढे म्हणाले की, सत्यजीत तांबे यांना एबी फॉर्मचे फोटोही पाठवण्यात आले होते. त्यावर ते ओके म्हणालेले. परंतु वडिलांच्या जागेवर मी का लढवू, असं तांबे म्हणाल्याचं लोढेंनी सांगितलं. शिवाय त्यांनी कोणत्याही मुद्द्याचं व्यवस्थित उत्तर दिलं नसल्याचा आरोप लोंढेंनी केला.

माझ्याकडेही भरपूर मसला; तांबे प्रकरणावर पटोले बोलले

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील खडकवासला येथे बैठक पार पडत आहे. यावेळी नाना पटोले यांना सत्यजीत तांबे यांनी केलेल्या आरोपांवर विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले. माझ्याकडे भरपूर मसाला आहे. मी यापूर्वीही इशारा दिला होता की, मला बोलायला लावू नका. घरातील वाद बाहेर आणू नका, अस सांगतानाच पटोले यांनी तांबेंच्या आरोपांवर आमचे प्रवक्ते बोलतील अशी भूमिका घेतली.

अपक्ष म्हणूनच काम करणार- सत्यजीत तांबे

आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि अपक्ष म्हणूनच भविष्यात काम करणार आहे, असं सत्यजीत तांबे यांनी आज पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं आहे.

एबी फॉर्म चुकीचे देण्यात आले होते, सत्यजीत तांबेंचा गौप्यस्फोट

''सत्यजित तांबे लढतील की सुधीर तांबे हे ठरलेलं नव्हतं. त्यानंतर मला 9 जानेवारीला एबी फॉर्म द्यावा असं पदेशाध्यक्षांनी सांगितलं. तर 11 तारखेला फॉर्म मिळाले. एबी फॉर्म चुकीचे देण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजित तांबे यांनी केला आहे. हे फॉर्म चुकीचे आल्याचेही त्यांनी पक्षाला कळवले होते. ते म्हणाले जर मला अपक्ष फॉर्म भरायचा असता तर मी प्रदेश कार्यालयाला चुकीचा फॉर्म आल्याचं कळवलं नसतं'' असं सत्यजित तांबे म्हणाले.

हेमंत रासने यांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

कसबा पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांनी उमेदवारी जाहीर केल्यावर रासने यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली आहे.

PM मोदींनंतर CM योगी पंतप्रधानपदावर दावा करणार?

पंतप्रधान मोदी यांच्यानंतर भाजपकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे. काहीजण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना तर काहीजण यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोदींनंतरचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणताहेत. अनेक ठिकाणी भाजपच्या अन्य मुख्यमंत्र्यांचीही चर्चा आहे. पण, सीएम योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी पीएम मोदींनंतर ते देशाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार की नाही हे स्पष्ट केलंय. एका खासगी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सीएम योगी यांनी पंतप्रधान पदाच्या दाव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. सीएम योगी आदित्यनाथ यांनी असंही म्हटलंय की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप यूपीमध्ये 2019 पेक्षा जास्त जागा जिंकेल. मुख्यमंत्री योगी म्हणाले, मी कोणत्याही पदासाठी दावेदार नाहीये. मला फक्त यूपीमध्ये राहण्याची इच्छा आहे.

मुंबईच्या दहिसरमध्ये अग्निशमक दलाच्या भरती दरम्यान गोंधळ

मुंबईच्या दहिसरमध्ये अग्निशमक दलाच्या भरती दरम्यान गोंधळ झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुलींचा आक्रोश पाहिला मिळत आहे. मैदानी परीक्षेत १६२ सेमी उंचीची अट आहे मात्र त्यापेक्षा जास्त उंची असून ही मुलींना बाद ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे मुलींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

BMC Budget 2023 : बजेटमधील महत्वाच्या घोषणा 

  • कोस्टल रोड: रु. 3,553.26 कोटी

  • मुंबई सीवरेज डिस्पोजल प्रकल्प: रु. 3,591.86 कोटी

  • घनकचरा व्यवस्थापन विभाग: 4,710.25 कोटी रुपये

  • स्ट्रॉम वॉटर ड्रेन विभाग: 3,266.15 कोटी रुपये

  • डीपी विभाग: रु 1,320.20 कोटी

  • रस्ते आणि वाहतूक: रु. 3,630.71 कोटी

  • पूल: रु. 3,179.81 कोटी

  • अग्निशमन दल: 666.27 कोटी रुपये

  • गार्डन आणि प्राणीसंग्रहालय: 712.93 कोटी रुपये

BMC Budget 2023 : इतिहासात प्रथमच, BMC ने 50,000 कोटी रुपयांचे बजेट सादर केले

BMC Budget 2023 : पुढील 3 वर्षांत, बीएमसी मुंबईत 100% काँक्रीटीकरण करेल : इक्बाल सिंग चहल 

जानेवारी अखेरपर्यंत मुंबईत सुमारे 990 किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले असून 397 किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी आम्ही आधीच वर्क ऑर्डर दिली आहे. पुढील 3 वर्षांत, बीएमसी मुंबईत 100% काँक्रीटीकरण करेल." महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल म्हणाले.

BMC Budget 2023 : सर्व प्रमुख रस्त्यांवरील फूटपाथ

BMC 9 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या सर्व प्रमुख रस्त्यांसाठी फूटपाथ सुविधांचा नकाशा तयार करेल आणि जेथे फूटपाथ सुस्थितीत नसल्याचे आढळून येईल, तेथे फूटपाथ जलदगतीने तयार केले जातील.

BMC Budget 2023 : 'आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पारदर्शकता हे आमच्या बजेटचे चार स्तंभ आहेत': चहल

"आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पारदर्शकता - हे आमच्या बजेटचे चार स्तंभ आहेत," असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी अर्थसंकल्प सादरीकरणानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

BMC Budget 2023 : बीएमसीच्या आणखी 50 शाळांना मिळणार ई-लायब्ररी

10 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह, 2023-24 या वर्षात बीएमसी अंतर्गत 50 प्राथमिक शाळांमध्ये ई-लायब्ररी, जी इंटरनेट सुविधांसह असेल. 2022-23 मध्ये बीएमसीच्या 25 शाळांपासून सुरुवात झाली.

BMC Budget 2023 : BMC च्या अर्थसंकल्प अंदाजपत्रकाचा आकार

BMC Budget 2023

BMC Budget 2023 : रस्ते सुधारणेसाठी तरतूद 

2023-241 मध्ये सुधारणेसाठी प्रस्तावित प्रमुख रस्ते : 1) लेडी लक्ष्मीबाई जगमोहन मार्ग 'बी. जी. खेर मार्ग 2) नारायण दाभोलकर मार्ग 3) भास्कर भोपी रोड 4) पश्चिम उपनगरातील लिंक रोड 5) एम. एन. रोड 6) डी. पी. रोड क्र. 9 7) B. R. रोड 8) N.B. पूर्व उपनगरातील पाटील मार्ग.

BMC Budget 2023 : बेस्टसाठी बजेटमध्ये मोठी तरतूद 

सार्वजनिक वाहतूक किती महत्त्वाची आहे, याचा विचार करून, बेस्टला त्यांच्या कामकाजात मदत करण्यासाठी 2023-24 च्या अंदाजपत्रकात 800 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

BMC Budget 2023 : गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी तरतूद

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 1,060 कोटी रुपयांची तरतूद

BMC Budget 2023 : मुंबई स्वच्छ हवा उपक्रम तीन व्यापक उद्दिष्टांसाठी काम करेल

1) विविध क्षेत्रांमधील प्रदूषण पातळीला आळा घालण्यासाठी; 2) शहरासाठी बहु-स्तरीय देखरेख धोरण सुरू करणे 3) आरोग्य जागरूकता वाढवणे.

BMC Budget 2023 : इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन

2023-24 मध्ये BMC च्या मालकीच्या सार्वजनिक पार्किंग भागात इलेक्ट्रिक वाहनांसाठी अधिक चार्जिंग स्टेशन असतील असे BMC बजेटमध्ये नमूद केले आहे.

BMC Budget 2023 : मुंबई अग्निशमन दलाच्या वाटपात 30% घट

बीएमसीने 2023-24 च्या बजेटमध्ये मुंबई फायर ब्रिगेडला (MFB) 227.07 कोटी रुपये दिले आहेत, जे गेल्या वर्षीच्या वाटपाच्या तुलनेत अंदाजे 30 टक्के कमी आहेत.

BMC Budget 2023 : महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्यासाठी तरतूद 

- महिला बचतगट - 11.65 कोटी 
- महिला अर्थ सहाय्य योजना - 100 कोटी 
- दिव्यांग व्यक्तीसाठी अर्थ सहाय्य 25.32 कोटी 
- तृतीय पंथीयांसाठी पहिल्यांदाच अर्थ सहाय्य 2 कोटी
- ज्येष्ठ नागरिक - 11 कोटी 
- महिलांसाठी प्रशिक्षण योजना 6.44 कोटी

BMC Budget 2023 : शिक्षण विभाग अंतर्गत नवीन योजना व प्रकल्प

- बीएमसी शाळेतील मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार
- बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास यावर अधिक भर दिला जाणार
- मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअरची निर्मिती
- दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता साहित्य खरेदी केली जाणार
- बीएमसी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, बोलक्या संरक्षण भिंतीची निर्मिती, नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्र उभारणी केली जाणार

BMC Budget 2023 : 88 प्राथमिक शाळांमध्ये गणित आणि विज्ञान केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत

महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, 2023-24 या वर्षासाठी 88 प्राथमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर गणित आणि विज्ञान केंद्रे स्थापन करण्याचा उपक्रम प्रस्तावित आहे. या उपक्रमाचा उद्देश शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि BMC प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे निरीक्षण, एकाग्रता आणि सर्वसमावेशक कौशल्ये, चौकसता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा आहे.

BMC Budget 2023 : पायाभूत सुविधांच्या कामासाठी 27,247.80 कोटी 

पायाभूत सुविधांच्या कामासाठी 27,247.80 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. ज्यामुळे महागडे रस्ते, पाणी आणि मलनिस्सारण बोगदे, मिठी नदी प्रकल्प, नद्यांचे पुनरुज्जीवन, रुग्णालय विकास यासारखे मोठे प्रकल्प जलद पूर्ण होण्यास मदत होईल.

BMC Budget 2023 : नवीन शिक्षण प्रकल्प सुरु करणार 

BMC शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण, माध्यमिक शाळांमधील कौशल्य विकास केंद्र (28.45 कोटी), सर्व BMC शाळांमधील विद्यार्थी, कर्मचारी यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी CCTV कॅमेरे बसवले जातील (प्राथमिक अर्थसंकल्पात 1 कोटींची तरतूद).

BMC Budget 2023 : नवीन आरोग्य उपक्रम - आरोग्यम कुटुंबम

आरोग्यम कुटुंबम या उपक्रमाने समुदाय आधारित लवकर तपासणी, जागरूकता वाढवणे, आरोग्य जीवनशैली आणि नवीन उपचार प्रोटोकॉल यासारख्या धोरणांचा अवलंब करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

BMC Budget 2023 : विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि  क्रीडा संकुलाची घोषण

2022-23 मध्ये प्रगतीपथावर असलेले शैक्षणिक प्रकल्प आर्थिक वर्ष 23-24 मध्ये सुरू राहतील. यासह- IGCSE आणि IB बोर्डासाठी प्रत्येकी एक शाळा, पश्चिम उपनगरांसाठी एक क्रीडा संकुल, 54 खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती FY 23-24 मध्ये पूर्ण होईल.

BMC Budget 2023 : BMC डिजिटल क्लासरूम कार्यक्रम सुरू करणार

BMC ने आपल्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात एक डिजिटल क्लासरूम कार्यक्रम जाहीर केला आहे. ज्या अंतर्गत शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक पद्धतशीर डेटाबेस तयार केला जाईल आणि LED स्मार्ट बोर्डद्वारे वर्ग आणि अभ्यासक्रम चालवले जातील.

गेल्या वर्षी, बीएमसीने आपल्या बजेटमध्ये समान अजेंडा असलेल्या 'व्हर्च्युअल क्लासरूम' कार्यक्रमाची घोषणा केली होती. या प्रकल्पाला माजी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचा पाठिंबा होता. मात्र, मागील प्रकल्पाला वर्षाच्या मध्यातच कात्री लावण्यात आली होती आणि केवळ नाव बदलून असाच प्रस्ताव मांडण्यात आल्याचे दिसून येत आहे.

BMC Budget 2023 :  नागरी रुग्णालयात नवीन कामे

केईएम, नायर आणि सायन येथे प्रत्येकी 3-टेस्ला M.R.I सोबत प्रत्येकी 15 कोटी रुपये खर्चून प्रगत C.T.Scan मशीन खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत आगाऊ चाचण्या देण्यासाठी केईएम, नायर आणि सायन येथे प्रत्येकी 25 कोटी रुपये खर्चाची मशीन बसवल्या जातील.

BMC Budget 2023 : बीएमसीची 'मुंबई क्लीन एअर इनिशिएटिव्ह'ची घोषणा

BMC ने 2023-24 च्या अर्थसंकल्पात 'मुंबई क्लीन एअर इनिशिएटिव्ह' ची घोषणा केली आहे जी तीन व्यापक उद्दिष्टांसाठी काम करेल - प्रदूषण रोखणे, शहरासाठी एक बहु-स्तरीय देखरेख धोरण सुरू करणे आणि आरोग्य जागरूकता करणे.

मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सुरू, महापालिकेचं बजेट 52619 कोटी

मुंबई महानगरपालिकेचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्पीय अंदाज

यंदाचा बजेट 52619.07 कोटी

यंदा 14.52% ने वाढला

मुंबई महानगरपालिकेचा सन २०२३-२४ चे अर्थसंकल्पीय अंदाज (प्राथमिक शिक्षण)

यंदाचा बजेट ३३४७.१३ कोटी रुपये

गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत २३.११ कोटींची घट

अफगाणिस्तानमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप

अफगाणिस्तानमध्ये आज सकाळी 9.07 च्या सुमारास 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 186 किमी किमी होती: नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी

नांदेड जिल्ह्यातील मुखेड - लातूर महामार्गावर एसटी बस अन् ट्रक कंटेनरचा भीषण अपघात 

राज्यात मागील काही दिवसांपासून बस अपघाताच्या घटनांमध्ये वाढतच चालली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड - लातूर महामार्गावर कंटेनर आणि महामंडळच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात काल सायंकाळी सहाच्या सुमारास दबडे शिरुर पाटी जवळ झाला आहे. या अपघातात ९ प्रवासी जखमी झाले असून त्यात दोन अतीगंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पुण्यात वाहतूक नियमन करताना पोलिस उपनिरीक्षकाचे निधन

वाहतुकीचे नियमन करीत असताना हृदयविकाराच्या झटक्यामुळे एका पोलिस उपनिरीक्षकाचे निधन झाले. ही घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ सेनापती बापट जंक्शन येथे शुक्रवारी (ता. ३) दुपारी घडली. सुनील पंढरीनाथ मोरे (वय ५७, रा. शिवाजीनगर गावठाण, जोशी आळी, पुणे) असे त्यांचे नाव आहे. ते चतु:शृंगी वाहतूक विभागात कार्यरत होते. ते शुक्रवारी सकाळी आठ वाजता ड्यूटीवर आले. सेनापती बापट जंक्शनजवळ चौकात वाहतूक नियमन करताना दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्यांचा अचानक डावा खांदा दुखत होता.

ते अचानक चक्कर येऊन खाली पडले. तेव्हा त्यांच्यासोबत असलेले पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी त्यांना रिक्षामधून सेनापती बापट रस्ता येथील रत्ना मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुनील मोरे यांना नुकतीच खातेअंतर्गत पदोन्नती मिळाली होती.

भाजपसह काँग्रेस देखील आज जाहीर करणार पोटनिवडणुकीसाठी उमेदवार

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नुकतीच टिळक कुटुंबियांची भेट घेतली.

यानंतर लगेचच काँग्रेसच्या गोटातूनही हालचाली झाल्या असून आज काँग्रेसचाही उमेदवार जाहीर होईल असं सांगितलं जात आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT