2Sakal_20breking.jpeg 
देश

Latest Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीत लाकडी पेटीत सापडले 7 आणि 8 वर्षांच्या दोन मुलांचे मृतदेह

दिल्लीच्या जामिया नगरमधील एका कारखान्यात 7 आणि 8 वर्षांच्या दोन मुलांचे मृतदेह लाकडी पेटीत सापडले आहेत, ते कालपासून बेपत्ता होते. तपास चालू असल्याते दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

बजरंग सेनेचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल,  काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोष

भोपाळ: बजरंग सेनेचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोष केला. "बजरंग सेनेने आज काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सत्याचे समर्थन केले आहे. मध्य प्रदेश कुठे खेचला जात आहे, हेही त्यांच्या लक्षात येत आहे. मी त्यांचे स्वागत करतो", असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्य पक्षाचे प्रमुख कमलनाथ म्हणाले.

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक!

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक! औरंगजेबाचा संदर्भ घेत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

एस. पी. सिंगला दिलेल्या मुंबईतील पुलाचं कंत्राट रद्द करण्याची मागणी

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर उभारला जाणारा पूल कोसळला. या पुलाचे बांधकाम करणाऱ्या एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीला गोरेगाव उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडा व रत्नागिरी हॉटेल चौक येथील प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे. हे कंत्राट रद्द करावे म्हणून मागणी होत आहे.

MSP वर पुन्हा शेतकरी आक्रमक, दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्ग रोखला

किमान आधारभूत किमतीवर सूर्यफूल बियाणे खरेदी न करण्याच्या हरियाणा सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी कुरुक्षेत्रात दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्ग रोखला.

रायगडावर शिवभक्तांची मोठी गर्दी, पोलिसांचा सौम्य लाठीमार

रायगडावर शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार केला आहे. गडावरुन खाली उतरण्याचे संभाजी राजे यांनी आवाहन केले होते. जोपर्यंत सर्व शिवभक्त खाली उतरणार नाही, तोपर्यंत आपणही खाली उतरणार नाही अशी घोषणा संभाजी राजे यांनी केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुर्दुर्ग दौऱ्यावर; अनेक विकासकामांचं केलं उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुर्दुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी शिंदे यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं आहे.यावेळी दीपक केसरकर, नितेश राणे आदी नेते उपस्थित आहे.

शिवरायाचं राज्य रयतेसाठी होतं, स्वार्थासाठी नव्हतं- शरद पवार

शिवरायाचं राज्य रयतेसाठी होतं, स्वार्थासाठी नव्हतं असं शरद पवार पुण्यातील लाल महाल येथील कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.

ओडासा रेल्वे अपघातप्रकरणी ऑडिट निघणार 

ओडासा रेल्वे अपघातप्रकरणी ऑडिट निघणार आहे.

संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांची उपस्थिती 

संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी उपस्थिती लावली आहे. पुण्यातील लाल महालात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यभरातून शिवभक्त रायगडावर सोहळ्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी; गडाचे दरवाजे बंद

350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी यंदा रायगडावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ती नियंत्रणात आणणं हे देखील पोलीस आणि प्रशासनासमोरचं आव्हान ठरत आहे. नाईलाजाने असंख्य शिवभक्त माघारी फिरले आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने रायगडवरील कार्यक्रमाचे आयोजन

शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने रायगडवरील कार्यक्रमाचे आयोजन

सकाळी 7 वाजता – युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे शुभहस्ते ध्वजपूजन.

सकाळी 7.30 वाजता – शाहिरी कार्यक्रम.

सकाळी 9.30 वाजता – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन.

सकाळी 9.50 वाजता – संभाजी छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत.

सकाळी 10.10 वाजता – छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते शिवाजी महाराजांना अभिषेक.

सकाळी 10.20 वाजता – शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक.

सकाळी 10.30 वाजता – छत्रपती संभाजी महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन.

सकाळी 11 वाजता – शिवाजी महाराजांची पालखी जगदीश्वराच्या दर्शनासाठी जाईल.

दुपारी 12.10 वाजता – शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन.

ओडीसा रेल्वे अपघाताची CBI कडून चौकशी सुरु

ओडीसा रेल्वे अपघाताची CBI कडून चौकशी सुरु झाली आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 101 मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाही.

महाड ते रायगड मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

महाड ते रायगड मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. त्यामुळे गडावर जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी निर्माण झाली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यास उत्साहात सुरुवात..

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. आज 6 जून रोजी तारखेनुसार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यंदा 2 जून रोजी तिथीनुसार आणि 6 जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेकाला 349 वर्षे पूर्ण होऊन 350 वं वर्ष सुरु होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT