Mallikarjun Kharge over adani row Hindenburg research rajya sabha financial issue modi govt politics sakal
देश

Adani Row : अदानी हरिश्चंद्र निघाले तर आम्ही त्यांना हार घालू; मल्लिकार्जुन खर्गे

खर्गे यांचे राज्यसभेत टीकास्त्र

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेत आज विरोधी पक्षनेते व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कथित आर्थिक व्यवहारांबदद्ल व त्यांच्या आणि मोदी सरकारच्या संबंधांबद्दल संयुक्त संसदीय समितीतर्फे (जेपीसी) चौकशी करण्याच्या मागणीचा पुनरूच्चार केला.

अदानी यांचे नाव घेऊन खर्गेंनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच त्यांच्यावरही आरोपांच्या फैरी झाडल्या. १२ लाख कोटींवर कब्जा करून हा माणूस (अदानी) कसा काय बसला आहे. यावर जेपीसी चौकशी करा. हा घोटाळेबाज हरिश्चंद्र शुद्ध निघाला तर आम्ही त्याला हार घालू.

दरम्यान खर्गे यांनी शेरोशायरी करताच राज्यसभाध्यक्षांनीही, विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, या अर्थाचा गालीबचा शेर एकविला ! राज्यसभाध्यक्ष जगदीप धनखर यांनी खर्गे यांना आरोपांऐवजी पुरावे सादर करण्यास सांगितले. भाजपनेही राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वाड्रा यांचा मुद्दा उपस्थित करत खर्गे यांच्यावर जोरदार प्रहार केला.

खर्गे म्हणाले की आज सर्वत्र जे लोक द्वेष पसरवत आहेत त्यांच्याबद्दल पंतप्रधान गप्प का बसले आहेत. तुम्ही (मोदी-भाजप) सगळ्यांना घाबरवता पण द्वेष पसरवणाऱ्यांना का घाबरवत नाही. तुमची एक नजर पडली तरी अशा लोकांना समजेल की त्यांना तिकीट मिळणार नाही, ते गप्प बसतील. तुम्ही गप्प बसले आहात त्यामुळेच ही परिस्थिती झाली आहे.

खर्गे यांनी जातीय आणि धार्मिक भेदभावाचाही मुद्दा उपस्थित केला. धर्म-जात-भाषेच्या नावावर द्वेष सोडा आणि भारत एक करा. खर्गे म्हणाले की 'या इसमाला (अदानी) सरकारकडूनच प्रोत्साहन मिळाले आहे. त्याला बँकांनी ८२ हजार कोटी कर्ज दिले. गुजरातमधील एका शेतकऱ्याला ३१ पैसे थकबाकीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही हे मोदीजींना माहीत असेल.

अदानींचे धोरण म्हणजे पैसा आमचा, बंदर, विमानतळेही आमची. तुम्ही एका अदानीला ८२ हजार कोटी बहाल केले . खर्गे यांनी मोदी आणि केंद्र सरकारवर अदानींवरून अनेक गंभीर आरोप करताच सभापती धनखड यांनी आक्षेप घेतला.

धनखड यांनी खर्गे यांना याचा पुरावे सादर करण्यास सांगितले. त्यावर भाजप सदस्यांनी आनंद व्यक्त करताच भडकलेले खर्गे म्हणाले की मी खरे बोललो तर ते देशविरोधी आहे. मी कोणत्याही माणसापेक्षा जास्त देशभक्त आहे.

माझे दर्श किंवा मी अफगाणिस्तान किंवा जर्मनीतून आलो नाही. मी अस्सल भारतीय आहे. त्यावर धनखड म्हणाले की 'खर्गे साहेब, तुम्ही देशभक्त आहात हे मला माहीत आहे. मी या बाजूचा नाही ना त्या बाजूचा आहे. मी घटनेच्या बाजूचा आहे.

खर्गे यांच्या आरोपांवर भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. खर्गे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरात दंगलींनंतर तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांना ‘राजधर्म' पालन करण्याचा सल्ला दिला होता असे खर्गे यांनी सांगताच सीतारामन खवळल्या. त्या म्हणाल्या की हे (खर्गे) अर्धवट बोलत आहेत. अटलजींनी त्याच पत्रकार परिषदेत, ‘नरेंद्रभाई राजधर्माचे पालन करत आहेत असा मला विश्वास आहे,‘ असे नमूद केले होते. मात्र ते वाक्य हे सांगत नाहीत असे सीतारामन म्हणाल्या.

वॉशिंग मशीन !

खर्गे म्हणाले की मोदी-शहा यांनी वॉशिंग मशीन घेतले आहे. ते कलंकित लोकांना त्यांच्या पक्षात घेतात आणि त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकतात. मग ते स्वच्छ बाहेर येतात. एखाद्या राज्यात तुमचे (भाजप) सरकार बनले नाही तर ईडी आणि सीबीआय पाठवता.

मग तोडफोड करून ते सरकार बनवता. एक-दोन सरकारे कमी झाली तर काय होईल. कुठे ना कुठे तुम्ही चावी फिरवून लोकांना पार्टीत आणता. कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मणिपूर आणि गोवा सरकार. किती पुरावे आहेत?त्यावर धनखड यांनी 'कोणत्याही आधाराशिवाय अशी विधाने करू नयेत. अशा विधानांमुळे संस्थांची प्रतिष्ठा कमी होते. आजची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत याचा आधार सांगा असे बजावले.

इकडे संसद सुरू आहे आणि तिकडे पंतप्रधान कर्नाटकात जातात व तेथे माझ्याच कलबुर्गी मतदारसंघात दोन-दोन सभा घेतात. अरे बाबा माझा एकच मतदारसंघ आहे. तोच तुम्हाला सभेसाठी मिळाला ?

- मल्लिकार्जुन खर्गे संसदेचे विरोधी पक्षनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT