जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे. यादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची तब्येत बिघडल्याची घटना समोर आली. ते कठुआ येथे एका रैलीला संबोधित करत होते, येथे व्यासपीठावर बोलतानाच त्यांची तब्येत बिघडली. त्यांनी भाषण मध्येच थांबवले आणि पक्षाच्या नेत्यांनी त्यांना हाताला धरून खुर्चीवर बसवले. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची तब्येत स्थिर असून डॉक्टरांना त्यांचे चेकअप करण्यासाठी बोलवल्याचेही त्यांनी सांगितले.
खरगे कठुआ येथे दहशतवाद्यासोबत सुरू असलेल्या चकमकीत शहीद झालेल्या एका हेड कॉन्स्टेबलला श्रद्धांजली देत होते. या चकमकीत एक पोलिस कर्मचारी जखमी देखील झाला आहे तर एक दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे.
काँग्रेसचे महासचिव गुलाम अहमद मीर यांनी पीटीआयला सांगितले की, ते मल्लिकार्जुन खरगे जसरोटा मध्ये एका सभेला संबोधित करत होते, तेव्हा अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर येऊ लागली. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची मदत केली. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की. त्यांची (मल्लिकार्जुन खरगे) तब्येत सध्या स्थिर आहे. खरगे विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी जसरोटा येथे गेले होते.
जम्मू-काश्मीर काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र शर्मा यांनी सांगितले की, खरगे यांना चक्कर आल्याने त्यांना एका खोलीत नेण्यात आले, जिथे डॉक्टरांना तपासणीसाठी बोलावण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत, तर हरियाणामध्येही विधानसभा निवडणुका होत आहेत. हरियाणात ५ ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर ८ ऑक्टोबरला दोन्ही राज्यांचे निकाल जाहीर होतील.
या रॅलीमध्ये बोलताना खरगे म्हणाले की, हे लोक (केंद्र सरकार) कधीच निवडणुका घेऊ इच्छित नव्हते. यांची इच्छा असती तर एक-दोनवर्षातच घेतल्या असत्या. भाजप उपराज्यपालांच्या माध्यमातून रिमोटने चालणारे सरकार चालवू इच्छितात... पीएम मोदी मागील १० वर्षात देशातली तरुणांना काहीही दिलं नाही. तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकता का जो १० वर्षात तुमची समृद्धी परत आणू शकला नाही? जर कोणी भाजपचा नेता तुमच्यासमोर आला तर त्याला प्रश्न विचारा की समृद्धी आली की नाही...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.