Latest Maharashtra News live Updates  esakal
देश

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi Live News Updates 1 September 2024 : MVA आज, रविवारी हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असा निषेध मोर्चा होता. संपूर्ण शहरात पोलीस आणि इतर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार, घटनेत मृत्यू

वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

दोन महिन्यात महायुतीची सत्ता हटवून सत्तेत बसल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, शरद पवारांचा एल्गार!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. राज्यात राजकीय डावपेचांबरोबरच जनसंपर्क अभियानही वेगाने सुरू आहे. दरम्यान, येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात सरकार बदलल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे राष्ट्रवादीचे (सप) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

बाल अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घराची स्थानिकांकडून तोडफोड

मध्यमग्राम येथील बाल अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घराची स्थानिकांनी तोडफोड केली.

Eknath Shinde Live: विरोधकांनी राजकारण करणे थांबवावे - शिंदे

Mumbai Live: 10 सप्टेंबरपर्यंत महायुतीचे नेते एकत्र पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करतील - बावनकुळे

कालच्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. येत्या 10 दिवसांत संपूर्ण चर्चेला अंतिम स्वरूप दिले जाईल. काही मुद्द्यांवर एकमत झाले आहे, तर काही मुद्दे शिल्लक आहेत. मला वाटते की येत्या 10 दिवसात महायुतीच्या जागावाटपाचे सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत. महाराष्ट्रात 10 सप्टेंबरपर्यंत महायुतीचे नेते एकत्र पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करतील, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Uday Samant Live : माफी मागितल्यानंतरही आंदोलन करणे म्हणजे केवळ राजकारण - उदय सामंत

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महा विकास आघाडीने आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत वाईट आहे... चौकशी झाली पाहिजे. ...पंतप्रधान मोदींनी या घटनेबद्दल माफी मागितली आहे आणि त्यानंतरही आंदोलन करणे म्हणजे केवळ राजकारण आहे.

Andhra Flood Live : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांची पूरग्रस्त भागाला भेट  

विजयवाडा: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली

Kolhapur Live: राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाई मंदिर चार तास राहणार बंद

भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणाने अंबाबाई मंदिर भाविकांसाठी चार तास बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांसाठी दर्शन सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद असेल.

Mumbai Live: चेंबुरमध्ये कार दुभाजकाला धडकून अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईमधील चेंबुरमध्ये कार दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी असल्याचे समजत आहे. अपघाताच्या ठिकाणी पोलिसही तपासणीसाठी दाखल झालेत.

Finance Live: ऑगस्टमध्ये जीएसटी संकलनात 10 टक्क्याने वाढ

सरकारी डेटानुसार ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन 10 टक्क्याने वाढून 1.75 लाख कोटी झाले आहे.

भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण,सर्व नागरिकांसाठी हा अभिमानाचा क्षण : केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल

“सर्व नागरिकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व स्तरांवर काम करणाऱ्या सर्व लोकांचे एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे ‘विक्षित भारत’च्या विकासासाठी काम करणे,’ असे नवी दिल्ली येथे ‘राष्ट्रीय जिल्हा न्यायिक परिषदे’च्या समारोप समारंभाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटले.

रवी रोंगालीचे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये यश 

भारताच्या रवी रोंगालीने पॅरिस पॅरालिम्पिकमधील पुरुषांच्या शॉटपुट F40 स्पर्धेत 10.63 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोसह पाचवे स्थान पटकावले.

Jarange Patil Live: शिवरायांच्या पुतळ्यामधे फायबर- जरांगेंचा आरोप

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळ्याप्रकरणी अनेक नेत्यांनी त्या ठिकाणालाभेट दिली. नुकतीच मनोज जरांगे पाटील यांनीही त्या ठिकाणी भेट दिली. यावेळेस महाराजांच्या पुतळ्यामधे फायबर असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. सोबतच जे या घटनेसाठी जबाबदार आहेत त्यांनाही अटक करण्याची मागणी केली आहे.

भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा

दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी

अजित पवार यांचे निकटवर्तीय दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी

वीरधवल जगदाळे यांच्या मागणीनंतर दौंडच्या जागेवरून महायुती मध्ये वादाची शक्यता

बारामती लोकसभेला सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवावी याची पहिली मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली होती आणि ती मागणी मान्य देखील झाली होती

दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी पक्षाकडे गेल्यास आमदार राहुल कुल यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता

NCP Live: त्याठिकाणी गोमूत्र शिंपडून आंदोलन करणार- सुरज चव्हाण यांचं ट्वीट

राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी ट्वीट करत आपण आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिलं, 'महाविकास आघाडीच्या नेत्याकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतासाठी,राजकारणासाठी जागृत झालेलं महाराजांबद्दलच्या बेगड्या शिवप्रेमा विरोधात त्यांनी आंदोलन केलेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून राष्ट्रवादी युवक उद्या आंदोलन केलं जाईल

यवतमाळ जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस अनेक नदी नाल्यांना आला पुर

यवतमाळमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नदी नाल्यांना पुराचे स्वरूप आले आहे.

Ganesha Chaturthi Live Update: आतुरता गणरायाच्या आगमनाची...जयपुरमध्ये गणेश चतुर्थीची जल्लोषात तयारी सुरू

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राजस्थामधील जयपूरमध्ये गणेश मूर्ती बनवण्याची तयारी सुरू आहे.

Monsoon Live Update: नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे मानवी वस्त्यांमध्ये शिरले पाणी

नांदेडमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मानवी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.

Vande Bharat Sleeper Train Live : लवकरच धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरूमधील BEML येथे वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर कोचची तपासणी केली. त्यानंतर, आता वंदे भारत स्लीपर ट्रेनची झलक दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे. ही ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Khelo India Live Update : जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आरतीने जिंकले कांस्यपदक

खेलो इंडिया ॲथलीट आरतीने लिमा मधील २० वर्षाखालील जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये जिंकले कांस्य पदक.

MVA: विरोधकांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे: मुख्यमंत्री शिंदे

विरोधक दंगलीच्या भाषा करत होते त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. कर्नाटकात शिवाजी महाराजांचा पुतळा तोडण्यासाठी दोन जेसीबी आणले आणि तो पुतळा उखडला, ज्यांनी हे कृत्य केले त्यांना जोडे मारले पाहिजे, असे करण्याऐवजी ते इथे आंदोलन करत आहेत, असेही शिंदे म्हणाले.

एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून स्वीकारला पदभार

एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी आज हवाई मुख्यालयात भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर एअर मार्शल यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक, नवी दिल्ली येथे पुष्पहार अर्पण करून सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहिली.

MVA Protest: महाविकास आघाडीच्या विरोधात जालन्यात भाजपा आक्रमक

महाविकास आघाडीच्या विरोधात जालन्यात भाजपा आक्रमक झाली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा पदाधिकाऱ्यांनी नोंदविला मविआचा निषेध.

MVA Protest Live:  महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून मुंबईत हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असा निषेध मोर्चा काढणाऱ्या एमव्हीए कार्यकर्ते आणि नेत्यांना पोलिसांनी रोखले.

Mumbai Live: जोडो मारो आंदोलनाला शरद पवार, शाहू महाराज, उद्धव ठाकरेंची उपस्थिती

मुंबईतील महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी महाविकास आघाडीचे शरद पवार, शाहू महाराज, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी शिंदे सरकार हाय हाय असे म्हणत कार्यकर्ते राजकोटवर घडलेल्या घटनेचा निषेध करत आहेत.

Mumbai: गेटवे ऑफ इंडिया येथे मविआच्या नेत्यांची भाषण होण्याची शक्यता

गेटवे ऑफ इंडिया येथे मविआच्या नेत्यांची भाषण होण्याची शक्यता आहे. लाऊडस्पिकर सिस्टीम गेट वे ऑफ इंडिया येथे दाखल झाले आहेत.

Mumbai live: गेट वे ऑफ इंडिया येथून पर्यटकांना बाहेर काढण्यास सूरवात

गेट वे ऑफ इंडिया येथून पर्यटकांना पोलिसांनी बाहेर काढण्यास सूरवात केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी १० पासून गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद असणार आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी हिरवळांना मिळाला पुरस्कार

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी हिरवळ यांना उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार देण्यात आलाय. 2018-2019 या कालावधीसाठी उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळालाय. रा

Ajit Pawar live Update : अजित पवार यांचा पुसद येथील कार्यक्रम रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुसद येथील कार्यक्रम रद्द कऱण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे कार्यक्रम रद्द करित असल्याची आमदार इंद्रनील नाईक यांची माहिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT