Manipur News  sakal
देश

Manipur News : मणिपूरचे ‘इमा मार्केट’ उदासीन ; संकट काळात विसर पडल्याची भावना

मणिपूरमध्ये प्रशासकीय यंत्रणा मतोत्सवाच्या तयारीमध्ये व्यग्र असली तरी सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः महिलांमध्ये मात्र या उत्सवाबाबत कमालीची उदासीनता दिसून येते. केवळ महिला उद्योजकांकडून चालविण्यात येणाऱ्या येथील जगप्रसिद्ध ‘इमा मार्केट’मध्ये याच उदासीनतेचे प्रतिबिंब उमटलेले पाहायला मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

इंफाळ : मणिपूरमध्ये प्रशासकीय यंत्रणा मतोत्सवाच्या तयारीमध्ये व्यग्र असली तरी सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः महिलांमध्ये मात्र या उत्सवाबाबत कमालीची उदासीनता दिसून येते. केवळ महिला उद्योजकांकडून चालविण्यात येणाऱ्या येथील जगप्रसिद्ध ‘इमा मार्केट’मध्ये याच उदासीनतेचे प्रतिबिंब उमटलेले पाहायला मिळाले. संकटाच्या काळामध्ये हा देशच मणिपूरला विसरला होता त्यामुळे आम्हाला या मतदानाच्या प्रक्रियेचे फारसे अप्रूप वाटत नाही, अशी भावना येथील महिला उद्योजकांनी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.

येथे मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या नेमा देवी यांनी अनेक महिन्याच्या हिंसाचारानंतरही येथील परिस्थितीत फारसा फरक पडलेला दिसत नाही असे नमूद केले. ‘‘आमचे राज्य आधी अकरा महिने हिंसाचारामध्ये होरपळत होते, आताही परिस्थिती फारशी बदलेली नाही. आम्ही एक-एक दिवस फक्त पुढे ढकलत आहोत. आमच्या जीवनावरील भीतीचे सावट अद्याप दूर झालेले नाही. निवडणूक झाल्याने कसला बदल होणार आहे?

संकटाच्या काळामध्ये हा देश, केंद्र सरकार आणि प्रत्येकजण मणिपूरला विसरले होते,’’ असे नेमा देवी यांनी सांगितले. स्थानिक फळ विक्रेत्या देबजानी यांनी आम्हाला निवडणूक नको असे नमूद केले. या निवडणूक प्रचारामुळे संशय वाढतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आपण लोकप्रतिनिधी कशासाठी निवडतो. त्यांनी आपले म्हणणे ऐकावे आणि त्यावर कारवाई करावी असे अपेक्षित असते. हे आता होणार नसेल तर कधी होईल? आमचा आता निवडणुकीवर विश्वास राहिलेला नाही.

- कुनजांग फेमा,

स्थानिक कापड विक्रेते

पाचशे वर्षे जुनी व्यापारपेठ

येथील ‘इमा कैथल’ ही पाचशे वर्षांपूर्वीची जुनी व्यापारपेठ आहे. येथे फळे, मासे आणि कपडे सर्व काही मिळते. या तीनमजली इमारतीमध्ये तब्बल साडेचार हजार स्टॉल आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या व्यापारपेठेचे नेतृत्व महिलांच्या हाती आहे. यंदा प्रजासत्ताकदिनी दिल्लीत कर्तव्यपथावार झालेल्या संचलनामध्ये मणिपूरच्या याच व्यापारपेठेची प्रतिकृती झळकली होती.

व्यापारी संघटनाही दुरावल्या

येथे चिनी मातीची भांडी विकणाऱ्या प्रिया खराईबाम यांनी निवडणूक झाल्यामुळे येथील परिस्थितीमध्ये फारसा फरक पडणार नाही असे मत मांडले. सगळ्या गोष्टी या ठरलेल्या मार्गानेच होणार असतील तर आपल्याला निवडणूक हवीच कशाला? निवडणुकीमुळे काय बदलणार आहे? असा सवाल खराईबाम यांनी केला. येथील बहुतांश व्यापारी संघटनांनी निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले आहे.

चुकीच्या वेळी निवडणूक

मणिपूरमधील मैतेई व कुकी समुदायांत झालेल्या हिंसाचारामुळे दोनशे लोक मृत्युमुखी पडले होते तर हजारो स्थलांतरित झाले होते. ‘‘सरकारने हा हिंसाचार थांबाविण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे होते. ही वेळ हिंसाचारावर तोडगा काढण्याची आहे, निवडणुकीची नाही. फार चुकीच्यावेळी निवडणूक जाहीर झाली’’ अशी भावना स्थानिक व्यापारी संघटनेच्या सरचिटणीस असीम निर्मला यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT