esakal
देश

Today Updates: देशात दिवसभरात काय घडलं, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर. काल शिवाजी पार्कवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर बीकेसीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यातील भाषणात दोन्हीही बाजुकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज देखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

प्रेमात आंधळी झालेल्या मोठ्या बहिणीने केली १६ वर्षीय बहिणीची हत्त्या

मयत हर्षदाची १९ वर्षीय मोठी बहीण सृष्टी बानकर हिचे श्रीरामपुर तालुक्यातील आकाश कांगुणे नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याबद्दल हर्षदा हिने घरच्यांना सांगितल्यानंतर घरच्यांनी सृष्टीला समज दिली होती तसेच काही दिवस कॉलेजला जाऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे सृष्टीच्या मनात हर्षदाबद्दल रागाची भावना निर्माण झाली होती.

शिंदे गटाच्या मेळाव्यात स्टेजवरील नेते गेले झोपी; फोटो आले समोर

दोन तासाहुन अधिक वेळ चाललेल्या एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी शिंदे गटाचे प्रमुख प्रवक्ते दीपक केसरकर यांना डुलकी लागल्याचे फोटो समोर आले आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उशीर झाला होता.

अबब! 27 कोटींचं एक घड्याळ

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI विमानतळ) विमानतळ सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाविरुद्ध 7 अत्यंत मौल्यवान घड्याळांची तस्करी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रवाशाकडून अधिकाऱ्यांनी 7 रोलेक्स घड्याळे, एक हिरे जडीत सोन्याचे ब्रेसलेट आणि आयफोन 14 प्रो जप्त केले आहे.

शरद पवार यांनी ठाकरे-शिंदे गटाचे टोचले कान; म्हणाले

मेळाव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. आज पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले "पक्षात दोन गट पडणे, संघर्ष होणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मात्र संघर्षालाही मर्यादा ठेवली पाहिजे. सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात जे राजकारण सुरू आहे ते दुर्देवी आहे.

औरंगाबाद-पैठण रोडवर काही मिनीटातच अपघातांचा आकडा २० वर

रस्त्यांवर वाहनांचे अपघात होणे यात नवीन काही नाही मात्र औरंगाबाद- पैठण रोडवरील ढोरकीनजवळ एक-दोन नव्‍हे तर 20 मिनिटांत तब्बल 25 दुचाकींचा अपघात घडल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघातांमुळे रहिवाशी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मनसे राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत. राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. राज ठाकरे आज आणि उद्या अशा दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत. राज ठाकरे आज पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे

मेक्सिकोनंतर थायलंडमध्येही अंदाधुंद गोळीबार; हल्ल्यात 32 जणांचा मृत्यू

सकाळी मेक्सिको आणि आता थायलंडच्या ईशान्येकडील प्रांतात बालसंगोपन केंद्रात आज झालेल्या सामूहिक गोळीबारात 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

शहरातील मध्यवर्ती भागात पावसाची दमदार हजेरी लावली आहे. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात आज पावसाला सुरुवात झाली आहे. 9 ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

संविधानविरोधी म्हणत RSS च्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न; 100 जण ताब्यात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा घेराव भारत मुक्ती मोर्चा नावाच्या संघटनेनं घातला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्यालयाबाहेरून 100 जणांना ताब्यात घेतलं आहे. याशिवाय, आरएसएस कार्यालयाबाहेरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.

'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधी बनले श्रावणबाळ; काँग्रेसने केले ट्विट

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी कर्नाटकातील मंड्या येथे 'भारत जोडो यात्रे' त सहभागी होऊन राहुल गांधी आणि इतर 'भारत यात्रीं 'सोबत पदयात्रा काढली. यादरम्यान राहुल गांधी आईला चप्पल घालताना दिसले. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मां'.

लोकांमध्ये उत्साह बळजबरीने आणता येत नाही; रोहित पवारांचा मेळाव्यावरून शिंदे गटाला टोला

दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. शिंदे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून एकोमेंकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी लागोपाठ दोन ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, मात्र किल्ला अभ्यद्य असल्याचं सिद्ध झालं. निष्ठा जिंकली असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय.

मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडलं

मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोडवर स्थानकांवर ओव्हज हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. त्यामुळे ब अप धीम्या मार्गावरील सेवा ठप्प पडली आहे. अप धीम्या लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या असून मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोसळले आहे. घटनास्थळी मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक पोहचले असून ओव्हर हेड वायर दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे.

दोन तास भाषण करून काही होत नाही; पेडणेकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

काल झालेल्या दसरा मेळाव्यावरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांचे उद्धव ठाकरे सुपुत्र आहेत एवढं तरी मानत आहात का? असा सवलही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. ‘जो उठाव झाला अगदी मे पासून ते कालच्या दिवसापर्यंत की शिवसेना संपली, पण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं की जे गेले त्याने काही होत नाही’असंही पेडणेकर म्हणाल्यात. दसरा मेळाव्याच्या सभेनंतर किशोरी पेडणेकर यांचा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरेंच्या स्टेजवर चैतन्य होतं. शिंदेंनी 2 तास भाषण केलं तरी काही फरक पडत नाही. शिंदेंच्या भाषणावेळी लोकं उठून गेले

मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडलं

मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कारीरोड, चिंचपोकळी, भायखळ्यात गाड्या एकामागोमाग उभ्या राहिल्या आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीच वेळापत्रक कोलमडल आहे. मध्य रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. रिलायन्स कुंटुंबाशी संबधित रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटल उडवून देण्याची धमकी आली होती. अनोखळी नंबर वरुन हा धमकीचा फोन आला होता. धमकीचा फोन करणाऱ्यास मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.

पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई, वर्षभरात जप्त झाले कोट्यवधीचे सोने

पुणे विमानतळावर गेल्या १ मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी वाढली आहे. पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या कारवाईत गेल्या १ वर्षात २ कोटी रुपयांपेक्षा जास्त सोने जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विमानातून या वर्षात आत्तापर्यंत २९९१ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १,५३,५४,८१७ रुपये इतकी आहे

उद्धव ठाकरेंच्या भाषणात शिमगा सोडून काहीच नव्हतं; फडणवीसांची टीका

दसरा मेळाव्याची दोन्ही भाषणे ऐकता नाही आली. धम्म चक्र प्रवर्तक दिनाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळे भाषण ऐकता आलं नाही. थोड उशिरा शिंदेचं भाषण ऐकलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणची आहे ते. उद्धव ठाकरेच्या भाषणात शिमगा सोडून काहीच नव्हतं. Bkc मैदानावर मात्र प्रचंड गर्दी होती असंही फडणवीस म्हणलेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले पोलिसांचे आभार

अखेर शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आव्हान देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा घेतला होता. यावेळी जोरदार फटकेबाजी करण्यात आली. या भव्य मेळाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट पोलिस आयुक्तांना फोन केला आणि पोलिसांचे आभार मानले.

सोलापूर विभागातून धावणाऱ्या 20 एक्स्प्रेस गाड्या 18 ऑक्टोबरपर्यंत  रद्द 

सोलापूर विभागातून धावणाऱ्या 20 एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आजपासून ते 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत सर्व एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन सणासुदीला एक्स्प्रेस रद्द केल्यामुळे प्रवाशांना फटका बसणार आहे. दौंड आणि मनमाड विभागात दुहेरी मार्ग सुरू करण्यासाठी या रेल्वेच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन सणासुदीत रेल्वे प्रवासी सेवा कोलमडल्यामुळे नागरिकांमधून नाराजी दिसून येत आहे.

अनिल देशमुख यांचा सीबीआय कोर्टाकडून जामीन मिळवण्याचा प्रयत्न

मुंबई उच्च न्यायालयाने ईडीच्या केसमध्ये दिलेल्या जामिनाच्या आधारावर अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहेत.

अनेक कार्यकर्त्यांना कशाला आणलं हेच माहिती नव्हतं – अजित पवार

अजित पवार यांनी काल झालेल्या दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाने गर्दी जमवली खरी पण अनेक कार्यकर्त्यांना कशाला आणलं हेच माहिती नव्हतं अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले की, मी काल टिव्हीवर दोघांचीही भाषणं ऐकली दोन्ही मेळावे महाष्ट्राने पाहिले कुणाच्या पाठिमागे उभे राहिचं हे जनतेने ठरवायचं आहे. दोघांच्याही भाषणावर टीका करणार नाही असंही अजित पवार म्हणलेत.

मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात पहिली जबाबदारी

शिंदे सरकारवर मोदी सरकारने केंद्रात पहिली जबाबदारी दिली आहे. माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे गटाचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांना केंद्रात जबाबदारी पहिली जबाबदारी मिळाली आहे. संसदेच्या स्थायी समितीच्या बदलांमध्ये शिंदे गटाला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर एक विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोदी सरकारकडून शिंदे गटाला पहिल्यांदाच अशाप्रकारे केंद्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आली आहे.

दसरा मेळाव्याच्या भाषणावर अतुल भातखळकर यांची ठाकरेंवर टीका

कालच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात आरोप प्रत्यारोप करण्यात आले. ठाकरेंनी भाषणातून अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर नेत्यांवर सडकून टीका केली. ठाकरेंच्या या भाषणावर भाजप नेते अतुल भातखळकर यांची ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील सभेवरुन टीका केली आहे. ‘बापाच्या नावाने थापा अन् सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट’अशा शब्दात भातखळकर यांनी टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT