eknath shinde eknath shinde
देश

Marathi News Update: राष्ट्रवादीच्या दोन गटातील वाद पेटला, प्रत्येक अपडेट इथं वाचा

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – एकनाथ शिंदे

 नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले.

मुसळधार पावसामुळे मुंबईत साचले पाणी

मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी पूर्व भागात पाणी साचले आहे

आम्ही कोणत्या दुसऱ्या पक्षात जात नाही

पक्ष कोणता आणि संख्याबळ कोणाकडे जास्त हे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष ठरवतील. आम्ही कोणत्या दुसऱ्या पक्षात जात नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

नियमानुसार आम्ही सर्व प्रकिया पूर्ण केल्या आहेत. काल दिल्लीत मिटिंग झाली. मीटिंग घ्या पण त्यात ज्या काही चर्चा आणि निर्णय झाले असतील तर ते बेकायदेशीर असतील. त्यांना काही अर्थ नाही.

अमोल मिटकरी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे प्रतोद

अमोल मिटकरी हे आमचे विधान परिषदेचे प्रतोद असे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले.

जयंत पाटलांना आम्हाला अपात्र करण्याचा अधिकार नाही - प्रफुल्ल पटेल

प्रफुल्ल पटेल यांचा जयंत पाटलांच्या निवडीवरही प्रश्न

त्यामुळे त्यांनी केलेली अपात्रतेची कारवाई मान्य होत नाही

आमच्या संविधानानुसार जयंत पाटील हे आमचे अध्यक्ष आहेत का ?

त्यामुळे आम्हाला अपात्र करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. अध्यक्षच फ्रॉड असेल तर ते कारवाई कशी होईल

जयंत पाटील यांची नियुक्ती घटनेनुसार झाली नाही

भाजपकडून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्या नियुक्त्या

नवी दिल्ली -

भाजपकडून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्या नियुक्त्या

राजस्थान चे निवडणूक प्रभारी म्हणून प्रल्हाद जोशी यांची निवड

छत्तीसगडच्या निवडणूक प्रभारी पदी ओम प्रकाश माथूर यांना संधी

प्रकाश जावडेकर यांच्या खांद्यावर तेलांगणाची जबाबदारी

भुपेंद्र यादव यांच्याकडे मध्य प्रदेशच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी

वर्षाच्या शेवटी चारही राज्यात निवडणुका होत आहेत

राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत.

साताऱ्यात कातकरी महिलेवर सामूहिक बलात्कार

साताऱ्यात कातकरी महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडित महिला रायगड जिल्ह्यातील आहे. कोळसा उत्पादन करणाऱ्या मालकासह ५ जणांविरुद्ध आरोप करण्यात आला आहे.

बऱ्याच दिवसाचं स्वप्न आज साकार होत आहे - अजित पवार

बरेच दिवसाचं स्वप्न आज साकार होत आहे.

घरं वाटपाचा आणखी एक टप्पा आपण करत आहोत. मुंबई आणि गिरणी कामगार अस एक वेगळ नात आहे. स्वतः च्या हक्काच घर असलं पाहिजे

आज आपल्या गिरणी कामगारांना घर वाटप करत असताना आम्हांला आनंद आहे. गिरणी कामगारांग मोठ योगदान आहे. गिरणी कामगारांना घरं मिळण हा त्यांचा हक्क आहे. काही जण वेगळे सांगायचा प्रयत्न करतील अस होणार आहे तस होणार आहे.

वरिष्ठ नेते पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेतील- देवेंद्र फडणवीस

वरिष्ठ नेते पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

गिरणी कामगारांच्या घराची स्वप्न पूर्ण होणार

गेली अनेक वर्ष घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांच्या घराची स्वप्न पूर्ण होणार आहेत. महिन्याभरात दुसर्यांदा गिरणी कामागारांना घराच्या चाव्या वाटप करणार आहेत. आज २५१ गिरणी कामगारांना घराच्या चाव्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्या जाणार आहेत.

 निलम गोऱ्हेंचा शिंदे-फडणवीसांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी सेनेच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणीस देखील उपस्थित राहीले.

ठाकरे गटाला धक्का! निलम गोऱ्हेंचा थोड्याच शिंदे गटात पक्षप्रवेश

उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा झटका बसला असून ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे बाळासाहेब भवन येथे थोड्याच वेळात शिंदे गाटात सामील होणार आहेत. अगदी काहीच वेळात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

भाजपच्या 106 आमदारांच्या मनात काही गोष्टी असतील पण बोलण्याची हिम्मत नाही- पंकजा मुंडे

माझ्या पक्षाला माझ्याबद्दल सन्मान असेल माझी अपेक्षा आहे. भाजपच्या 106 आमदारांच्या मनात काही गोष्टी असतील पण बोलण्याची हिम्मत नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.

