देश

Manipur Violence: विरोधीपक्षांचे 21 खासदार उद्या मणिपूर दौऱ्यावर; PM मोदींना देणार धक्का!

पंतप्रधान मोदींना हिंसाचारानंतर अद्याप मणिपूरला जायला वेळ मिळालेला नाही.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचारानं आणि तिथल्या महिला अत्याचाराच्या घटनांनी देश ढवळून निघाला आहे. सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी यावरुन रान पेटवलं आहे. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळं वारंवार सभागृहाचे कामकाज ठप्प होत आहे.

पण अद्याप पंतप्रधान मोदींनी मणिपूरबाबत संसदेत निवेदन दिलेलं नाही. यापार्श्वभूमीवर विविध विरोधीक्षातील २१ खासदार उद्या मणिपूरला जाणार आहेत. याद्वारे मोदींना धक्का देण्याच्या तयारीत ते आहेत. (Manipur Violence MPs in INDIA Alliance go to Manipur visit tomorrow)

पंतप्रधानांना अद्याप वेळ मिळालेला नाही

गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर धगधगतो आहे, या काळात इथं सुमारे १५० च्यावर नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. महिलांच्या अब्रुचे धिंडवडे निघाले आहेत. पण राज्यातील बिरेन सिंह सरकारला अद्याप कायदा सुव्यवस्था राखता आलेली नाही. (Latest Marathi News)

तसेच केंद्रीय गृहमंत्री यांनी मणिपूरला भेट देऊनही अद्याप इथली स्थिती नियंत्रणात आलेली नाही. पंतप्रधान मोदींनी तर या काळात अमेरिकेसह इतर तीन देशांचे दौरे केले पण त्यांना मणिपूरवर भूमिका मांडायला आणि तिथं जायला वेळ मिळालेला नाही. (Marathi Tajya Batmya)

दोन दिवसीय भेट असणार

या पार्श्वभूमीवर आता विरोधकांच्या इंडिया आघाडीतील २१ खासदार उद्या मणिपूरला भेट देणार आहेत. याची माहिती सीपीआय खासदार पी. संतोषकुमार यांनी एएनआयशी बोलताना दिली. त्यांनी सांगितलं की, "उद्या आम्ही विविध राजकीय पक्षांचे २१ खासदार मणिपूरला जाणार आहोत. हे सर्व पक्ष इंडिया आघाडीचे भाग आहेत. आमची ही दोन दिवसीय भेट असणार आहे"

भेटीदरम्यान विरोधक काय करणार?

या भेटीमध्ये आम्ही निर्वासितांचे कॅम्प आणि हिंसाचाराचा फटका बसलेल्या जास्तीत जास्त ठिकाणांना भेटी देणार आहोत. मणिपूरची ही भेट म्हणजे देशवासियांना एक संदेश असणार आहे की, इंडिया ही केवळ निवडणुकांसाठी तयार झालेली एक आघाडी नाही तर लोकांचा आवाज बुलंद करणारा एक आवाज आहे, असंही खासदार संतोष कुमार यांनी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Shri Thanedar: ट्रम्प लाट असूनही मराठमोळ्या नेत्याने उधळला विजयाचा गुलाल! दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे खासदार, कोण आहेत श्री ठाणेदार ?

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

USA Election 2024: राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीच्या सभेत जयस्तुते गाण्याच सादरीकरण

SCROLL FOR NEXT