Cycle Man_Anand Mahindra 
देश

डोक्यावरील गाठोड्यासह सायकल चालवणाऱ्या तरुणाचं महिंद्रांकडूनही कौतुक; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : डोक्यावरचं मोठं गाठोडं हातानं पकडून सायकल चालवणाऱ्या तरुणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरलं (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओनं प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांना (Anand Mahindra) देखील प्रभावित केलं आहे. महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करत देशातील असं कितीतरी टॅलेंट दुर्लक्षित असल्यानं दुःख त्यांनी व्यक्त केलं आहे. (Mahindra also appreciates a young man riding a bicycle with a big lump on his head)

व्हिडिओ शेअर करत महिंद्रा म्हणाले, हा माणूस एक मानवी नियंत्रणक आहे ज्याच्या शरिरात जायरोस्कोप बसवलेला आहे. (जायरोस्कोप असं उपकरण आहे जे एखाद्या वेगवान वाहनाला स्थिरत देण्याचं काम करतं) त्याच्यामध्ये संतुलनाची अविश्वसनीय ऊर्जा सामावलेली आहे. पण मला हे पाहून त्रास होतोय कारण आपल्या देशात या तरुणासारखे बरेच जण आहेत जे प्रतिभावान खेळाडू होऊ शकतात पण ते समोर येऊ शकत नाहीत किंवा खेळाडू होण्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण मिळू शकत नाही.

काय आहे 'हा' व्हायरल व्हिडिओ?

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला व्हिडिओ जो आनंद महिंद्रा यांनी शेअर केल आहे. हा व्हिडिओ २१ सेकंदाचा असून यामध्ये एक तरुण सायकल चालवताना दिसतो आहे. या तरुणाच्या डोक्यावर एक भलं मोठं गाठोडं आहे. हे गाठोडं हातानं पकडून पण त्याचवेळी सायकलचं हँडेलला हातनही न लावता हा तरुण पॅडल मारत वळणावळणाच्या रस्त्यावरुन आपला तोल सांभाळत वेगानं सायकल चालवताना दिसतो आहे. हा तरुण सायकल चालवत असताना त्याच्या मागून जात असलेल्या एका वाहनातील व्यक्तीनं मोबाईलमध्ये त्याच्या कौशल्याचं चित्रिकरण केलं. यानंतर ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरलं जालं. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. पण हा व्हिडिओ कुठला आहे? त्या व्हिडिओतील तरुण कोण आहे? हे अद्याप समजू शकलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhararvi News: धारावीमध्ये तणाव! मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड

Latest Marathi News Updates : धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

Pitru Paksha 2024 : तुमच्या कुंडलीतही आहे का पितृदोषाचे सावट?; या लक्षणांवरून ओळखा

नवरा माझा नवसाचा 2 Movie Review: कथा नवसाचीच फक्त पॅर्टन वेगळा!

REIT Investment: फक्त 140 रुपयांमध्ये करोडोंच्या मालमत्तेत गुंतवणूक करा; भाड्यातून होईल मोठी कमाई

SCROLL FOR NEXT