makeshift bridge set up for Christmas celebrations collapsed in Kerala Trivandrum Several injured 
देश

Kerala Bridge Collapse: केरळमध्ये ख्रिसमसच्या उत्सवाला गालबोट! पूल कोसळल्याने अनेक जण जखमी

हा अपघात रात्री 9 च्या सुमारास झाला, जेव्हा अनेक लोक एकाच वेळी पुलावर चढल्याने हा पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित कणसे

केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये सोमवारी रात्री ख्रिसमस सोहळ्यादरम्यान उभारण्यात आलेला एक तात्पुरता पूल कोसळला, त्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातात 7-8 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी काहींना गंभीर दुखापत झाली आहे, तर एका महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात रात्री 9 च्या सुमारास झाला, जेव्हा अनेक लोक एकाच वेळी पुलावर चढल्याने हा पूल कोसळला. जास्त भारामुळे पूल एका बाजूला झुकला, त्यामुळे त्यावर उभे असलेले लोक खाली पडले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, हा पूल नाताळच्या सेलिब्रेशनसाठी बांधण्यात आला होता. धबधबा आणि येशूचा जन्म तसेच इतर सजावट पाहण्यासाठी ही भिंत ओलांडून पलीकडे जाण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता.

पुलाची उंची सुमारे पाच फूट असल्याचे त्यांनी सांगितले. या पुलावरून काही कमीच लोक जाऊ शकत होते. मात्र अनेक जण एकत्र पुलावर चढले, त्यामुळे अपघात झाला. त्यांनी सांगितले की, जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT