Hathras satsang 
देश

Hathras stampede: हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपीला अखेर अटक; 121 जणांचा गेला होता जीव

कार्तिक पुजारी

नवी दिल्लीः हाथरस प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. हाथरसमध्ये सत्संग आयोजित करणारा मुख्य आरोपी देव प्रकाश मधूकर यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. हाथरसमधील दुर्दैवी अपघातासाठी तो कारणीभूत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या अपघातात १२१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात जास्त करून महिला होत्या.

नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा याचा हा सत्संग होता. सत्संगसाठी प्रशासनाकडून ८० हजार लोकांची परवानगी घेण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात २.५ लाखांपेक्षा जास्त लोक आल्याचे सांगितले जाते. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षारक्षकांनी बळजबरीचा वापर केला. यामुळे चेंगराचेंगरी सुरू झाली. अनेक लोक चिरडले गेले. यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

हाथरस मधील घटनेने संपूर्ण देश हादरला होता. भोले बाबा नामक व्यक्तीला ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी झाली होती. प्रशासनाने परवानगी दिल्यापेक्षा ही संख्या खूप जास्त होती. त्यासाठी पुरेसे पोलीस उपस्थित नव्हते. बाबाचे सत्संग झाल्यानंतर तो गाडीत बसून निघाला होता. यावेळी त्याच्या पायाची धूळ डोक्याला लावण्यासाठी लोकांनी गाडीमागे धाव घेतल्याच सांगितलं जाते. यावेळी उपस्थित रक्षकांनी त्यांना काठीने आवरण्याचा प्रयत्न केला आणि हा अपघात झाला. यात १२१ मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भोले बाबा अद्याप फरार आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआरआर मधे देखील बाबाचे नाव नाही. त्यामुळे कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणी मुख्य आयोजकासह इतर काही जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाने न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई होईल का हे पाहावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai police Transfer: अखेर 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; निवडणूक आयोगाने कानउघाडणी केल्यानंतर जाग

Navratri 2024 : आज तिसरी माळ, जाणून घ्या, चंद्रघटा मातेची पूजा विधी अन् संपूर्ण कथा

अग्रलेख : चार भिंतीतील समानता

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 ऑक्टोबर 2024

हौस ऑफ बांबू : अभिजाताचे श्रेय कुणाला..?

SCROLL FOR NEXT