water crisis Sakal
देश

पाणीटंचाईचा महाराष्ट्र सदनालाही फटका; केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या महाराष्ट्रातील खासदारालाही बसली झळ

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली :राजधानी दिल्लीमध्ये भेडसावणाऱ्या भीषण पाणीटंचाईचा फटका महाराष्ट्र सदनालाही बसला. कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन मध्ये आलेल्या अतिथींचे पाण्याअभावी आज चांगलेच हाल झाले. विशेष म्हणजे केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या महाराष्ट्रातील एका नवनिर्वाचित खासदारालाही पाणीटंचाईची झळ बसली.

त्यामुळे मंत्री महोदयांच्या स्नानासाठी महाराष्ट्र सदन व्यवस्थापनाला बाहेरून पाण्याची व्यवस्था करावी लागली. सायंकाळपर्यंत महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा पूर्ववत झाला असला तरी या प्रकारामुळे सदनाच्या व्यवस्थापनातील विस्कळितपणाही उघड झाला.

या सदनात प्रधान सचिव दर्जाचे आयुक्त, सहआयुक्त, दोन साहाय्यक आयुक्त आणि व्यवस्थापक यांचीही कार्यालये असताना दिवसभर पाणी उपलब्ध नसण्याची नामुष्की महाराष्ट्र सदनावर ओढवली.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील उन्हाळ्यामुळे वातानुकूलित यंत्रणेसाठी भरपूर पाणी लागते. पाणी नसल्यास टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाते. मात्र ही बाब लक्षात न आल्याने सदनातील अतिथींसह केंद्रातील मंत्र्यांनाही पाणीटंचाईचा फटका बसला.

येथे सकाळपासून दुपारी तीन पर्यंत पाणी नव्हते. त्याचप्रमाणे ईदच्या शासकीय सुट्टीमुळे सरकारी अधिकारीही सदनात उपस्थित नव्हते. प्रत्यक्ष मंत्रिमहोदयांचीच मोठी गैरसोय झाल्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली आणि सायंकाळी पाच पर्यंत पाणी आले.

पुरेसे मनुष्यबळच नाही

नवीन महाराष्ट्र सदनातील अंतर्गत व्यवस्था हाताळण्याची जबाबदारी असलेल्या खासगी कंपनीच्या कंत्राटाची मुदत ऑगस्टमध्ये संपुष्टात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सदनाची देखरेख करण्यासाठी देखील पुरेसे मनुष्यबळ नेमण्यात आले नसल्याचेही समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT