CM Kejriwal Press Conference : दिल्लीचे उपमुख्यमंत्री यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरूवात झाली असून, या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी "अनेक अडथळे येतील, पण आता भारत थांबणार नाही, थांबणार नाही..." असा विश्वास व्यक्त केला आहे. जगातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये भारताचा समावेश व्हावा असे वाटत असेल, तर त्यासाठी देशातील 130 कोटी नागरिकांनी आमच्या या मिशनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. अनेक अडथळे येतील पण भारत आता थांबणार नाही असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर हा वाद आता आणखीन चिघळण्याची चिन्ह आहे.
भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, आज मनीष सिसोदिया यांच्या शिक्षण धोरणाचे अमेरिकेतील सर्वात मोठ्या पेपरमध्ये कौतुक होत आहे, मात्र अशा नेत्याच्या घरावर छापे टाकले जात आहेत. 75 वर्षांपूर्वी भारत स्वतंत्र झाला. आपल्यानंतर स्वतंत्र झालेला देश आपल्या पुढे आहे. अशा नेत्यांवर विसंबून राहिल्यास आपण मागे पडू. देशाला नंबर वन बनवायचे आहे, पण त्यात खूप अडथळे येतील, देशातील 130 कोटी लोकांना एकत्र यायचे आहे. त्यासाठी केजरीवालांकडून 9510001000 हा नंबर जारी करण्यात आला आहे. यावर ज्या नागरिकांना देश नंबर एक झालेला पाहायचा आहे त्यांनी या नंबरवर मिस कॉल देऊन या मिशनमध्ये सामील होण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
सात वर्षात यापूर्वीही अनेक छापे पडले आहेत, हा पहिला छापा नाही. मात्र, आतापर्यंतच्या छापेमारीत काहीही मिळाले नाही, काही मिळणार नाही. सीबीआय आपले काम करत आहे, त्यांना वरून आदेश आहेत. ते त्यांचे काम करत आहेत, आम्ही आमचे काम करत राहू असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.