Manipur Violence esakal
देश

Manipur Violence: बंदुकीचा धाकानं विवस्त्र नाचायला भाग पाडलं! 'कारगिल'वीराच्या पत्नीची व्यथा

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, आदित्य ठाकरेंची मागणी

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मणिपूरमधील महिला अत्याचारांची एकामागून एक धक्कादायक प्रकरणं समोर येत आहेत. दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिड काढल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बंदुकीच्या धाकानं कारगील युद्धात लढलेल्या जवानाच्या पत्नीवर अत्याचार झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे.

या घटनेवर आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. (Manipur Violence Forced to dance naked at gunpoint the pain of Kargil hero wife)

आदित्य ठाकरे म्हणाले, "आज आम्ही विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून मणिपूरच्या विषयावर आंदोलन केलं पण आम्हाला सभागृहात यावर बोलू दिलं नाही. एक धक्कादायक बाब अशी समोर आली आहे की, दोन तीन महिला ज्यांच्यावर अत्याचार झाले त्यामध्ये त्यातील एक महिला जी कारगीलमध्ये लढलेल्या सुभेदाराची पत्नी आहे. त्यांच्यावर जर असे अत्याचार होत असतील तर कुठे गेली देशभक्ती? कुठे गेलं तुमचं देशप्रेम?" (Latest Marathi News)

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा

"तुम्ही महिला असणं गरजेचं नाही तिथं जे काही घडतंय त्याची लाज वाटण्यासाठी. त्यासाठी तुमचा कोणी नातेवाईक असण्याची गरज नाही. या देशातील नागरीक म्हणून कोणावरही अत्याचार झाले तर तुम्हाला संताप आलाच पाहिजे.

ही एक जागतीक दुःखद घटना आहे. या मणिपूरच्या सरकारमुळं देशात आणि जगात आपलं नाव खराब झालं आहे. त्यामुळं हे सरकार बरखास्त झालं पाहिजे आणि तिथं राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे," अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Marathi Tajya Batmya)

आम्ही सर्वस्व गमावलं

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ज्या तीन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांपैकी एक महिला ही आर्मीतील निवृत्त सुभेदाराची पत्नी असून तिच्या पतीनं कारगीलच्या युद्धात सहभाग नोंदवला होता.

हे जोडपं सध्या मदत छावणीमध्ये राहत आहे. हल्लेखोरांनी त्यांच राहत घर आणि संसार पेटवून दिला, त्याची केवळ राख पाहणचं त्यांच्या नशिबी आलंय. "आम्ही सर्वकाही गमावलं आहे, संसार आणि प्रतिष्ठाही," अशा शब्दांत या कारगील वीरानं आणि त्याच्या पत्नीनं खंत व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT