Latest Marathi News Live Update Esakal
देश

Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Marathi News Live Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ वृत्तसेवा

मी माझ्या मुलाच्या विरोधात प्रचार करणार- गजानन कीर्तिकर

जरी माझा मुलगा उबाठा गटाकडून निवडणूक लढणार असला तरी मी त्याच्या विरोधात प्रचार करून माझी पार्टी जो उमेदवार देईल त्याचं काम मी करणार आहे, अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तिकर यांनी दिली.

रावेरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार ठरला- सूत्र

रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे या उमेदवार असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचा उमेदवार निश्चित नव्हता. अखेर उमेदवारावर पुण्यात शिक्कामोर्तब झाले असून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमोल कीर्तिकरांच्या विरोधात गजानन कीर्तिकर निवडणूक लढणार?

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. आता त्यांचे वडील कीर्तिकर हे महायुतीकडून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे.

योगी आदित्यनाथ यांनी नागपूरमध्ये घेतली गडकरींची भेट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

पुण्यात शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक सुरू

पुणे: शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग येथील कार्यालयात मागील २ तासांपासून बैठक सुरू आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे यांच्यात बैठक सुरू असून रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत अंतिम निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. बैठकीत रावेरसह भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सुद्धा चर्चा सुरू असल्याची माहिती सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत स्थिरता अन् अस्थिरता यांच्यात लढत ः PM मोदी

आगामी लोकसभा निवडणुकीत स्थिरता आणि अस्थिरता यांच्यात लढत होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूर येथील सभेत म्हणाले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा जोमाने पुढे नेत आहेत असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

देशातील सर्व समस्यांचा उगम काँग्रेस - PM मोदी

देशातील सर्व समस्यांचा उगम काँग्रेस असल्याची टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. महाराष्ट्राच्या चंद्रपूर येथील निवडणूक सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.

उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद उद्या घेतली जाणार असून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली - अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर भाजपने जीवघेणा हल्ला केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आरोप आहे.

येथे लिका सय्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर भाजपने हल्ला केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना सुरक्षा द्या, अशी मागणी देखील यावेळी निवडणूक आयोगाकडे कऱण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशात विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.

पुण्यातील कोंढव्यात मीनी स्कूलबसला आग

कोंढवा ८ : एचएम रॉयल सोसायटीशेजारी रस्त्याच्या कडेने पार्क केलेल्या चारचाकी मिनी स्कूलबसला आग लागल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाल्यास कोंढवा आग्निशामक दलाकडून घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणण्यात आली. दहा ते पंधरा मिनिटात ही आग आटोक्यात आणल्याने शेजारी पार्क असलेल्या बाकी चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान टळले.

बिरेंद्र सिंह यांचा भाजपला रामराम, काँग्रेसमध्ये दाखल होणार

Delhi Liquor Policy: आप नेते दुर्गेश पाठक पोहोचले ईडी कार्यालयात

दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने आम आदमी पार्टीचे नेते दुर्गेश पाठक यांना समन्स पाठवले आहे. समन्सवर ते केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात पोहोचले असून त्यांची चौकशी सुरू आहे. याशिवाय या प्रकरणात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांचीही केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहे.

Lok Sabha Election 2024: ''स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसला देश लुटण्याचा परवाना आहे, असे वाटले होते''- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसला देश लुटण्याचा परवाना आहे, असे वाटले होते. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदींनी काँग्रेसचा लुटण्याचा परवाना रद्द केला आहे."

नागपुरातील‘लोटस स्पा’वर छापा, तीन महिलांची सुटका

प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्वावलंबी चौकात असलेल्या ‘लोटस स्पा’मध्ये शुक्रवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून तीन पीडित महिलांची सुटका केली. स्पा मालकासह महिलेला अटक करण्यात आली आहे.

राज ठाकरेंशी जवळीक वाढली- देवेंद्र फडणवीस

मनसे आणि भाजप युतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी मोदीजींना पाठिंबा द्यावा ,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात ३ सभा

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात ३ सभा होणार आहेत. वर्धा, भंडारा आणि नागपूरमध्ये या सभा होतील.

संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग

खिचडी घोटाळ्यात अमोल किर्तिकरांना अटक व्हावी मागणी दावा संजय निरुपमांनी केला आहे.यावेळी खिचडी घोटाळ्याचे किंग संजय राऊत असा दावाही त्यांनी केला

ईडीने दिल्लीचे मंत्री कैलाश गहलोत यांना बजावले समन्स

ईडीने दिल्लीचे परिवहन मंत्री आणि आप नेते कैलाश गहलोत यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी समन्स जारी केले आहेत.

PM Modi in Chandrapur : चंद्रपुरात आज मोदींची विराट सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात सभा होणार आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी तब्बल 10 वर्षांनी आज मोदी चंद्रपुरात येणार आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास मोदी चंद्रपुरात येतील असे म्हटले जात आहे.

Amravati: २१ वर्षांपासून फरार कैद्याला अटक

अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहातून २००३ मध्ये संचित रजेवर बोराखेडी येथे आलेला खुनाच्या गुन्ह्यातील कैदी कारागृहात परत हजर झाला नाही. तब्बल २१ वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीला बोराखेडी पोलिसांनी रविवार ७ एप्रिल रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Delhi IGI Airport: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI) बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Delhi IGI Airport: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI) बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी (8 एप्रिल) ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, दोन प्रवाशांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. यानंतर विमानतळावर गोंधळ उडाला.

Sankjay Nirupam: माजी खासदार संजय निरूपम यांची आज पत्रकार परिषद, काय बोलणार याकडे लक्ष

माजी खासदार संजय निरूपम यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ते आज शिंदे गटात प्रवेश करमार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Marathwada News: मराठवाड्यातील ५१ तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा, भूजल पातळीत मोठ्या प्रमामावर घट

५१ तालुक्यांवर भीषण पाणी संकट निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला टँकरची संख्या ही जवळपास एक हजारपर्यंत पोहचली आहे. पुढील १० दिवसांत हा आकडा अजून वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Crime News: नाशिकमध्ये गोन गटा राडा, एकावर गोळीबार, दोन जण अटकेत

नाशिकमध्ये काल(रविवारी) मध्यरात्री सिडकोतील त्रिमूर्ती चौकात दोन गटात झालेल्या संघर्षामध्ये एकावर गोळीबार करण्यात आला आहे. या संदर्भात दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दर्शन दोंदे व गणेश खांदवे अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

Madha Lok Sabha: माढा लोकसभेचा तिढा सुटेना; मविआकडून उमेदवाराबाबत चाचपणी सुरूच

महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेच्या उमेदवारीच्या उमेदवारीचा तिढा सुटत नसला तरी भेटीगाठींना मात्र जोर आला आहे. माढ्याच्या उमेदवारीसंदर्भात शरद पवार यांच्याशी प्रथमतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेकापच्या डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेतल्यानंतर आज (ता. ७) रोजी माढा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेले डॉ. अनिकेत देशमुख यांनी शरद पवार यांची बारामती येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.

PM Modi: पंतप्रधानांची आज चंद्रपुरात जाहीर सभा

विर्दभात निवडणूक प्रचार रंगू लागला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. ८) चंद्रपुरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता मोरवा विमानतळाजवळील भव्य पटांगणावर ही सभा होणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर मोदी चंद्रपुरात येत आहेत.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत. सभेसाठी प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महायुतीमधील जागांचा तिढा कायम, पंतप्रधानांची आज चंद्रपुरात जाहीर सभा, राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता तर काही भागात उन्हाचा तडाखा, देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT