BJP MLA Surendra Singh criticized Mamata Banerjee badly  
देश

मोदींच्या बैठकीतून निघून गेल्याच्या आरोपावर ममतांचा पलटवार; म्हणाल्या...

विनायक होगाडे

कोलकाता: काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळामुळे ओडीसा आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा घेतला. या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाचा हवाई दौरा करुन त्यांनी काही बैठका देखील घेतल्या. पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठीची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला फार महत्त्व न देण्याचं धोरण ममता बॅनर्जी यांनी पत्करल्याचं थेट दिसून आलं. त्यांनी या बैठकीला अनुल्लेखाने मारण्याचा प्रकार केला तसेच या बैठकीला अर्धा तास उशीरा पोहोचल्याचा आरोप केला गेला होता. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीमध्ये 30 मिनीट उशीरा पोहोचणे आणि कागदपत्रे देऊन निघून जाण्याच्या आरोपावर उत्तर दिलं. शनिवारी एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलं. पंतप्रधान मोदींशी भेट होण्याआधी काय काय घडलंय, ते ममता बॅनर्जी यांनी सांगितलंय. ममता बॅनर्जींनी या प्रश्नांचंही उत्तर दिलंय की त्यांनी पंतप्रधान मोदींना रिसिव्ह का केलं नाहीये.

जेंव्हा मी पोहोचले, तेंव्हा मी बैठक सुरु झाली होती. त्यांनी मला बसण्यास सांगितलं. मी त्यांना अहवाल सादर करण्याबाबत विचारलं. एसपीजींनी आम्हाला सांगितलं की, बैठक एक तासांनंतर असेल. मी कॉन्फरन्स रुममध्ये रिकाम्या खुर्च्या पाहिल्या. असं सांगितलं गेलं होतं की बैठक ही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दरम्यान असणार आहे तर मग तिथे इतर भाजप नेते कशासाठी होते

बॅनर्जींनी म्हटलंय की, याची काहीच गरज नाहीये की, प्रत्येकवेळी पंतप्रधान मोदींना रिसिव्ह करण्यासाठी जावं. काहीवेळा काही राजकिय तमाशे देखील होतात. ममता यांनी स्पष्टपणे म्हटलंय की, त्यांना स्वत:लाच पंतप्रधान मोदींच्या मीटिंगमध्ये वाट बघावी लागली होती. ममता यांनी दावा केलाय की, जेंव्हा आम्ही पोहोचलो तेंव्हा आम्हाला सुचना मिळाली की, आम्हाला 20 मिनिटांपर्यंत वाट पहावी लागली, कारण पंतप्रधान मोदींना हेलिकॉप्टरमधून उतरायचं होतं.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पुढे म्हटलंय की, आमच्या वेळापत्रकाबाबत त्यांना कल्पना होती. तरी देखील आम्हाला वाट पहायला लावलं गेलं. आम्हाला 15 मिनिटे थांबावं लागलं, यावर आम्हाला कसलीही अडचण नाहीये कारण हा पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. आम्ही हेलीपॅडवर त्यांची वाट पाहिली. त्याआधी आमचे विमान लँड झाले नव्हते.

ममता बॅनर्जींनी म्हटलंय की, यानंतर जेंव्हा आम्ही कार्यक्रम स्थळी पोहोचलो तेंव्हा पंतप्रधान आधीपासूनच उपस्थित होते. आम्हाला पंतप्रधानांना सन्मान देणं भाग होतं, म्हणून मी आमच्या मुख्य सचिवांसोबत तिथे गेले. मी आमच्या मुख्य सचिवांना माझ्यासोबत येण्यास सांगितलं कारण ते आमच्या प्रशासनाचे प्रमुख आहेत. मात्र जेंव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेंव्हा तिथे आम्हाला वाट पाहावी लागली. माझ्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी एसपीजीकडे आम्हाला एक मिनिटांसाठी पंतप्रधानांना भेटण्याची परवानगी मागितली मात्र आम्हाला एसपीजीने म्हटलं की एक तास वाट पहावी लागेल. ममता बॅनर्जींनी पुढे म्हटलंय की, पंतप्रधान कार्यालयाने माझा अपमान केला. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी ट्विट केले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT