Manish Sisodia  esakal
देश

Manish Sisodia : मनिष शिसोदिया यांच्या कोठडीत 6 एप्रिलपर्यंत वाढ

सिसोदिया यांची कोठडी १९ मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झालेले आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना जामीन देण्यास राउज अव्हेन्यू न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने सिसोदिया यांची कोठडी ६ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

याआधी झालेल्या सुनावणीवेळी सिसोदिया यांची कोठडी १९ मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर त्यांना न्यायालयात सादर करण्यात आले होते. उत्पादन शुल्क गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याने सिसोदिया यांची चौकशी करणे गरजेचे आहे, त्यामुळे कोठडीत वाढ केली जावी, असा युक्तिवाद तपास संस्थेकडून करण्यात आला. यावर न्यायालयाने सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ केली.

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सिसोदिया यांची जामिनाबाबतची क्युरेटिव्ह याचिका फेटाळून लावली होती. उत्पादन शुल्क प्रकरणात काही हायप्रोफाईल लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. शिवाय सिसोदिया यांना जामीन देण्यात आला तर पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते, असा युक्तिवाद सीबीआयकडून करण्यात आला. दुसरीकडे संथ गतीने सीबीआयकडून तपास सुरु असल्याने आपल्या अशिलाला जामीन दिला जावा, असा युक्तिवाद सिसोदिया यांच्या वकिलांनी केला. तपास संथ गतीने सुरु असेल तर जामिनासाठी तीन महिन्यांनी अर्ज करू शकता, अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती. सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षीच्या ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यात सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती.

संजय सिंह यांना गैरहजर राहण्यास परवानगी...

उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणातील अन्य आरोपी संजय सिंह हे राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार असल्याने न्यायालयाने त्यांना सुनावणीस गैरहजर राहण्यास परवानगी दिली होती. सिसोदिया यांच्याप्रमाणे संजय सिंह यांनीदेखील या गैरव्यवहाराशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT