Mandla constituency of Madhya Pradesh  Esakal
देश

लक्षवेधी लढत : मंडला मतदारसंघात भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान; केंद्रीय मंत्र्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काँग्रेसला पणाला लावावं लागणार कसब

गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला आदिवासीबहुल मंडला मतदारसंघात काँग्रेसला पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला आदिवासीबहुल मंडला मतदारसंघात काँग्रेसला पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आहे. परंतु केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांचा प्रभाव पुसून काढण्याचे कसब काँग्रेसला पणाला लावावे लागणार आहे.

मध्य प्रदेशातील महाकौशल भागातील हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघावरील काँग्रेसच्या वर्चस्वाला १९९६ पासून ओहोटी लागायला सुरवात झाली. केवळ २००९ ची निवडणूक वगळल्यास या मतदारसंघावर भाजपने पकड मजबूत केली आहे. केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी या मतदारसंघावर आपला प्रभावही कायम राखला आहे. परंतु त्यांच्या प्रभावाला खिंडार पडत असल्याचे संकेत गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून मिळाले.

मध्य प्रदेशातील काही भाजप खासदारांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. यात फग्गनसिंह कुलस्ते यांचाही समावेश होता. परंतु त्यांना निवास या विधानसभा मतदारसंघातून पराभवाची चव चाखावी लागली. विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही कुलस्ते यांच्यावर लोकसभेसाठी विश्वास दाखविण्यात आला आहे.

या मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ येत असून यावर काँग्रेसचे प्रभुत्व आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आठपैकी पाच मतदारसंघावर विजय मिळविला आहे. भाजपला केवळ तीन मतदारसंघात विजय मिळविता आला. या निकालाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे.

दिंडोरी या मतदारसंघातील आमदार ओमकार सिंग मरकाम यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. दिंडोरी मतदारसंघ हा मंडला या लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळविलेले घवघवीत यश काँग्रेससाठी विजयाच्या आशा असल्याचे संकेत देणारे आहे.या मतदारसंघात काँग्रेस व भाजपशिवाय गोंडवाना गणतंत्र पक्षाचे (जीजीपी) काहीसे वर्चस्व आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘जीजीपी’च्या उमेदवाराने ५० हजाराच्या जवळपास मते मिळविली होती. ‘जीजीपी’चा उमेदवार नसता तर काँग्रेसच्या विजयाची शक्यता होती. फग्गनसिंह कुलस्ते यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत दिसून आलेला जनक्षोभ कायम राहिल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला या मतदारसंघात काँग्रेसला आशा आहे. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मतदारसंघात मंगळवारी प्रचार रॅली घेतली होती. यावेळी मोहफुले गोळा करण्याचा परंपरागत काम करणाऱ्या महिलांशी त्यांनी संवादही साधला होता. हा संवादही कितपत काँग्रेस उमेदवाराच्या पथ्यावर पडतो, यावर या मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT