कोलकाता : युद्धग्रस्त युक्रेनमधून बंगालमध्ये परतलेल्या विद्यार्थ्यांशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज बुधवारी (ता.१६) कोलकात्यात संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला. बॅनर्जी म्हणाल्या, निराश आणि दुःखी होऊ नका. वैद्यकीय इंटर्न्ससाठी राज्य सरकार त्यांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इंटर्नशीप करण्याची परवानगी देणार आहे. तसेच त्यांना मानधन दिले जाईल, असा शब्द ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. (Mamata Banerjee Interacts With Ukraine Returnee Students In Kolkata)
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी पश्चिम बंगाल सरकार त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था नाममात्र शुल्कात राज्यातच करणार आहे. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही वैद्यकीय परिषदेच्या समितीला पत्र लिहून त्यांना येथेच सरावाची परवानगी द्यावी अशी विनंती करणार आहोत, असे आश्वासन बॅनर्जी यांनी युक्रेनवरुन (Ukraine) परतलेल्या विद्यार्थ्यांना दिला आहे. (Indian Students Returned From Ukraine)
युक्रेन रशिया युद्धाला २० दिवस झाले आहेत. तरी युद्ध संपण्याचे चिन्ह दिसत नाही. २० हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत होते. त्यांना युद्धामुळे मायदेशी परतावे लागले आहे. मात्र पुढे काय ? त्यांचे शिक्षण कसे पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.