नवी दिल्ली- कुत्र्याला कारला दोरीने बांधून त्याला फरफटत नेल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. केरळमधील एर्नाकुलम येथील ही घटना आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला, तसेच कार चालकाला याबाबत विचारणाही केली. या व्यक्तीच्या पाठपुराव्यामुळे कुत्र्याला जीवनदान मिळाले आहे, तर कार चालकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युसुफला आपल्या पाळीव कुत्र्यापासून सुटका हवी होती. युसुफने पाळलेला कुत्रा रस्त्यावरील कुत्र्यांसोबत जास्त मिसळत होता. त्यामुळे त्याने कुत्र्यापासून सुटका करुन घेण्याचा निर्णय घेतला. युसुफने कुत्र्याला दोरीने बांधले आणि कार भरधाव वेगाने चालवली. कुत्र्याला कारची स्पीड पकडता न आल्याने तो खाली पडला. युसुफने अशा परिस्थितीत त्याला फरफटत नेले.
अखिलने हा व्हिडिओ शूट केला आहे. तो या घटनेसंबंधी बोलताना म्हणाला की, ते दृश्य खूप भीतीदायक होते. दोरी कुत्र्याच्या गळ्याभोवती बांधण्यात आली होती आणि अत्यंत निर्दयीपणे त्याला फरफटत नेले जात होते. पीटीआयने यासंबंधीचे माहिती दिली आहे. अखिलने युसुफला थांबवून याबाबत जाब विचारला. त्यावेळी युसुफ उलट अखिलवरच ओरडला. कुत्रा मेला तरी तुला काय अडचण आहे, असा प्रतिप्रश्न युसुफने केला. काही वेळाने युसुफने कुत्र्याला सोडून दिले.
कुत्र्याला सरकारी सुविधा गृहात ठेवण्यात आले असून त्याच्या जखमांवर उपचार केले जात आहे. अखिलने सांगितले की, त्याने या घटनेची माहिती DAYA या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दिली. त्यानंतर DAYA कडून याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी युसुफला अटक करण्यात आली आहे. युसुफविरोधात आयपीसी सेक्शन 428 (Mischief by killing or maiming animal)आणि 429 (Mischief by killing or maiming cattle, etc) अंतर्गत गुन्दा दाखल करण्यात आला आहे. युसुफचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.