Kamal Nath vs Shivraj Singh Chouhan | Maharashtra Political News esakal
देश

'जे स्वत:चं सरकार वाचवू शकले नाहीत, ते उद्धव ठाकरेंचं सरकार वाचवायला निघालेत'

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये राजकीय उलथापालथ सुरूच आहे.

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi Government) राजकीय उलथापालथ सुरूच आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर नाराज आहेत. शिंदे सध्या गुवाहाटी, आसाममध्ये असून त्यांना 46 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, काँग्रेसनं कमलनाथ (Kamal Nath) यांना बंडखोर आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्रात पाठवलंय. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी माजी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवलीय.

एका कार्यक्रमादरम्यान शिवराज सिंह म्हणाले, जे स्वत:चं सरकार वाचवू शकले नाहीत, ते उद्धव ठाकरेंचं कसं वाचवणार? असा सवाल त्यांनी कमलनाथांना केलाय. दोन वर्षांपूर्वी कमलनाथ सरकार (Kamal Nath Government) पडल्याचा उल्लेख करत शिवराज सिंह म्हणाले, 'त्यांना महाराष्ट्रात पाठवण्यात आलंय. कारण, त्यांना ठाकरे सरकार वाचवायचं आहे. पण, जे स्वतःचं सरकार वाचवू शकले नाहीत, ते महाराष्ट्र सरकार कसं वाचवणार? असा सवाल करत त्यांनी कमलनाथांची खिल्ली उडवलीय.

सन 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) भाजपमध्ये सामील झाल्यानंतर 20 हून अधिक आमदारांनी पक्ष सोडल्यामुळं कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पडलं. विश्वासदर्शक ठराव सभागृहात सिद्ध होण्यापूर्वीच कमलनाथांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं कमलनाथांना या आठवड्यात निरीक्षक म्हणून राज्यात पाठवलंय. या आठवड्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात गदारोळ सुरू असतानाच, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मध्य प्रदेशातील घटनेचा उल्लेख करत भाजपची खिल्ली उडवली होती. राऊत म्हणाले, 'हा मध्य प्रदेश नाही. हा महाराष्ट्र आहे. पक्ष नियंत्रणात असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT