ईशान्य भारतात आयएलपी (इनर लाईन परमीट) अमलात आणणाऱ्या राज्यांपैकी अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरामनंतर मणिपूर हे चौथं राज्य ठरलंय.
मणिपूरमध्ये २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला (Bjp) सर्वाधिक म्हणजेच ६,०१,५३९ मते (२१ जागा) मिळाली; मात्र सर्वाधिक म्हणजे ३८ जागा जिंकून काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर स्थानिक पक्षांना सोबत घेऊन भाजपने मणिपूरमध्ये सत्ता स्थापन केली. सत्तास्थापनेत भाजपसोबत नागा पीपल फ्रंट, नॅशनल पीपल्स पार्टी, लोक जनशक्ती पक्ष आणि अपक्ष यांचा समावेश राहिला. काँग्रेसला सत्तेपासून ठेवण्यात भाजपला यश आले. (Manipur Assembly Election-2022 Updates)
२०१२ साली बहुमताने सत्तेत आलेल्या काँग्रेसला मात्र २०१७ च्या निवडणूक निकालानंतर घरघर लागली. काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या पक्ष बदलामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या २८ वरून केवळ १७ वर आलीय. सध्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी २०१६ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. सत्तागणितं जुळवून आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी संधी मिळाली. भाजपने पुन्हा सत्ता राखल्यास सिंग पुन्हा मुख्यमंत्री होण्यास इच्छुक आहेत. मात्र, स्थानिक नाराजी आणि इतर मुद्द्यांमुळे भाजप आसाम फॉर्म्युला मणिपूरमध्येही वापरू शकते. यामुळे मणिपूरला नवीन मुख्यमंत्री मिळू शकेल.
ईशान्य भारतात आयएलपी (इनर लाईन परमीट) अमलात आणणाऱ्या राज्यांपैकी अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरामनंतर मणिपूर हे चौथं राज्य ठरलंय. त्यामुळे भाजपच्या प्रचारात विकासाचा मुद्दा तर आहेच; पण प्रामुख्याने इनर लाईन परमिट (परवानगीशिवाय बाहेरील लोकांना मणिपूरमध्ये प्रवेश) हा मुद्दा भाजपने लावून धरलाय. येत्या निवडणुकीत किमान ४० जागांवर विजय मिळविण्याचा भाजपचा मानस आहे.
भाजपसोबत सध्या सत्तेत असलेल्या एनपीपीने आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं संख्याबळ वाढवण्याचा संकल्प केलाय. त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू युवक आहेत. सध्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यावर लक्ष देऊयात म्हणजे निवडणुकीनंतर भाजप किंवा काँग्रेस असा कोणताही पर्याय आपण निवडून शकतो, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. तर एनपीएफ ही अधिक (सुमारे १२) उमेदवार निवडणुकीसाठी उभे करणार असल्याचं चित्र सध्या दिसतंय. वरवर बघता सध्याच्या संयुक्त सरकारात सगळं आलबेल नाही असं चित्र दिसत असले तरी प्रादेशिक पक्षांतील अहमहमिकेचा फायदा भाजपला होऊ शकेल, अशी शक्यता नाकारता येत नाही.
मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होतील - २७ फेब्रुवारी , मार्च ३
पहिल्या टप्प्यात ३८ मतदारसंघात निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यातील निवडणूका १ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. ८ फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत असेल. तर ११ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी माघार घेणे शक्य आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २२ विधानसभा मतदारसंघात निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूका ४ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. ११ फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत असेल. तर १६ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी माघार घेणे शक्य आहे.
निवडणूक निकाल १० मार्च जाहीर होतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.