Breaking News  Sakal
देश

आज दिवसभर देश अन् राज्यात घडलेल्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यात शीतल म्हात्रेंचं व्हायरल व्हिडिओ प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणी विरोधक-सत्ताधारी आमने-सामने आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील धायरीत पेंटच्या कारखान्याला आग

धायरी येथील गणेश नगर, गल्ली क्रमांक २२ येथे एका पेंटच्या कारखान्याला आग; पाच ते सहा सिलेंडरचा स्फोट झाला आहे. पीएमआरडीए व पुणे अग्निशमन दलाकडून ०८ वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीत कुठलीही जिवीतहानी नाही मात्र परिसरात धुराचे लोट आकाशत दिसत आहेत.

शितल म्हात्रेंचा पाठलाग करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पाठलाग करून त्यांच्या दिशेने काही खुणा केल्या. या प्रकरणी एका म्हात्रे यांनी दादर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३५४-डी, ३५२ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्रात रंगणार आता महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्रात आता महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहेत. सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. 23 आणि 24 तारखेला सांगलीत महिला केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत.

चौकशीत पूर्ण सहकार्य करणार - हसन मुश्रीफ

उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ईडी कार्यालयात आलो होतो. आज काही कामकाज झालं नाही, मला उद्या ईडी कार्यालयात बोलवलं आहे. चौकशीत योग्य ते सर्व सहकार्य करू असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. जेव्हा बोलवतील तेव्हा ईडी कार्यालयात येईन असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकरी लॉँग मोर्चाचे विधानसभेत पडसाद

विविध मागण्यासाठी शेतकरी नाशिकहून शेतकरी पायी मुंबईकडे निघाले आहेत. या मोर्चाचे पडसाद आज विधानसभेत पडल्याचे पाहायला मिळाले. या संबंधीची आजची बैठक उद्या ठेवण्यात आली आहे. जेवढ्या सकारात्मक मागण्या आहेत त्यांच्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना मुंबईपर्यंत यावं लागणार नाही. अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली आहे.

केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांना जोर का झटका

देशातील लाखो सरकारी कर्मचारी केंद्राकडून महागाई भत्ता (डीए) वाढीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत असताना, वित्त मंत्रालयाने १८ महिन्यांच्या रोखून ठेवलेल्या डीए थकबाकीबाबत मोठे विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होताच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या १८ महिन्यांच्या थकबाकीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित झाला. प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान केंद्र सरकारकडून मिळणारा महागाई भत्ता आणि महागाई सवलतीबाबत प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर सोमवारी लोकसभेत लेखी उत्तर देताना वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटले की कोविड-१९ संसर्गाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर १८ महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी जारी करण्याचा केंद्र सरकार कोणताही विचार करत नाही.

मुंबईतील आगीचे सत्र थांबेना; दहिसर परिसरात झोपडपट्टीला आग

मुंबईतल्या दहिसर चेक नाका परिसरात झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहे. दुपारी पावणे बाराच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. या आगीबद्दल माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. झोपडपट्टी परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवरील बांबूंना आग लागल्यामुळे परिसरात ही आग पसरली आहे.

मतभेद व्यक्त करणे म्हणजे पक्षाविरोधात बंड नाही, नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद

शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी राज्यपालांचे अधिकार, अपात्रतेचा मुद्दावर आजही जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाचे दुसरे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद सुरु केला. अंतर्गत मतभेद हा लोकशाहीचा भाग आहे. मतभेद व्यक्त केले म्हणजे पक्षाविरोधात बंड केलं असं होत नाही असं कौल म्हणाले.

अनिल परब यांना मोठा दिलासा; हायकोर्टाचे ईडीला महत्वाचे आदेश

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. सोमवारपर्यंत परब यांना अटक करू नका, असे आदेश कोर्टाने ईडीला दिले आहेत. साई रिसॉर्ल्ट प्रकरणी परब यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू होती.

इम्रान खान यांच्याविरूद्ध आणखी एक अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. इम्रान यांच्याविरूद्ध इस्लामाबाद सत्र न्यायालयानं आणखी एक अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्याप्रकरणी खान यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आलीये.

न्यायाधीशांना लुटणाऱ्या आरोपींना अटक

दिल्ली : 6 मार्चला गुलाबीबाग परिसरात आपल्या 12 वर्षाच्या मुलासोबत फिरायला निघालेल्या महिला न्यायाधीशांना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी लुटलं होतं. या स्नॅचिंगच्या घटनेत त्या रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

विधानसभा अध्यक्षांकडंच पुन्हा हे प्रकरण सोपवावं; हरीश साळवेंची मोठी मागणी

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांना स्वीकारावा लागला. राजीनाम्यानंतर शिंदेंनी बहुमत सिद्ध केलं. बहुमत बळाच्या जोरावर झालं असं कसं म्हणता येईल. जोपर्यंत अपात्र होत नाहीत, तोपर्यंत आमदार काम करू शकतात. विधानसभा अध्यक्ष घटनात्मक पद, 10 व्या शेड्यूल अंतर्गत येत नाही. अविश्वास असेल तर बहुमत चाचणी होते. त्यात गैर काय? बहुमत चाचणी बोलावून राज्यपालांनी काहीही चूक केलेलं नाही, असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला.

पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचारी रस्त्यावर

कऱ्हाड ः एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, हम सब एक है या ना अशा अनेक घोषणा देत राज्य सरकारच्या विविध विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आज मंगळवारी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आंदोलन करुन लक्ष वेधलं. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, महसूल, महानगरपालिका आदींसह शासनातील सुमारे ३२ विभागांचे अधिकारी-कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. या संपात सातारा जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी यांनी भाग घेतला आहे. आज सकाळीच कऱ्हाड (जि.सातारा) तहसीलदार कार्यालयासमोर सर्व कर्मचारी एकत्र आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, हम सब एक है या ना अशा अनेक घोषणा दिल्याने तो परिसर दणाणून गेला.

ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचं निधन झालं. वेद प्रताप वैदिक यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वेद प्रताप वैदिक हे देशातील ज्येष्ठ पत्रकार होते.

शासनातील अनेक विभागांचे अधिकारी-कर्मचारी आज संपावर

पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगमध्ये मोठ्या संख्येनं सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरु आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, महसूल, महानगरपालिका आदींसह शासनातील सुमारे ३२ विभागांचे अधिकारी-कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. या संपात पुणे जिल्ह्यातील ६८ हजार अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत.

लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यातही सरकार आणि विरोधकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या या गदारोळामुळं लोकसभा दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दरम्यान, राज्यसभेत गदारोळ सुरू असताना सदस्यांनी भारतीय चित्रपट आरआरआर आणि द एलिफंट व्हिस्पर्सचं ऑस्कर जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं.

बहुमत चाचणीचे आदेश देऊन राज्यपालांनी काहीही चूक केलं नाही - हरीश साळावे

बहुमत चाचणी सभागृहातच केली जाते. अविश्वास निर्माण झाल्यास बहुमत चाचणी घेणं गैर नाही. राजभवनात बहुमत चाचणी झाली नाही. बहुमत नसल्याने विधानसभा उपाध्यक्षांनी आपलं पद गमावलं. साळवे यांच्याकडून किहोटो, रेबिया, मणिपूर आणि बोम्मई प्रकरणाचा दाखला देण्यात आला आहे.

हसन मुश्रीफांना दिलासा; पुढील दोन आठवडे कारवाई न करण्याचे निर्देश

माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीनं दोन महिन्यात तिसऱ्यांदा छापेमारी केली होती. छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज मुंबई कोर्टाकडून हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळाला असून पुढील दोन आठवडे कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी आरोपींना आज न्यायालयात हजर करणार

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी दहिसर पोलीस आज दोन आरोपींना न्यायालयात हजर करणार आहेत. पहिला आरोपी साईनाथ दुर्गे आणि दुसरा अक्षय धंदर आहे. अक्षय धंदरला काल पुण्यातून अटक करण्यात आली आहे. अक्षय धनगरवर आरोप त्यांनी शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ शिवसेनेच्या ग्रुपमध्ये व्हायरल केला होता.

पत्नीनं घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली म्हणून नवऱ्यानं पेटवल्या गाड्या

पत्नीनं घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली म्हणून चिडलेल्या नवऱ्यानं गाड्या पेटवल्या आहेत. पुण्यातील कोंढवा भागातून हा अजब प्रकार समोर आला आहे. ४ दुचाकी, १ चारचाकी आणि एका रिक्षाला त्यानं आग लावली. टेरेन्स डॉमिनिक जॉन असं या व्यक्तीचं नाव आहे.

केंद्राची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं फेटाळली

1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी युनियन कार्बाइड कॉर्पोरेशनच्या उत्तराधिकारी कंपन्यांकडून अतिरिक्त ₹ 7,844 कोटींची मागणी करणारी केंद्राची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं फेटाळली आहे.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

पुणे-बंगळूर महामार्गावर अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. झाडांचे पुनर्रोपण करताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. पुणे- बंगळूर महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. तेथील झाडांसाठी ते तासवडे येथे हजर होते. कत्तल करुन जी झाडे वाचली आहेत, त्या झाडांची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करुन त्याचे पुनर्रोपण केलं पाहिजे, अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतली आहे.

ईडीविरोधात अनिल परब यांची हायकोर्टात धाव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनीसुद्धा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने सुरू केलेल्या कारवाईला आव्हान देताना दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दखल घेत मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी भाजप-काँग्रेस आमने-सामने

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात वादळी झाली. लोकसभा आणि राज्यसभेत राहुल गांधी यांच्याकडून माफीची मागणी करण्यात आली. राहुल यांच्या विधानावरून दुसऱ्या दिवशीही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.

दापोली साई रिसॉर्ट प्रकरण : प्रांताधिकारी जयराम देशपांडेंना ईडीकडून अटक

दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडेंना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा देशपांडे यांच्यावर ठपका आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर ही अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह गोव्याला विजांच्या कडकडाटसह पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने बदल जाणवत आहेत. मध्येच अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. यानंतर पुन्हा महाराष्ट्रासह, कोकण किनारपट्टी आणि गोव्याला मंगळवारपासून (दि.१४) विजांच्या गटगडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या भागात ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज IMD मुंबई विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

कोल्हापूर : विशाळगडावर शिवप्रेमींकडून मद्यपींना चोप

कोल्हापूरमधील विशाळगडावर शिवप्रेमींकडून मद्यपींना चोप देण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त असताना दारू नेणाऱ्या दोघांना चोपलं आहे. पोलिसांच्या समोरच दारूची वाहतूक करण्याचा प्रकार समोर आला. गडाच्या पायथ्याला चेक पोस्ट करण्याची मागणी गडप्रेमी करत आहेत.

H3N2 व्हायरस : हरियाणा, कर्नाटकानंतर गुजरातमध्ये पहिला मृत्यू

H3N2 Virus : सध्या देशात H3N2 विषाणू खूप वेगानं पसरत आहे. आता या व्हायरसमुळं देशात तिसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातमधील वडोदरा इथं हा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलेला आधीच अनेक आजार होते. ती उच्च रक्तदाबाची रुग्ण होती आणि व्हेंटिलेटरवर होती. या विषाणूमुळं हरियाणा आणि कर्नाटकमध्ये यापूर्वी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कृष्णेतील प्रदूषणप्रकरणी वसंतदादा साखर कारखान्यावर कारवाई

कृष्णेतील प्रदूषणप्रकरणी वसंतदादा साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत कारखाना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र कालवी यांचं निधन

Karni Sena Lokendra Kalvi Passed Away : राजस्थानमधील (Rajasthan) श्री राजपूत करणी सेनेचे (Shri Rajput Karni Sena) संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी (Lokendra Singh Kalvi) यांचं रात्री उशिरा एसएमएस रुग्णालयात निधन झालं.

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली होती. परंतु, वकिलांनी आणखी वेळ मागितल्याने आज ते युक्तिवाद करणार आहेत.

नंदुरबारला अवकाळी पावसाचा फटका

एका आठवड्यात दुसऱ्यांदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पाथर्डी आज बंद

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पाथर्डी शहर आज बंद ठेवण्यात आलं आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.

राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. या संपामुळं शासकीय रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, नगरपालिका, जिल्हा परिषदा, तहसीलदार कार्यालये, यासह अनेक सरकारी विभागांचे कामकाज जवळपास ठप्प होणार आहे.

बोअरवेलमध्ये पडलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर येथील कोपर्डीत बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चिमुकला साडेआठ तास बोअरवेलमध्ये अडकला होता. कोपर्डी येथील काकासाहेब सुद्रिक यांच्या बोअरवेलमध्ये हा मुलगा पडल्याची माहिती आहे. या बोअरवेलमध्ये तब्बल ११ फूट खाली हा चिमुरडा अडकला होता. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामन दलाचे जवान दाखल झाले मात्र त्यांच्या शर्तीच्या प्रयत्नाना अपयश आले. टीव्ही ९ हिंदी या वृत्तवाहिनीनुसार, या मुलाला मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra National Live Updates : राज्यात शीतल म्हात्रेंचं व्हायरल व्हिडिओ प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणी विरोधक-सत्ताधारी आमने-सामने आहेत. शिवाय, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. तसेच ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या शिवाय, जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी संपावर आहेत. देशातील काही भागात पावसाची शक्यता आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी आमचं लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT