Lok Sabha Election 2024 Latest News : सध्या सगळीकडे धूम पाहायला मिळतेय ती लोकसभा निवडणूक २०२४ ची... प्रत्येक राज्यात प्रत्येक राजकीय पक्ष याच निवडणुकीच्या कामत गुंतलेला आहे. यादरम्यान तमिळनाडू येथील के पद्मराजन यांची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. देशातील लोकशाहीवर यांचा विश्वास पाहून अनेकांना यांचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.
तमिळनाडूमधील मेट्टूर येथे टायर रिपेयरचे दुकान चालवणारे ६५ वर्षीय पद्मराजन यांनी एकूण २३८ निवडणुका लढल्या असून २३८ वेळा पराभवाचा सामना केला आहे. इतक्यांदा पराभव पत्करून देखील ते बेफिकीर आहेत. इतकंच नाही तर आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे.
१९९८ मध्ये के पद्मराज यांनी निवडणूक लढवण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरूवात केली तेव्हा लोक त्यांच्यावर हसत होते आणि आजही हसतात. मात्र सामान्य माणूस देखील निवडणूक लढवू शकतो हे सिद्ध करणं उद्देश असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना गावच्या सरपंच पदापासून खासदारकीपर्यंत सर्व निवडणुका लढवल्या आहेत. इकक्या वर्षांमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंह यांच्यासह राहुल गांधींविरोधात पराभव स्वीकारला आहे. असे असून देखील ते यावर्षी तमिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील एका जागेवरून लोकसभा निवडणुकीत उभे राहणार आहेत.
पद्मराज यांच्यासाठी निवडणूक लढवणे हेच सर्वकाही आहे. आता इतक्या दिवसांनंतर ते पराभवानंतर देखील खुष होतात. आता निवडणूक जिंकलो तर तो माझ्यासाठी मोठा धक्का असेल असेही ते गमतीने सांगतात.
टायर रिपयर दुकानासोबत पद्मराज गे होमिओपॅथिक डॉक्टर देखील आहेत. स्थानिक मीडिया मध्ये संपदक म्हणून देखील ते काम करतात. त्यांच्या मते या सर्व कामांव्यतिरिक्त निवडणूक लढवणे सर्वात महत्वाचे काम असून अखेरच्या श्वासापर्यंत ते निवडणुक लढवत राहणार.
मात्र पद्मराज यांचा हा निवडणुका लढवण्याचा शौक स्वस्त नाहीये. तीन दशकांमध्ये निवडणूक लढवण्यावर लाखो रुपये खर्च केले आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 25,000 रुपये डिपॉझिट म्हणून जमा केले आहेत, जे 16% पेक्षा जास्त मते मिळाल्याशिवाय परत केले जात नाहीत.
भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार म्हणून के पद्मराजन यांच्या नावाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद आहे. पण ते त्ंयाच्या प्रत्येक पराभवाची खूण जपून ठेवतात, यामध्ये उमेदवारी अर्जापासून ते चिन्हांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने आपला मताधिकार वापरणे हे आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.