धनंजय मुंडे ४ दिवसांपूर्वी भेटायला आले होते - पंकजा मुंडे

धनंजय मुंडे ४ दिवसांपूर्वी भेटायला आले होते त्यावेळी त्यांचे औक्षण केले. त्यांनी आज का ट्वीट केले माहीत नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे.

पंकजा मुंडे घेणार ब्रेक...केली मोठी घोषणा !

मी जे राजकारण पाहून जे आदर्श समोर ठेवून मी राजकारणात आले, त्याच्याशी मला तडजोडी कराव्या लागत असतील तर मी राजकारणात जेव्हा जेव्हा मला प्रतारणा करावी लागेल तेव्हा मी राजकारणातून बाहेर पडायला मागे पुढे पाहणार नाही,आता मला ब्रेकची आवश्यकता आहे आणि तो मी घेणार आहे. पुढचे दोन ते तीन महीने ब्रेक घेणार आहे आणि मी विचार करणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यावर पंकजा मुंडेंनी स्पष्ट केली भूमिका

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यावर पंकजा मुंडेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. मी मी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची बातमी दाखवली मात्र ही बातमी चुकीची आहे. मी चॅनल वर मानहानीचा दावा ठोकणार आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे.

भाजप सोडण्यावर पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

भाजप सोडण्यावर पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य केलं आहे. मी भाजपमध्ये आहे, पक्ष सोडण्याच्या बातम्या पसरवत आहेत, त्यांच्यावर कारवाई करणार असं पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे.

नीलम गोर्हे निवासस्थानावावरून निघाल्या

नीलम गोर्हे निवासस्थानावावरून निघाल्या आहेत. आज दुपारी 2 वाजता बोलणार असं नीलम गोर्हे म्हणाल्या आहेत. तर शिवसेना प्रवेशावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.

पावसाळी अधिवेशन १७ जुलै ऐवजी पुढे जाण्याची शक्यता

पावसाळी अधिवेशन १७ जुलै ऐवजी पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या बैठकीत अधिवेशनामध्ये तारीखेबाबत चर्चा होणार आहे. राज्यात उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार, विधी मंडळात सुरू असलेले काम यामुळे अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे

आमदार रवींद्र वायकर यांना मातृशोक

रविंद वायकर यांच्या मातोश्री पार्वती दत्ताराम वायकर यांचे आज अल्पशः आजाराने निधन झाले. अंत्यदर्शनासाठी पार्थिव लिली व्हाईट बी विंग 806 येथे ठेवण्यात येईल. दुपारी १ वाजता स्व.राजेश्वर रागिनवार हिंदु स्मशानभुमी प्रतापनगार जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जोगेश्वरी पुर्व येथे अंत्यसंस्कार होतील.

पंकजा मुंडे घेणार मोठा निर्णय? 12.30 वाजता पत्रकार परिषद 

पंकजा मुंडे घेणार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. काल त्यांनी धनंजय मुंडे यांनी काल पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. तर आज 12.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

पवार कुटुंबातील भाऊ बहिण वेगळे झाले पण...मुंडे कुटुंबातील भाऊ बहिण जवळ आले

पवार कुटुंबातील भाऊ बहिण वेगळे झाले पण मुंडे कुटुंबातील भाऊ बहिण जवळ आले आहेत. काल रात्री पंकजा मुंडे यांच्या घरी जावून धनंजय मुंडे यांनी भेट घेतली.

'भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना भाजपने सत्तेत बसवलं आहे'- संजय राऊत

भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना भाजपने सत्तेत बसवलं आहे, अजित पवार कुठेही जाऊ शकतात तर कोणी कुठेही जाऊ शकतं, अजित पवारांवर खोटे आरोप झाले असतील तर ईडीला खोटं ठरवा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातासंदर्भात मोठी माहीती; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर

समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात हा चालकाच्या चुकीमुळे घडल्याचं समोर आलं आहे. अपघातावेळी बस चालक शेख दानिश याने मद्यप्रान केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने दिले संकेत

राज्यात निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. निवडणूक आयोगाच्या एका परिपत्रकामुळे हे संकेत मिळात आहेत. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने लवकरच निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

देशभरात २४ तासात अतिवृष्टीचा इशारा

देशभरात २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा मिळणार? गुजरात उच्च न्यायालयाचा आज निर्णय

मोदी आडनावाच्या लोकांवर टीका केल्यामुळे राहुल गांधी यांच्यावर मानहानीच्या प्रकरणात सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणावर आज सकाळी 11 वाजता निकाल देणार आहे. न्यायालयाने दोषी ठरल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं होतं.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT