Mahua Moitra& Narendra Modi Sakal
देश

Mahua Moitra : महुआ मोईत्रा PM मोदींच्या वाटेवर; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या, काय माहिती...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत करोडो फॅन्स आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Mahua Moitra : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत करोडो फॅन्स आहेत.

हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सामान्यांसह देशातील अनेक नेतेदेखील मोदींना फॉलो करतात. त्यांच्या प्रत्येक कृतीची दखल घेतली जाते. अशीच एक कृती तृणमूल काँग्रेसच्या नेत्याकडून फॉलो करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या कृष्णनगर भागात रस्त्याच्या कडेला एका स्टॉलवर चहा बनवताचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मोईत्रा यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत त्याला "चाय बनाने में हाथ आजमाया... कौन जानता है कि यह मुझे कहां ले जाए" अशी कॅप्शन दिली आहे.

मोईत्रा यांचा हा व्हिडिओ सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला असून, अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ज्यात नेटकरी म्हणतात की, देशासाठी केवळ एकच चहावाला पुरेसा असल्याचे म्हटले आहे.

तर, एकाने महुआ मॅडम भारताच्या दुसऱ्या महिला पीएम बननण्याच्या मार्गावर असल्याचे मत व्यक्त केले आहे.

मोईत्रा यांच्या या व्हिडिओनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक कृतीला किती महत्त्व आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

मात्र, मोईत्रा यांनी लिहिलेल्या कॅप्शनवरूनदेखील अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT