Maharashtra Lok Sabha Phase 5 Election  esakal
देश

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रासह आठ राज्यांतील 49 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात 695 उमेदवार रिंगणात आहेत.

Sandip Kapde

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election :

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सोमवारी उत्तर प्रदेशसह आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात 8.95 कोटी मतदार केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, पियुष गोयल, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह एकूण 695 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.

उत्तर प्रदेशच्या 14, बिहारच्या 5, झारखंडच्या 3, महाराष्ट्राच्या 13, ओडिशाच्या 5, बंगालच्या 7 आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या प्रत्येकी 1 जागेवर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. (Loksabha news update)

उत्तर प्रदेशातील या जागांवर मतदान:

लखनौ, अमेठी, रायबरेली, मोहनलालगंज, फैजाबाद, कैसरगंज, गोंडा, बाराबंकी, जालौन, झाशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर आणि कौशांबी. या जागांसाठी 144 उमेदवार रिंगणात आहेत.

महाराष्ट्रात या जागांवर मतदान -

महाराष्ट्रात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, ठाणे, कल्याण, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, अनिल देसाई, दक्षिण मुंबईत मतदान होणार आहे.

दिग्गज उमेदवार पाचव्या टप्प्यात आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये राहुल गांधी, राजनाथसिंह, पीयूष गोयल, स्मृती इराणी, चिराग पासवान, उमर अब्दुला हे उमेदावार रिंगणात आहेत.

महाराष्ट्रात श्रीकांत शिंदे, रवींद्र वायकर, उज्जवल निकम, राहुल शेवाळे, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे, हेमंत सावरा, भारती पवार रिंगणात आहेत.

राहुल गांधी वायनाड बरोबर रायबरेली येथूनही रिंगणात आहेत. तर अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी येथे रिंगणात आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनऊ मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे. प्रचारात गाजलेले अयोध्येतील राममंदिर ज्या मतदारसंघात येते, त्या फैजाबाद मतदारसंघातही निवडणूक होत आहे. महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेल्या ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या कैसरगंज मतदारसंघही याच टप्प्यात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT