ajit pawar eknath shinde devedra fadanvis sakal  sakal
देश

NDA Loksabha Formula: लोकसभेत अजित पवार गटाला किती जागा मिळणार? केसरकरांनी स्पष्टच सांगितले

सकाळ डिजिटल टीम

NDA Loksabha Formula: मोदी सरकार विरोधात देश पातळीवर विरोधक एकत्र आले आहेत. यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. आज मुंबई येथे या आघाडीची बैठक होणार आहे. अशावेळी यावर विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

यावर बोलताना आज शिवसेनेचे प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली. बाळासाहेबांनी फारूक अब्दुल्ला यांच्यावर टीका केली होती आणि आज त्यांच्या सोबतच उद्धव ठाकरे बैठक घेत आहेत. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा विसर पडला आहे. अशी टीका यावेळी दीपक केसरकर यांनी केली.

तर दुसरीकडे इंडियाच्या आघाडीला टक्कर देण्यासाठी मुंबईमध्येच महायुतीची बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष हे तीनही पक्ष एकत्र बैठक घेणार आहेत.यावेळी राज्यातील 48 लोकसभा जागांविषयी चर्चा केली जाणार आहे.

याचबरोबर दीपक केसरकर यांनी महायुतीमध्ये कशाप्रकारे लोकसभेच्या जागा वाटल्या जातील याविषयी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती मोठ्या ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ठरल्याप्रमाणे शिवसेनेकडे 26 तर भाजपाकडे 22 जागा होत्या. त्यानुसार यंदाही लढाई करण्याचा आमचा मानस आहे.

आता आमच्याकडे 18 खासदार आहेत. या अठराही जागांवर दावा करणार असून या ठिकाणी आम्ही मागणी करू असे यावेळी दीपक केसरकर म्हणाले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार यांच्याकडे चार खासदार असल्याने त्यांनी किती जागा लढवल्या होत्या यावर आम्ही चर्चा करू असेही केसरकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

Vivek Oberoi : "माझं पहिलं प्रेम कॅन्सरमुळे गमावलं" ; पूर्वायुष्यावर भरभरून बोलला विवेक, म्हणाला- "मी कधीच धोका..."

Latest Marathi News Updates : विनोद तावडेंच्या नेतृत्वात भाजपचा नवा विक्रम

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

SCROLL FOR NEXT