नवी दिल्ली : मणिपूरमधील महिलांना विवस्त्र करुन धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी आता देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक राजकारणी तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रीय महिला आयोगानंही याची दाखल घेतली असून ट्विटरला आयोगानं नोटीस पाठवली आहे. (Manipur Violence Notice sent by Central Commission for Women to Twitter)
मणिपूरची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. याप्रकरणी आम्ही DGP, CS आणि मणिपूच्या प्रशासनाशी चर्चा केली आहे. हा व्हिडिओ मे महिन्यातला आहे. या प्रकरणातील एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणावर २४ तासांच्या आत अहवाल मागवला आहे. त्याचबरोबर ट्विटरलाही आम्ही नोटीस पाठवली आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या प्रकरणावर काय पावलं उचलली याची माहिती दिली आहे. (Marathi Tajya Batmya)
ट्विटरला नोटिस का पाठवली यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितलं की, ट्विटरला आम्ही नोटिस पाठवली असून त्यांनी एखाद्या महिलेचा विवस्त्र व्हिडिओ प्रसारित करण्यावर आक्षेप का घेतला नाही? हा व्हिडिओ त्यांनी ब्लॉक का केला नाही? असा सवाल ट्विटरला आम्ही नोटिशीद्वारे विचारला आहे, असंही रेखा शर्मा यांनी सांगितलं. (Latest Marathi News)
मणिपूरमध्ये गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून दोन आदिवासी जमातींमध्ये टोकाचा संघर्ष सुरु असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिसाचार झाला आहे. याच संघर्षातून एका जमातीनं दुसऱ्या जमातीतील दोन महिलांवर अत्याचर करुन नंतर विवस्त्र करत त्यांची धिंड काढण्यात आली. इतकेच नव्हे हे सुरु असताना पुरुषांच्या ज्या जमावानं हे माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे, त्यांनी या महिलांचा विनयभंगही केल्याचं या व्हिडिओतून दिसून आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.