उद्धव ठाकरेंचे 55 पैकी जवळ-जवळ 40 आमदार फुटल्यामुळं शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आलंय. तर, उद्धव ठाकरे यांचे 55 पैकी जवळ-जवळ 40 आमदार फुटल्यामुळं शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. त्यातच आता कर्नाटकातील काँग्रेसच्या (Karnataka Congress) एका बड्या नेत्यानं महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.
संघटनेची बांधणी तळागाळातून केली असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आत्मविश्वासात आहेत. ते नक्की मार्ग काढतील. पक्ष कायम ठेवण्यासाठी सरकार टीकणं महत्त्वाचं आहे. काँग्रेस आणि आम्ही सर्व महाविकास आघाडी सरकारसोबत आहोत, असं स्पष्ट मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (Karnataka Congress State President DK Shivakumar) यांनी व्यक्त केलंय.
महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्ष आता खूपच तीव्र होताना दिसू लागला आहे. सोमवारपासून शिवसेना विरूद्ध बंडखोर आमदारांचा एकनाथ शिंदे गट यांच्यात संघर्ष सुरूय. पक्षातील सुमारे 38 नाराज आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापना करावी, अशी विनंती हे सर्व आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करत आहेत. पण, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार नसल्याचं दिसत आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सत्तासंघर्षात एक पाऊल पुढं टाकलंय. आपल्या गटाचं नाव आता त्यांनी ठेवलं असून 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असं शिंदे गटाचं नाव असेल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आज संध्याकाळी या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी दिलीय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.