अयोध्येत रामलल्लाचे दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यांच्या सोयी-सुविधेसाठी इथं एक सुसज्ज 'महाराष्ट्र सदन' उभारण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. पत्रकार परिषेदत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे हे उपस्थित होते. (Maharashtra Sadan to be set up in Ayodhya for Aditya Thackeray announcement In Ayodhya tour)
आदित्य ठाकरे म्हणाले, "आपल्या मनात प्रश्न असतीलच पण त्यावर एकच उत्तर म्हणजे ही आमची तीर्थयात्रा असून राजकीय यात्रा नाही. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की, मी स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोलणार आहेत. अयोध्यतेत ते महाराष्ट्र सदनासाठी जागा मागणार आहेत. सुमारे १०० खोल्यांचं प्रशस्त सदन या ठिकाणी आपण करणार आहोत. महाराष्ट्रात अनेक भाविक इथं येत असतात त्यांना राहण्यासाठी एक चांगली जागा आपल्याला इथं निर्माण करायची आहे.
गेल्या तीन वर्षात आपण शिवसेना कुटुंबासोबत चौथ्यांदा अयोध्येत येत आहोत. पण कार्यकर्त्यांचा जल्लोष तसाच कायम आहे. आता राम मंदिर निर्माण होत असताना अनेक शिवसैनिक रामजन्मभूमीत आले आहेत. सन २०१८मध्ये मी पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत पहिल्यांदा आलो होतो. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती "पहिले मंदिर फिर सरकार". शिवसेनेच्या या भूमिकेनंतर वेगानं घडामोडी घडल्या, पुढे कोर्टाचा निकाल आला आणि मंदिराचा मार्ग मोकळा झाला, असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
रामलल्लाचं दर्शन घेण्यापूर्वी मी इस्कॉन मंदिरातही गेलो होतो. आमचा अयोध्या दौरा ठरला त्यावेळी इस्कॉन मंदिर प्रशासनाकडून मला ई-मेल आला. यामध्ये त्यांनी म्हटलं की, सत्तरच्या दशकात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी इस्कॉन मुंबईला मदत केली होती. तेच नातं पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी मला अयोध्येतील इस्कॉनला भेटीचं निमंत्रण दिलं. या ठिकाणी भेट दिल्यानंतर आम्ही तिथं महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर आम्ही हनुमान गढीला देखील जाणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.