MK Stalins demand for Narendra Modi MK Stalins demand for Narendra Modi
देश

तामिळलाही अधिकृत भाषा बनवा; एमके स्टॅलिन यांची पीएकडे मागणी

सकाळ डिजिटल टीम

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासमोर तमिळलाही हिंदीप्रमाणेच अधिकृत भाषा (official language) करण्याची मागणी केली आहे. तमिळ ही हिंदीप्रमाणेच राजभाषा आणि मद्रास उच्च न्यायालयातही अधिकृत भाषा केली जावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. यासोबतच त्यांनी तामिळनाडूला राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET पासून वेगळे करण्याची मागणीही केली आहे. (Make Tamil the official language like Hindi)

तामिळनाडूमधील लोक, संस्कृती आणि भाषा अतुलनीय आहेत. तमिळ भाषा शाश्वत आहे. तमिळ (Tamil) संस्कृती जागतिक आहे. चेन्नईपासून कॅनडापर्यंत, मदुराईपासून मलेशियापर्यंत, कानमक्कलपासून न्यूयॉर्कपर्यंत, सेलमपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत पोंगल आणि पुथंडूचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, असे पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले.

अलीकडेच माझ्या निवासस्थानी भारतीय मूकबधिर ऑलिम्पिक संघाचे आयोजन केले होते. तुम्हाला माहिती असेल की यावेळी भारताने स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली होती. परंतु, आम्ही जिंकलेल्या १६ पदकांपैकी सहा पदके तामिळनाडूच्या तरुणांनी जिंकली आहेत, असेही मोदी (Narendra Modi) म्हणाले.

जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये ३१,००० कोटींहून अधिक खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमध्ये पोहोचले. या प्रकल्पांमध्ये रेल्वे, पेट्रोलियम, गृहनिर्माण आणि रस्ते यासारख्या प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांचा समावेश आहे.

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील द्रविड मुनेत्र कळघम (DMK) सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच दक्षिणेकडील राज्याचा दौरा करीत आहेत. चेन्नईतील कार्यक्रमाला संबोधित करताना स्टॅलिन यांनी राज्यात अवलंबल्या जात असलेल्या द्रविड मॉडेलबद्दल सांगितले. यामुळे सर्वसमावेशक वाढ झाली. ज्यामुळे तामिळनाडूला अनेक बाबींमध्ये आघाडीचे राज्य बनण्यास मदत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT