देश

Maharashtra Blog Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, 2 वर्षांच्या शिक्षेला दिली स्थगिती

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली शहराला जाणवले भूकंपाचे झटके

दिल्ली शहराला आज भूकंपाचे झटके जाणवले आहेत. दिल्ली एनसीआर भागात ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग या ठिकाणी असल्याची माहिती मिळतीये.

मुंबई लोकलमध्ये प्रवाशांचा खोळंबा, हर्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवांशाचा खोळंबा झालाय. हर्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर लाईनवरील रुळाला तडे गेल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

'जर तुमच्यात हिंमत असेल तर सिद्ध करुन दाखवा', भाजपच्या खासदाराचे ममता बॅनर्जींना आव्हान

भारतीय जनता पक्षाचे खासदार सुकांत मजुमदार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट आम्हान दिले आहे. ममत बॅनर्जींनी EVM हॅक होऊ शकतं असे पुरावे असल्याचा दावा केला होता. यावर सुकांत मजुमदार म्हणाले की, "जर तुमच्या हिंमत असेल तर सिद्ध करुन दाखवा. जा निवडणूक आयोगाकडे आणि द्या त्यांना पुरावे. जर आम्ही EVM हॅक करु शकत असतो,तर २१मध्येत निवडणूर जिंकलो असतो."

अमित शाह पुण्यात दाखल, उद्या शासकीय पोर्टलचं करणार उद्घाटन

अमित शाह आज पुण्यात दाखल झाले आहेत. उद्या ते एका शासकीय पोर्टलचं उद्घाटन करतील.

हरियाणामधील उफाळलेल्या हिंसाचारात ११२ जणांविरोधात गुन्हे दाखल, सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष्य

हरियाणाचे मुख्यमंत्री दुष्यंत कुमार यांनी माध्यमांना माहिती दिली. त्यांनी माहिती दिली की आतापर्यंत या हिंसाचारात ११२ जणांविरोधात एफआय़आर नोंदवण्यात आली आहे आणि प्रशासन समाज माध्यमांवर होणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेऊन आहे.

महाराष्ट्र ISIS मोड्यूलमध्ये सहाव्या संशयिताला अटक, आणखी दोन जणांच्या अटकेची शक्यता

महाराष्ट्रामध्ये ISIS मोड्यूलशी संबंध असल्याच्या आरोपाखाली आणखी २ जणांना अटक कऱण्यात आली आहे. याआधी चौघांना अटकेत घेऊन कोठडीच रवानगी करण्यात आली होती. एनआयएने शनिवारी (दि.५ ऑगस्टला) अकिफ अतिक नाचन याला अटक केली. आणखी दोन जणांचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.

ईडन गार्डन्स मैदानाची आयसीसी आणि बीसीसीआयकडून पाहणी, विश्वचषकाची तयारी सुरु

यंदाचा विश्वचषक भारतात होणार आहे. त्यासाठी ईडन गार्डन्स या मैदानाची आयसीसी आणि बीसीसीआयकडून पाहणी करण्यात येणार आहे.

एटीएसने पकडेल्या चौघांनाही ११ तारखेपर्यंत कोठडी, ISIS संघटनेशी संबंध असल्याच्या चर्चा

काही दिवसांपूर्वी चार जणांना दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता या चौघांना ११ तारखेपर्यंत कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी दोन जणांना पुणे पोलिसांनी कोथरुडमधून अटक करण्यात आली होती.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना अटक, तोशाखाना प्रकरणातील दोष सिद्ध

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि नावजलेले क्रिकेटपटू इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे. तोशाखाना प्रकरणात त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणात दोष सिद्ध झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली आहे.

गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले, पाण्याची पातळी वाढली

गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

पुण्यात मद्यधुंद तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुण्यात एका मद्यधुंद तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड येथील कै. आमदार रमेशभाऊ वांजळे पुलावरून या मद्यधुंद तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आज तरुणाचे प्राण वाचले.

Pune

मुंबईत 'इंडिया'ची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर होणार महत्वाची बैठक

मुंबईतील हयात हॉटेल इथं 'इंडिया'ची बैठक होणार आहे. ३१ ऑगस्ट आणि एक सप्टेंबर अशी दोन दिवसीय बैठक असणार आहे.

रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

 ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते, माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. सध्या वायकर हे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

प्रदीपसिंह वाघेला यांनी गुजरात भाजपच्या सरचिटणीस पदाचा दिला राजीनामा

गुजरात : प्रदीपसिंह वाघेला (Pradipsin Vaghela) यांनी नुकताच गुजरात भाजपच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तयारीत असलेल्या भाजपला हा मोठा झटका बसला आहे.

मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं समजतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड सेंटर प्रकरणात मृतदेहां्या बॅग खरेदी विक्री प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर येत आहे.

महानगरपालिकेवर काँग्रेसचा मोर्चा, पायाभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप

मुंबईत काँग्रेसच्या वतीनं महानगरपालिकेच्या जी उत्तर वॉर्ड कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. मुंबईकरांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत असं म्हणत हा मोर्चा काढला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ही वाढवण्यात आला आहे.

महाराष्ट्र ISIS मॉड्यूल प्रकरणी एनआयएचे भिवंडीत छापे

महाराष्ट्र ISIS मॉड्यूल प्रकरणी एनआयए भिवंडीत छापे टाकत आहे. याशिवाय एनआयए आणखी एका अज्ञात ठिकाणी छापे टाकत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासादरम्यान एनआयएला या प्रकरणी एक मोठी माहिती मिळाली असून, त्या आधारे आज सकाळपासून एनआयएच्या दोन पथके या ठिकाणी छापे टाकत आहेत. हे तेच प्रकरण आहे ज्यात डॉ. अदनान अली सरकारला अटक करण्यात आली होती.

मुंबई, दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवण्याचा फोन; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

मुंबई, दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवण्याचा फोन शुक्रवारी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेनं तपासणी केली. परंतु, काही आक्षेपार्ह आढळलं नाही. यामुळं अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कलम 506(2) आणि कलम 505 (1) अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कांजूरमार्ग ते मुलुंड पर्यंत वाहतूक निर्माण झाली आहे. कांजूरमार्ग विभागात बसच्या अपघातामुळं मोठी वाहतूक कोंडी झाली, त्यामुळं गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जवळपास 3 ते 5 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

भीमा कोरेगाव प्रकरणी व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा यांना जामीन मंजूर

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणी व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा यांना जामीन मंजूर झाला आहे. उच्च न्यायालयानं अटीशर्तींवर हा जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयानं व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा यांना जामीन दिला होता. सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिल्यानंतर प्रकरण उच्च न्यायालयाकडं वर्ग झालं होतं. आता थोड्याच वेळात नवी मुंबईच्या तळोजा जेलमधून त्यांची सुटका होणार आहे.

अनिल देशमुख, भास्कर जाधवांनी सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवारांची भेट

अनिल देशमुख, भास्कर जाधव यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली आहे.

ज्ञानवापीमध्ये दुसऱ्या दिवसाच्या सर्वेक्षणाला सुरुवात

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीत (Varanasi in Uttar Pradesh) सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. ज्ञानवापी परिसरात भारतीय पुरातत्व विभागाचं सर्वेक्षण सुरू आहे. काल शुक्रवारपासून सुरू झालेलं सर्वेक्षण आता आज शनिवारी पुन्हा एकदा सुरू झालं आहे. आज (शनिवार) पुन्हा एकदा एएसआयची टीम (ASI Team) सर्वेक्षणासाठी पोहोचली असून सकाळी नऊ वाजता सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. हिंदू पक्षाचे वकील सुधीर त्रिपाठी यांनी सांगितलं की, आज सकाळी ९ वाजता सर्वेक्षण सुरू झालं आहे. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाची 1 वाजता बैठक

राष्ट्रवादीच्या पवार गटाची 1 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. वाय. बी. चव्हाण सेंटर इथं शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पंधरा तारखेनंतर सुरू होणारा शरद पवारांचा दौरा, जर पक्ष चिन्ह गेलं तर ते कोणतं असावं, प्रतिज्ञापत्र भरण्याची सद्यपरिस्थिती या विषयावर बैठकीत प्रामुख्यानं चर्चा होणार असल्याचं कळतंय. राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी, आमदार रोहित पवार हे देखील बैठकीला उपस्थित असणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भाजपच्या मिशन 45 संदर्भात ते भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

कन्नड घाटात 11 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

कन्नड घाटातील वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या वाहनांसह नागरिकांचा गुदमरलेला श्वास अखेर शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठाने मोकळा केला. ११ ऑगस्टपासून या घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घातली. सात दिवस शासकीय यंत्रणेने याबाबत प्रबोधन करावे, असे निर्देशही न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले आहेत.

नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत दीक्षांत सोहळा, गृहमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

नाशिक : महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील 122 व्या सत्रातील पोलीस उपनिरीक्षक तुकडीचा दीक्षांत सोहळा आज सकाळी आठ वाजता उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे. 

मणिपुरात पुन्हा हिंसाचाराचा भडका; मेईतेई समाजाचे 3 लोक ठार

Manipur Violence : मणिपुरात मे महिन्यापासून सुरू असलेला जातीय हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची आग भडकली आहे. मणिपुरात गेल्या 24 तासांत अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी (4 ऑगस्ट) रात्री मेईतेई समुदायाच्या (Meitei community) तीन लोकांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर समुदायाच्या काही लोकांनी अनेक घरांना आग लावली आहे. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याने मणिपूर रायफल्सचा (Manipur Rifles) एक जवानही शहीद झाला, असं अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं.

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी जोरदार चकमक; लष्कराचे 3 जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात (Jammu and Kashmir Kulgam) शुक्रवारी दहशतवाद्यांशी (Terrorist Attack) झालेल्या चकमकीत लष्कराचे 3 जवान (Indian Army) शहीद झाले. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचं चकमकीत रूपांतर झालं. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.

कोकणातील रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, 2 वर्षांच्या शिक्षेला दिली स्थगिती

Maharashtra Live Blog Updates : नुकतंच विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मुंबईत पार पडलं. या अधिवेशनात अनेक गोष्टींवर चर्चा करण्यात आली. याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाचीही तारीख जाहीर केली. या वर्षीचं हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं सुनावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.

तसेच प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी खालापूर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासह देश-विदेशातील बातम्या आपण लाईव्ह ब्लाॅगच्या माध्यमातून पाहणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT