Mahatma Gandhi PM Modi Rahul Gandhi Esakal
देश

Mahatma Gandhi: फक्त 'एंटायर पॉलिटिकल सायन्स'च्या विद्यार्थ्यालाच... मोदींनी गांधींबद्दल केलेल्या विधानामुळे राजकारण पेटले

आशुतोष मसगौंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींच्या संदर्भात केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आणि ज्यांचे वैचारिक पूर्वज नथुराम गोडसेसह महात्मा गांधींच्या हत्येत सहभागी होते, ते बापूंच्या सत्याच्या मार्गावर कधीच चालू शकत नसल्याचा आरोप केला.

पंतप्रधान मोदी यांनी 'एबीपी न्यूज' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, रिचर्ड ॲटनबरो यांचा १९८२ मधील 'गांधी' चित्रपट बनण्यापर्यंत जगाला महात्मा गांधींबद्दल फारशी माहिती नव्हती.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या या वक्तव्यानंतर देशातील राजकारण पेटले आहे. त्यामुळे अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.

विरोधी पक्षांतील प्रमुख नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत मोदींचा समाचार घेताल. राहुल म्हणाले, महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्यासाठी फक्त 'एंटायर पॉलिटिकल सायन्स'च्या विद्यार्थ्यालाच चित्रपट पाहण्याची गरज आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या विधानानंतर एक व्हिडिओही एक्सवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, महात्मा गांधी असे सूर्य आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला अंधाराशी लढण्याची ताकद दिली. बापूंनी जगाला सत्य आणि अहिंसेच्या रूपात एक मार्ग दाखवला, जो दुर्बल माणसालाही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत देतो. त्यांना कोणत्याही ‘शाखा शिक्षित’ प्रमाणपत्राची गरज नाही.

पंतप्रधानांच्या या टिप्पणीबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी 'X' वर पोस्ट केली आणि म्हटेल "ज्यांच्या वैचारिक पूर्वजांचा नथुराम गोडसेबोरबर महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग होता, ते बापूंनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर कधीही चालू शकत नाहीत. आता तो खोटारडेपणाची झोळी घेऊन निघणार आहेत.

काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “आरएसएस कार्यकर्त्यांची हीच ओळख आहे की त्यांना महात्मा गांधींचा राष्ट्रवाद माहीत नाही. गांधीजींनी त्यांच्या विचारसरणीने निर्माण केलेल्या वातावरणामुळे नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली.

जयराम रमेश यांनी पुढे दावा केला, “2024 ची निवडणूक महात्मा भक्त आणि गोडसे भक्त यांच्यात आहे. मावळत्या पंतप्रधानांचा आणि त्यांच्या गोडसे भक्त साथीदारांचा पराभव उघड आहे.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT