मणिपुरात ३ मे रोजी पहिल्यांदा हिंसाचार झाला. त्यानंतर सातत्याने हिसांचाराच्या घटना घडत आहेत. मणिपुरात गेल्या ५८ दिवासांपासून हिसांचाराच्या घटना घडत आहेत. अशातच मोठी अपडेट समोर आली आहे. मणिपुरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Manipur Violence CM Biren Singh likely to resign today )
मिळालेल्या माहितीनुसार, बिरेन सिंह आज दुपारी मणिपूरचे राज्यपाल अनुसुईया उईके यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करतील. राज्यात सुमारे दोन महिन्यांच्या अशांततेनंतरही त्यांना राज्यात शांतता प्रस्थापित करण्यात अपयश आले आहे.(Latest Marathi News)
हिंसाचारमुळे बिरेन सिंह दोन पर्याय देण्यात आले होते. एकतर राजीनामा द्या. अन्यथा केंद्र हस्तक्षेप करून ते ताब्यात घेईल. यानंतर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता.
यापूर्वी रविवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. शनिवारीच गृहमंत्री शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत 18 पक्षांची सर्वपक्षीय बैठक घेतली. बैठकीत सपा आणि आरजेडीने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यासोबतच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात आली होती.(Latest Marathi News)
गोळीबारात २ दंगलखोर ठार
कांगपोकपीमध्ये गोळीबारात 2 दंगलखोर ठार झाले आहेत. तर पाच जण जखमी झाले आहेत. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आणखी एक दंगलखोर ठार झाला आहे, परंतु घटनास्थळी अधूनमधून गोळीबार होत असल्याने मृतदेह अद्याप ताब्यात मिळाला नाही. हा परिसर राजधानी इंफाळपासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे.(Latest Marathi News)
या घटनेनंतर दंगलखोरांच्या समुदायातील सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत मृतदेहासह मोर्चा काढण्याची धमकी दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यापासून रोखले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.